पोर्टलच्या ह्या विभागामध्ये आपण आपल्या देशाची एक राष्ट्र म्हणून ओळख करून देणारी काही चिन्हे पाहणार आहोत. भारताची परंपरा आणि भारतीयत्वाशी ह्या चिन्हांचा एकात्मिक संबंध आहे. भारतीय मनुष्य जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी ही चिन्हे आणि प्रतीके पाहून त्याच्या मनात राष्ट्रप्रेम आणि अभिमानाची भावना उचंबळून येते ह्यात शंकाच नाही.
मोर उर्फ पॅवो क्रिस्टाटस हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. साधारणतः हंसाच्या आकारच्या ह्या पक्षाची मान नाजूक व लांब असून डोळ्याखाली पांढरा पट्टा आणि डोक्यावर पिसांचा तुरा असतो. मात्र ह्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे २०० पेक्षा अधिक रंगीबेरंगी लांब पिसांनी बनलेला देखणा शेपटा व छातीवरील निळ्याहिरव्या रंगांची पिसे. नर मादीपेक्षा देखणा असतो व हा लांब शेपटा फक्त त्यालाच असतो. मादी नरापेक्षा आकारने लहान व तपकिरी रंगाची असते. नराचे शेपट्यातील पिसे फुलवून केलेले नृत्य पाहण्याजोगे असते.
आपला राष्ट्रीय वृक्ष म्हणजे वड उर्फ फायकस बेंगालेंसिस. फांद्यांच्या लोबत्या मुळांपासून नवीन रोपे तयार होऊन आशाप्रकारे एकच झाड विस्तृत क्षेत्रावर पसरणे हे ह्याचे वैशिष्ट्य आहे. ह्यामुळे व एकंदर दीर्घायुष्यामुळे हा वृक्ष अमर मानला जातो. वटवृक्ष हा भारतीय परंपरा आणि लोककथांचा अविभाज्य भाग आहे. इतका की आजदेखील खेड्यापाड्यांचे रहिवासी महत्वाच्या बैठका वडाच्या झाडाखालीच घेतात.
अंतिम सुधारित : 8/9/2020
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...