অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाजशास्त्र

समाजशास्त्र

  • नागरी समाज
  • नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय.

  • विलग्नीकरण
  • ज्या प्रक्रियेद्वारा व्यक्ती आणि समूह काही लक्षणांच्या संदर्भातील साम्य आणि भेद यांच्या आधारावर आपले वेगळे अस्तित्व प्रस्थापित करतात, त्या प्रक्रियेस ‘विलग्नीकरण’ असे म्हणतात.

  • वेठबिगार
  • निराधार, दुर्बल, परावलंबी व असंघटित व्यक्तींच्या अज्ञानाचा व दुबळेपणाचा गैरफायदा उठवून, योग्य मोबदला न देता किंवा विनामोबदला पडेल त्या कामाकरिता राबवून घेणे म्हणजे वेठबिगार असे सामान्यतः म्हणता येईल.

  • शिशुकल्याण
  • सर्वसामान्यपणे १४ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले ही शिशू किंवा बालक या संज्ञेला पात्र ठरतात. त्यांच्या उपजीविकेसाठी ती पालकांवर अवलंबून असतात. त्यांचे वय संस्कारक्षम असते.

  • समग्र क्रांति
  • व्यक्ती आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासाचा पुरस्कार करणारी विचारप्रणाली.

  • समाज
  • समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे.

  • समाजकल्याण
  • समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण.

  • समाजकार्य
  • रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा.

  • समाजमिति
  • समाजमितीच्या चाचण्यांचा वापर करून तथ्यसंकलनाचे विश्र्लेषण करण्यास ‘ समाजमिती ’ अशी संज्ञा दिली जाते.

  • समाजवाद
  • संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली.

  • समाजशास्त्र
  • मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास.

  • समाजसेवा
  • समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate