सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते
अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी मा.प्रधानमंत्री यांनी १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता १ली ते १० वी च्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी मँट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे.
अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती योजना विषयक.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना विषयक.
आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्टया मागासवर्गातील हुशार मुलामुलीं ज्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत शेकडा ४५ टक्के गुण मिळालेल्या व पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते.
गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी सरकारी तसंच सामाजिक संस्थांच्या अनेक शिष्यवृत्ती योजना उपलब्ध असतात. अशा विविध शिष्यवृत्ती योजनांबद्दल…
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शासकीय (खुल्या)गुणवत्ता शिष्यवृत्त्या
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना विषयक माहिती.
ग्रामीण भागातील हुशार (प्रज्ञावन) विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे माध्यमिक स्तरावर घेण्यात येणार्या इयत्ता ७ वी परीक्षेवर गुणवत्तेनुसार इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शासकीय (खुल्या) गुणवत्ता शिष्यवृत्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणर्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिष्यवृत्ती दिली जाते.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार्या पूर्व माध्यमिक इयत्ता ४ थी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ५ वी ते ७ वी व माध्यमिक स्तरावर इयत्ता ७ वी च्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते.
महाडीबीटी पोर्टल विषयक माहिती.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना केंद्र पुरस्कृत असून शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन राज्यस्तरीय परीक्षेतून जिल्हानिहाय तयार केलेल्या गुणवत्ता यादीतून राज्याला ठरवून दिलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केली जाते.व शिष्यवृत्तीस निवड झालेल्या विदयार्थ्यांना इयत्ता ९ वी पासून इयत्ता १२ वी पर्यंत केंद्र शासनाकडून बँकेमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे महाराष्ट्रातील दोन मुलांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाते
राष्ट्रीय शिष्यवृत्त्या आणि बक्षिसे यात राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा इयत्ता आठवीसाठी, राष्ट्रीय प्रतिभा शोध योजना (इयत्ता 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी), कलात्मक आणि अभिनव उत्कृष्टतेसाठी चाचा नेहरू शिष्यवृत्ती
भूतपूर्व हैदाबाद राज्यातील मूळ रहिवाशी असलेल्या पालकांच्या मुलांसाठी मराठवाडा विभागातील जिल्ह्यामध्ये रियायती आणि तर्गीबी शिष्यवृत्ती देण्याची योजना १९५० पासून सुरु आहे.
संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या या बद्दल माहिती