हिमालय आणि संबधित पर्वतांची निर्मिती
उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आणि पूर्वेकडे नागा लुशाई टैकडया हे पर्वत निर्मिती प्रक्रियेतील प्रदेश आहेत.यातील बराचसा पर्वतीय प्रदेश समुदाखाली होता. पर्वत मिर्मीतीच्या वेळी झालेल्या उर्थ्वगामी हालचालींमुळे गाळ व तळाचे खडक अत्युच्च उंचीवर आले. आज उठावाचा दिसणारा हा भाग अपक्षरण व झीज प्रक्रियांमुळे आहे.
प्राकृतिक रचना – हिमालय
हिमालय ही जगातील सार्वोच्या पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतश्रेणीमुळे चार समांतर पर्वत रांगाचा समावेश होतो.
शिवालिक रांगा
हिमालय प्रणालीच्या आतिदाक्षिणेकडील रांगाना शिवालिक टेकड्या म्हणता त या रांगेची समुद सपाटी पासूनची सर्वसाधारण उची ९०० मी.ते ११०० मी दरम्यान आहे.
हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेली वाळू आणि गाळ या घटकांचा या पर्वतरांगेत सामावेश होतो.शिवालिक आणि लाघुहिमालयाच्या दरम्यान अनेक दऱ्या आहेत. अशा दऱ्यांना डून असे म्हणतात डेह्शडून कोटलीडून. पाटलीडून ही डून दऱ्यांची उदाहरणे आहे.
जलोढ पंखे हे डून आणि शिवालिक पर्वतरांगेची लक्षणीय भूघडण आहे
लघुहिमालय किंवा हिमाचल रांग
ही पर्वतरांग शिवालिक रांगेच्या उत्तरेला आणि बृहत हिमालय किंवा हिमादी रांगेच्या दक्षिणेला आहे या पवर्ततरांगेची सामुद्रसपाटी पासूनची उंची ४५०० मी.पेक्षा कमी आहे.
या पर्वतरांगामध्ये काश्मीरमधील पीरपंजाल आणि हिमाचल प्रदेशातील धौला धार या रांगाचा समावेश आहे.लाघुहीमालायात सहजपणे जाणे शक्य असल्यामुळे काश्मीर खोरे कुलुमनाली आणि कांग्राचे खोरे ही पर्यटकांची खास आकर्षणे ठरली आहे.
बृहत हिमालय किंवा हिमाद्री
ही रांग पूर्वेकडे अनेक नद्यांनी छेडली गेली आहे. त्यामुळे पूर्वेकडे तुटक आहे.
बृहत हिमालय ही हिमालयाची सर्वात सलग, लांब, अत्युच्च आणि अति उत्तरे कडील पर्वतरांग आहे.हिमाद्रातील हिमाच्छादीत पर्वतरांगा एकाएकी आणि अनपेक्षित ६००० मी उंची गाठतात या पर्वतरांगेतील ८००० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहे
या पर्वत रांगेत अनेक हिमनंदयांचा उगम होतो.इतर दोन हिमालय रांगाच्या तुलनेत हिमाद्री पर्वतरांग ही जास प्रचंड व सलग आहे.
हिमालया पलीकडील पर्वत रांगा
हिमालय प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या परंतु प्रमुख हिमालयाच्या पर्वतरांगा व तिबेटचे पठार या दरम्यान असणाऱ्या रागांना हिमालया कडील पर्वत रांगा म्हणतात.या रांगा सुमोर ४० कि.मी. रुंद आणि ९६५ कि.मी लांब आहेत. यात काराकोरम, लडाख आणि कैलास पर्वत रंगाचा समावेश होतो.
काराकोरम
हिमालय प्रणालीतील ही एक पर्वतरांग आहे ही रांग ५०० कि.मी पर्यंत पसरली आहे. पृथ्वीवरील थुवीय प्रदेशाबाहेरील सर्वाधिक हिमा असलेवी पर्वतरांग आहे. सर्वात जास्त पर्वतशिखरांचे माहेरघर आहे. या रांगेतील के-२ (८६११ मी) हे जगातील दुसरे व भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
लडाख रांग
लडाख रांग म्हणजे समुदुसपाटीपासून अतिउंचावर असलेला व जवळ जवळ पठारासारखा प्रदेश आहे ही रांग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते. त्यामुळे लडाख रांग म्हणजे सुमुद्र सपाटीपासून अतिउंचावरील शीत वाळवंट आहे
कैलास पर्वत रांग:- कैलास पर्वतरांग पूर्णपणे भारतीय क्षेत्राच्या बाहेर तिबेट प्रदेशात येते. कैलास शिखर आणि मानसरोवर ही यात्रेकरूंची मुख्य आकर्षण स्थळे आहे.
हिमालयाचे पूर्व – पाश्चिम दिशेत तीन विभाग
पश्चिम हिमालय
सिंधू नदी पासून ते नेपाळच्या सीमेलगत असणाऱ्या काली नदीपर्यत पाश्चिम हिमालय पसरलेला आहे.
जम्मू आणि काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांखंड या तीन राज्यात पसरलेला आहे.
प्राकृतिक दुष्टया तीन राज्यात काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमा ऊँ हिमालय या नावांनी ओळखला जातो.
मध्य हिमालय
काली नदीपासून ते तिस्ता नदीपंर्यत मध्य हिमालय पसरलेला आहे.पूर्वेकडील सिक्कीम हिमालय अति दार्जीलिंग हिमालय हे मध्य हिमालयाचे प्रमुख भाग आहेत.तराई गंगेच्या मध्य गैदानी प्रदेशा जलसंपत्तीवर मध्य हिमालयाचा बऱ्याच अंशी प्रभाव प्रडतो.
पूर्व हिमालय
तिस्ता नदीपासून ते ब्राम्ह्पुत्रा नदीपंर्यत पूर्व हिमालय पसरलेला आहे. या हिमालयाने अरुणाचल प्रदेश आणि भूतानला व्यापले आहे.या हिमालयास असम हिमालय असेठी म्हणतात. यात अनेक पर्वताखिंडी आहेत. सिक्कीमला जीप ला आणि अरुणाचल प्रदेशातील बमला यापर्वत खिंडीतून तिबेटची राजधानी ल्हासाकडे जाणारे महत्वाचे मार्ग आहेत.जोरदार पावसामुळे या पर्वतरांगाची मोठ्या प्रमाणावर झीज होते.
हिमालयाशी संबंधित पर्वत
भारताच्या अतिपूर्व भागात म्यानमार सीमेलगत उत्तर व दाक्षिण दिशेने पसरलेल्या अनेक टेकड्या आहेत या तेकडयांना पुर्वाचल असे म्हणतात. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम या राज्यात या टेकडयांच्या रांगा पसरलेल्या आहे. या टेकड्या विविध स्थानिक नावांनी ओळखल्या जातात उदाठ पतकोई टेकड्या नागा टेकड्या मणिपूर टेकड्या मिझो टेकड्या नागा टेकडयांमधील सारामती (३८२६ मी) हे या भागातील सर्वोच्च शिखर आहे.
नद्या
हिमालयातील बहुतांश नद्या बारमाही आहेत पावसाळ्यात पर्जन्या मुळे आणि उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फामुळे त्यांना पाणी पुरवठा होतो.
सिंधू ही जगातील मोठ्या नघापैकी एक आहे. ती तिबेटमधील मानासरोवाराजवळ उगम पावते भारतातून नंतर पाकिस्तानातून वाहतेशेवारी कराचीजवळ अरबी समुदाला जाऊन मिळते.भारतीय पदेशातील मुख्य उपनधा सतलज, वियास, रावी, चिनाब, झेलम,भागिरथी नदीचा उगम गंगोत्री येथे होतो यमुना रामंगागा घागरा गंडक आणि कोसी या गंगेच्या महत्वाच्या उपनघा आहेत ब्रमृपुत्रेचा उगम तिबेट मध्ये होतो ती पूर्वेकडे वाहत आल्यानंतर भारतात अरुणाचल प्रदेत प्रवेशात करते ब्रम्हपुत्रा पुढे असममध्ये वाहत जाते नंतर बांगलादेशात गंगेला मिळून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते
हवामान
हिमालय हा भारतीय उपखंड आणि मध्य आशियातील डोंगराळ प्रदेश या दरम्यान हवामान माह्त्वाचा दुभाजक आहे हिमालय पर्वत रंगाचे स्थान आणि विलक्षण उंचीमुळे उ कडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना हिवाळ्यात भारतात येण्यास अडथळा होतो दक्षिण उतारावरील शिमला येथे वार्षिक सरासरी पाऊस सुमारे १५३० मि.मी तर पुर्वेकडील दर्जिलिंग येथे सुमारे ३०५० मि.मी. इतका असतो पूर्व हिमालय पाश्चिम हिमालयापेक्षा तुलनेने उबदार आहे.
मृदा
हिमालयाच्या दक्षिण उतारावर बऱ्यापैकी जाड मृदेचे आच्छादन आहे त्यामुळे कमी उंचीवर घनदार जंगले आणि जास्त उंचीवर गवताळ प्रदेश आढकतो.वनमृदा गडद तपकिरी रंगाची असते फळझाडांच्या लागवडीसाठी आदर्श मृदा आहे.असमच्या खोऱ्यातील लोग मृदा चहाच्या पिकासाठी उत्तम आहे.काश्मिरचे खोरे व डेहराडून येथे जलोद मृदा आढळते
नैसार्गिक वनसंपत्ती
भारताच्या एकूण जंगलाखालील क्षेत्रापेकी ५२% जंगलाचे क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयात वनसंपत्तीचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत (१) उष्णकटीबंधीय (२) उपोष्णकटीबंधीय (३) समशीतोष्ण (४) पर्वतीय तेथील स्थानिक भिन्नतेनुसार प्रत्येक क्षेत्रात असणाऱ्या प्रजांतीमध्ये बरीच विविघता आढळते यामध्ये इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मौराताकन साल वृक्षाच्या जाती सुमारे १४०० मी उंचीवर वाढतात, पर्वतीय जंगल सुमारे ३४०० मी उंचीवर सुरु होतात आणि पाश्चि हिमालयात आणि पूर्व हिमालयात ४५०० पर्यत वाढतात
प्राणी जीवन
आशियाई काळी अरवले लंगूर हिमालयीन शेकी आणि सांबर ही हिमालयातील जेगालातील निवासी प्राण्यांची नावे आहेत हिमालयातील दुर्गम भागांमध्ये उंचावर बर्फातील चित्ते, तपकिरी अस्वले, लहान आकाराचा पांडा तिबेटी याक नर्यादोत संख्येने आहेत याक हा पाळीव प्राणी असून लडाखमध्ये त्याचा उपयोग ओझी वाहून नेण्यासाठी केला जातो.पक्षी जीवनही तितकेच संपन्न आहे. हिमालयात आढळणाऱ्या विविध जातींपैकी मॅगपाय आणि कस्तुरी हे प्रमुख पक्षी आहेत.
लोकसंख्या आणि वसाहती
हिमालयात पर्वतरांगाच्या प्रदेशातील लोकसंख्या 80 टक्के लोक ग्रामीण भागात आणि २० टक्के लोक शहरी भागात राहतातहिमालयातील गड्डी हे आदिवासी लोक शेळ्या मेढयांचे कळप पाळतात. गुज्जरी लोक पंरपरेने स्थलांतर करतात व पशुपालन करतात.चंपा लोक सिंधू खोऱ्यातील वरच्या भागात पारंपारिक भटके गुराख्याचे जीवन जगतात.अरुणाचल प्रदेश ही अनेक सांस्कृतिक समुहाची मायभूमी आहे. उदा अबोर आणि अपातानी ते सर्व नद्यांच्या खोऱ्यात राहतात व स्थलांतरीत शेती करतात.हिमालयातील दूर आणि एकाकी खोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची सांस्कृतिक अस्मिता टिकून राहिली आहे.
शेती
हिमालयातील लोक परंपरेने शेती व वनीकरण पशूपालन व वनसंवर्धन या सर्वाचा समतोल साधत शेती करतात गंगा यमुना या नदयांच्या दुतर्फा असलेल्या सखल भागात तांदूळ, मका, गहू पिकतो हिमालयात सर्वाधिक फळबागा काश्मीर खोऱ्यात आणि हिमाचल प्रदेशात सफरचंद पीच पेअर प्राक्षे, बदाम, अकोड आणि या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.ईशान्य हिमालयातील लोक अनेक वर्षापासून भूप्रदेशाचे पूनर्भरण करण्यासाठी पारंपारिक पध्दतीने शेती व वनशेती आहे झूम चकला जास्तीत जास्त २५ वर्षे एवढा कालावधी लागत असे परंतु आता तो घटून ४-५ वर्षे इतका कमी झाला आहे झूम चक कमी कालावधीचे झाले आहे.
खाणकाम
हिमालयातील नाजूक पर्यावरण, दुर्गमता आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हिमालायीन प्रदेशात खाणींचा पूर्णपणे शोध घेता येत नाही. तरीदेखील ने पेट्रोलिअम आणि चुनखडी इ-चा शोध वेगवेगळ्या ठिकाणी घेतले गेले आहे.
चुनखडक आणि कोळसा हे खनिज पदार्थाचे स्त्रोत मेधालयात आहे. गंधकाचा अंश जास्त असल्याने कोळशाची डोलोमाइट फायर कले आणि गारगोटी इ चा समावेश होता.तेल आणि नैसगिक वायू आयोग (ONGC) या संस्थेने तेलाचा शोध लावण्यात त्रिपूरा राज्यात लक्षणीय कामगिरी बजावली आहे त्रिपूरा राज्यात नेसर्गिकवायू लिग्नाइट व चिकण मातीचे साठे आहेत.
उदयोग
अन्न धान्यावर प्रकिया, वनस्पतीजन्य तेल काढणे आणि साखर उघोग इ महत्वाचे उघोग आहेत
हस्तकला हा जम्मू आणि काश्मीर राज्यातील पारंपारिक व्यवसाय आहे येथील लाकडावरील कोरीव काम, कागद निर्मिती, यंत्र निर्मिती, गालिये, शाली आणि भरतकाम व्यवसाय महत्वाचे आहे. येथे तयार होणाऱ्या गालिच्यांच्या निर्यातीतून परकीय चलन मिळेत
फलोद्यान शेती, वनौषधी लोकर, रेशीम उत्पादन आणि इलेकद्रनिकस इ महत्वाचे उदयोग आहेत खेड्यातील उघोगात मेषपालन, विणकाम, कातडी कमावणे, कुंभारकाम, हातमाग, हस्तकला, बांबूकला इ चा समावेश होतो.
उत्तराखंड राज्यात पर्यटन, चहा, वनौषधी आणि मसाले इ उधोगांच्या वाढीस वाव आहे.
वाहतूक
पूर्व हिमालयात सर्व वाहतूक हमाल आणि ओझी वाहणारे प्राणी करीत असत या प्राण्यांना आजही महत्व आहे.हिमालयातील शिमला आणि क्षीनगर या महत्वाच्या पर्यटन स्याळांना विमान सेवा आहे. शिमला आणि दार्जीलिंग रेल्वेमार्गाने जोडले आहे.जम्मू ऋशिकेश डेहराडून, न्यु जलपैगुरी, दिमापूर ही हिमालयातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
पर्यटन
हिमालयात पर्यटन महत्त्वाचा वाढता उघोग व्यवसाय झाला आहे हिमालयात पर्वतारोहण, जंगलातील प्राणी पाहणे आणि यात्रेकरू म्हणून पवित्रस्थानी भेट देतात.उत्तरा खंडाला देवभूमी असेही संबोधले आहे हरीव्दार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमनोत्री इ पर्यटन स्यळे येथे आहेत.
हिमालयातील शिमला, मसूरी, नैनिताल, दर्जिलींग ही ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहे.हिमालयातील नैसर्गिक आपत्ती.जगातील सर्वाधिक जागृत सहा भूकंपप्रवण क्षेत्रातील एक क्षेत्र भारताच्या हिमालय भागात आहे.भारताच्या पर्वतीय प्रदेशात हिमालायासाहित सर्व ठिकाणी भूस्खलन ही प्रमुख नैसार्गेक आपत्ती आहे भूकंप, पूर, ज्वालामुखी, जोराचा पाऊस यामुळे हिमालयात भूस्खलन होते. गुरे चारणे व इंधनासाठी लाकूड तोड करणे यामुळे हिमालयातील खेड्यांजवळील जंगल संपतीचा ऱ्हास होत आहे त्याचप्रमाणे हिमनदयांचा भाग दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.