आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे. ध्वजाच्या रुंदी-लांबीचे प्रमाण दोनास-तीन असे आहे. पांढर्या पट्टयाच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. ह्या चक्राची मूळ रचना सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील पौराणिक स्तंभावर पाहावयास मिळते. ह्या चक्राचा व्यास जवळजवळ पांढर्या पटट्याच्या रुंदीइतकाच आहे व ह्या चक्रास २४ आरे आहेत. राष्ट्रध्वजाच्या ह्या रचनेला भारताच्या सांविधानिक सभेने २२ जुलै १९४७ रोजी मान्यता दिली. भारत सरकारच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणार्या अवैधानिक सूचनांखेरीज राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन आणि वापर करण्यासंबंधी काही कायदेदेखील केलेले आहेत - प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० (१९५० मधील क्र. १२), राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ (१९७१ मधील क्र. ६९). असे सर्व नियम, कायदे इत्यादींचे एकत्रीकरण करून सर्व संबंधितांच्या सुविधेसाठी २००२ सालचा राष्ट्रध्वज संकेत तयार केला आहे.
२६ जानेवारी २००२ पासून ह्या संकेताची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पूर्वीच्या सर्व नियमांऐवजी आता ह्याचा वापर केला जाईल. ह्यामधील तरतुदीनुसार आता सामान्य नागरिक, खाजगी संस्था तसेच शैक्षणिक संस्था राष्टध्वजाचे मुक्त प्रदर्शन करू शकतात. परंतु असे प्रदर्शन व वापर प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० आणि राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ कायद्याच्या अधीन राहून करता येईल.
अंतिम सुधारित : 7/24/2020
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...