सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे शाळा होय. विद्यार्थी दशेतील एक महत्वाचा कालावधी होय. विद्यार्थ्यांनी विविध कलेत पारंगत होऊन आपले भवितव्य उज्वल करावे यासाठी सतत नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबविले जातात व विद्यार्थ्यांवर कळत-नकळत संस्कार केले जातात.
अशा अनेक शाळांपैकी एक म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा होय. शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.भगत व आर.एम.मेंढे यांनी इंग्रजी व गणित या दोन विषयांच्या उत्कृष्टपणे उपयोग करुन यशाचे शिखर गाठले. शाळेतील शिक्षक व पालकवर्गाने विद्यार्थ्यांप्रती आपली जबाबदारी विविध उपक्रमातून पार पाडली. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभिव्यक्ती फलक, ग्रामसभा तशी बालसभा, सामाजिक ऋण फेडुया, मी परीक्षक, चला ज्ञानकण वेचुया, पर्यावरण संरक्षण या उपक्रमांचा समावेश होतो.
‘स्पर्धा’ जीवनातील अविभाज्य घटक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याकरीता मार्गदर्शनाची गरज असते. त्या दृष्टीने शाळेत मार्गदर्शनपर प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात असन शाळेतील 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीकरीता पात्र ठरले आहेत. मनातील आशय अव्यक्त राहू नये. विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीची संधी देता यावी या उद्देशाने अभिव्यक्ती फलक उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्राम सचिवालयाप्रमाणे ज्ञान सचिवालय निर्माण करुन आयोजित बालसभेमध्ये विद्यार्थी आपली मते निर्भीडपणे व्यक्त करतात. कुठल्याही लोकोपयोगी व सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक ऋण फेडण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. निर्भय वातावरणात शिक्षणाचे धडे घेता यावे याकरीता पाच पाच विद्यार्थ्यांचे गट व एक गटप्रमुखाची निवड करुन प्रसंगानुरुप निपक्षपणे कार्य करण्याची शिकवण विद्यार्थ्यांना ‘मी परीक्षक’ या उपक्रमातून दिली जाते. मुलांना वाचनाची गोडी वाटावी, त्यांची वाचनक्षमता वाढावी व संवेदनशिलतेचा विकास व्हावा याकरीता ‘चला ज्ञानकण वेचुया’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके उपलब्ध करुन देऊन ‘अनुभव कथन’ यासारख्या विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
आसपासचा परिसर, निसर्ग, शेती, धरण, तलाव, बांध, उद्याने या स्थळांना भेटी देऊन पर्यावरण संरक्षण हा उपक्रम राबविल्या जातो. निसर्ग व पर्यावरणाचे संतुलनाबाबत जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सर्व प्रयोग व नाविन्याचा पाठपुरावा या शाळेमध्ये केला जातो. प्राथमिक शिक्षणातच विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचला जात आहे. जे कुठेच मिळत नाही ते फक्त शिक्षक देऊ शकतो. या धारणेने या शाळेतील सर्व शिक्षकांचा विद्यार्थी घडविण्यात सिंहाचा वाटा आहे. हे मात्र निश्चित.
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/2/2020
इंग्रजी साहित्य- एकोणिसावे शतक (१७९८–१८३७) विषयक म...
भूमितीत, दोन एकतली (एका पातळीत असलेल्या) आकृत्यांम...
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटा...