অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मी वाचले, आपणही वाचा - मन में है विश्वास

मी वाचले, आपणही वाचा - मन में है विश्वास

श्री. विश्वास नांगरे पाटीलसाहेब यांनी कला, क्रीडा, साहित्य, सेवा, संस्कृती इ. क्षेत्रात मुलुखगिरी केली. प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या बाबी त्यांनी स्वीकारल्या. ते सिनेमे पाहायचे पण पाहिलेल्या प्रत्येक सिनेमातून त्यांच्या जीवनाला आधार व आकार देतील अशी वाक्ये ते सुविचारासारखी वहीत लिहून ठेवीत. अभ्यास, व्यायाम, आहार, सकारात्मक दृष्टिकोन व चिकाटी ही पंचसूत्री त्यांनी युवापिढीला दिली आहे हे मात्र खरे!

‘मन में है विश्वास' हे आय. पी. एस. अधिकारी मा. श्री. विश्वास नारायण नांगरे पाटील यांचे हे पुस्तक त्यांच्या अस्सल अनुभव व मनाला घट्ट पकडून ठेवणा-या लेखनशैलीमुळे चांगलेच गाजते आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर मी माझ्या विदयार्थी व शिक्षकांना ४०-४५ मिनिटांच्या व्याख्यानातून यातील सौंदर्यस्थळे व उपयुक्त वेचे त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांच्या या पुस्तकावर उड्या पडल्या नसत्या तरच नवल!'स्पर्धा परीक्षातून स्वत:चे ध्येय साध्य करून नशीब अजमावणा-या खेड्यापाड्यातील असंख्य तरुणांना हे पुस्तक मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रोत्साहन, जिल्ह्यातील कोकरूडसारख्या छोट्या खेडेगावापासून दिल्लीच्या अंतिम मुलाखतीपर्यंतचा प्रवास व नंतर २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी मृत्यूसमोर दिसत असताना त्यांनी केलेला जिगरबाज प्रतिकार इ. संबंधीचे वर्णन एखादया चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असेच आहे.

प्राथमिक, माध्यमिक, पदवी, पदव्युतर व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना आलेले कडूगोड अनुभव, मन विचलित करणारे प्रसंग, ध्येयापासून परावृत्त करणा-या घटना, मधूनच येणारे नैराश्य, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, अपयशाची भीती, अपयशाचे यशात रूपांतर करण्याची जिद्द, कुटुंबातील व्यक्तींनी दिलेले पाठबळ व स्फूर्ती, जीवनाच्या योग्य वळणावर घेतलेले व समाजाला न पटणारे निर्णय (उदा. इ. १२ वी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊनही कलाशाखेकडे वळणे) विस्तृत व सखोल वाचन, असेल त्या परिस्थितीत राहणे व येईल त्या प्रसंगाला तोंड देणे इ. मुळे हे पुस्तक खचलेल्या व गोंधळलेल्या लेखी परीक्षेत व मुलाखतीच्यावेळी त्यांनी दाखविलेले आत्मविश्वास यामुळे यशश्री त्यांच्यावर प्रसन्न झाली आहे. हार पत्करायची नाही, पराभव मान्य करायचा नाही या त्यांच्या मनोवृत्तीला पाठबळ मिळाले ते त्यांच्या कुटुंबियांकडून! सकारात्मक दृष्टिकोन व इच्छा असलेली मुंगीही इच्छा नसलेल्या नकारात्मक गरुडाला मागे टाकते, होय ना? या पुस्तकातील पृष्ठ क्र. ४५ वरील मजकूर हा इ. १०वी तील विदयार्थ्यांसाठी उत्कृष्ट यशाचा पावसवर्डच म्हणावा लागेल.

श्री. विश्वास नांगरे पाटीलसाहेब यांनी कला, क्रीडा, साहित्य, सेवा, संस्कृती इ. क्षेत्रात मुलुखगिरी केली. प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या बाबी त्यांनी स्वीकारल्या. ते सिनेमे पाहायचे पण पाहिलेल्या प्रत्येक सिनेमातून त्यांच्या जीवनाला आधार व आकार देत सुविचारासारखी वहीत लिहून ठेवीत. (पृष्ठ क्र. १६८, १६९) चंचल मनाला सतत ध्येयप्रवण बनविणे एवढाच हेतू अभ्यास, व्यायाम, आहार, सकारात्मक दृष्टिकोन व चिकाटी ही पंचसूत्री त्यांनी युवापिढीला दिलीय हे मात्र खरे! दिल्लीतील अंतिम मुलाखतीचा त्यांचा अनुभव अंगावर शहरे आणणारा असाच आहे. विस्तृत वाचन व आत्मविश्वासाने त्यांनी दिलेली उत्तरे केवळ चौकार व षटकारच! शेवटचा प्रश्न तुम्ही या क्षेत्रात का येऊ इच्छिता? - या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी उद्धृत केलेली ला मांचा यांची कविता म्हणजे ऑइसिंग ऑन द केक. शेवटचा चेंडू शतकाला पाच धावा कमी. या कवितेने ठोकला षटकार! मुलाखतकाराच्या तोंडून शब्द आले ऑल द बेस्ट मि. विश्वास. थोड्याच दिवसात श्री. नांगरे पाटील आय.पी.एस. अधिकारी झाले. मित्रांनो यश असं मिळवायचे असते. लेखकाच्या बावनकशी अनुभवावर आधारलेले हे पुस्तक हे पुस्तक वाचलेच पाहिजे

लेखक : पी. एम. काळे,

फलटण

अंतिम सुधारित : 8/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate