जवाहर नवोदय निवड परीक्षा (जे.एन.वी.एस.टी)६ व्या वर्गासाठी
प्रवेश प्रक्रिये साठी
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे संचालित राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून निवड होते आणि मग मुलांना ६ व्या वर्गासाठी प्रवेश दिला जातो. जागा रिक्त असल्यास क्षेत्रीय स्तरावरील परीक्षांच्या माध्यमातून / मागील परीक्षांचे निकाल व गुण विचारात घेऊन मुलांना ९वी व ११ वी साठी प्रवेश देण्यात येतात. नवोदय विद्यालयात शिक्षण मोफत असते. एकूण ७५% जागा ग्रामीण मुलांसाठी आणि कमीतकमी ३३% जागा मुलींसाठी राखीव असतात. अनुसूचित जातिंसाठी १५% तसेच अनुसूचित जमातींसाठी ७.५ % जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेमागे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा अशी योजना आहे.
अर्ज, प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा : http://www.navodaya.nic.in/welcome%20sbs.htm
केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी २००७-२००८ पासूनच्या शैक्षणिक सत्रापासून खाली दिलेली मार्गदर्शक तत्वे लागू केली गेली आहेत.
प्रवेशप्रक्रिया
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात क्षेत्रीय कार्यालयाद्वारे प्रवेशाच्या नामांकनासाठीची सूची वगैरेच्या संदर्भात स्थानीय वर्तमान पत्रात क्लस्टर स्थरावर जाहिरात दिली जाते आणि मुलांना केंद्रीय विद्यालयात नाव नोंदणीसाठी आमंत्रित केले जाते. या जाहिरातीमधून असे सूचित व्हावे की केन्द्रीय विद्यालयात प्रवेश फक्त केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी मर्यादित नसून सर्वांसाठी आहे, फक्त इतर काही गटांतील मुलांना, विशिष्ट प्राधान्यक्रमांनुसार प्रवेशासाठी अग्रक्रम दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी आणि अपंगांसाठी प्राधान्याचा त्यात उल्लेख असावा.
अर्ज, प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा :
http://kvsangathan.nic.in/guidelines1.aspx
केंद्रिय विद्यापीठ पाल्यातील शैक्षणिक उच्च गुणवत्तेला प्रोत्साहन देते ज्यामुळे ते देशातील चांगल्या प्रतीच्या इतर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रगती करू शकतात. विविध प्रकल्प आयोजित करून तसेच इतर मूल्यवान संशोधनामधील अशा शाळांच्या प्रयत्नांमुळे ज्ञानाची तहान तृप्त करण्यास मदत मिळते.
अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा : http://www.centralacademyschools.org/htm/admission.htm
अंतिम सुधारित : 6/27/2020
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...