অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षण – एक चांगली सवय

शिक्षण – एक चांगली सवय

एस.एस.एच्या मोहीमांचा चांगला मोबदला

हूशाराचा समुह

सरकारच्या बोवेनपल्लीच्या प्राथमिक शाळेच्या विर्द्यांथ्यांनी एस.एस.ए तर्फे आयोजीत केलेल्या मुलांच्या भाषा सुधार कार्यक्रमात भाग घेतला.
हैद्राबाद: सरकारी शाळांमध्ये घाणरडे गणवेश व फाटक्या चप्पलांमधील मुले हे चित्र असते. पण, त्यांचा दृष्टिकोन कोणत्याही मोठ्या शाळांच्या मुलांइतकाच बोर्डात व पेपरात चमकण्याचा असतो व त्यांचा कल चांगल्या प्रतीच्या शालेय शिक्षणाकडे असतो.
आश्चर्य कारक बाब म्हणजे पडक्या सरकारी शाळांत देखील आपल्या कला दाखवण्यासाठी मुलांनी प्रत्येक वर्गात एक लायब्ररी तयार केली आहे, व शाळेच्या घडामोडींचे वृत्तपत्र सुरु केले आहे. सर्व शिक्षण अभियान(एस.एस.ए.) अशा व्यावसाईक दृष्ट्या मागासलेल्या मुलांच्या चांगल्या वाचन व लिखाणासाठी  कार्यरत आहे. मागील वर्षापर्यंत, कविता नावाची ७वी इयत्तेत शिकणारी एक मुलगी, सरकारी माध्यमिक शाळेत बावेनपल्ली येथे सर्व सामान्य मुलांप्रमाणे शिकत होती जेथे काही खास सोई नव्हत्या. पण आज ती स्वतःच्या वर्गासाठी बातमीपत्र तयार करते व शाळेच्या वाचनालयाच्या समितीचे कामही स्वतः पाहते. वाचनालय समितीची मुले कोणती पुस्तके घरी नेतात व वाचतात याची नोंद ठेवते. ही पुस्तके काही वाचक मंडळींनी स्वखुशीने दिलेली वा शाळेच्या समितीने त्या भागातुन गोळा केलेली असतात. “ हा सर्वात छान असा ऊच्चप्रतीचा फरक पडलेला आहे ज्यामुळे आमच्यात फार चांगले बदल घडत आहेत.,” असे बी. विणा, म्हणते.
एन. ऊपेंद्र रेडडी, राज्य शैक्षणिक देखरेख अधिकारी, एस.एस.ए, हे मान्य करुन म्हणतात की, “ह्या मागचा हेतू मुलांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात पुढाकाराचे गुण वाढले पाहिजेत जसे इतर शाळकरी मुलांमध्ये दिसतात. आणि ह्या कार्यात ब-याच मुलांनी भाग घेऊन ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला.”
बातमी पत्र फलक हा उपक्रम मुलांमध्ये पेपर व वेगवेगळी मासिके वाचून ते फलकावर त्यांच्या स्वतःच्या नावाने लावल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, हे रंगारेड्डी नगर प्राथमिक शाळा, कुतूबुल्लापूर मंडळ येथे पहायला मिळते, जेथे मजूरांच्या गरिब मुलांमध्ये हा फरक पडलेला आहे. ५ वीत शिकणारा बाळू म्हणतो कि “यामुळे आपल्या स्वतः मधील गुण दाखवण्यास मदत होते,” . मुलांना प्रत्येक दिवशी एक पान लिहायला लावून मुलांचे लेखनाचे गुण वाढीला लागतात. प्रत्येक शाळेत पत्रपेटी ठेवण्यात आलेली आहे ज्यात मुले आपली मते, समस्या वा शाळे बद्दलचे आपले मत लिहून टाकतात. “ह्यामुळे फार मोठा चांगला फरक पहायला मिळाला आहे,” असे वी.मधुसुदन, फिरते सहकारी अधिकारी, एस.एस.ए म्हणतात.

मुळ : द हिंदु, रोजचे वृत्तपत्र ता. ९ आँगस्ट २००७

जमाती : फिरत्या जमाती व त्यांचे शिक्षण

लहान मुलींचे कार्यक्रम रंगारेड्डी जिल्हा आंध्रप्रदेश भारत

भारतात एम.व्ही. फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे जी बालमजुर मुलींसाठी कार्यरत आहे: फिरत्या जमाती आणि सरकार बालमजुरांवर काम करत आहेत. मुलींच्या कार्यक्रमामुळे अशा बालमजुर मुलींना शोधुन त्यांना शाळेत परत आणण्यात या संस्थेचा फार मोठा हातभार लागला आहे.
समाजातील पारंपारिक विचार व प्रथांना हे एक आव्हान आहे. मुलींच्या शिक्षणाचा अशा ज्वलंत विषयात हात घातल्यावर, त्यावर मार्ग निघायला लागले. ह्यामुळे सामाजिक स्थरात वाढ होऊन मुलींच्या बाजूने विजार केला गेला व त्यांना मजुरीतून बाहेर काढुन शिक्षण घेता येऊ लागले.
प्रथम तर मुलींच्या मजुरी बद्दल जमातीत जागृती आणणे महत्वाचे होते,  व त्याला वाचा फोडून अशा विषयांवर विचार होणे महत्वाचे होते. हे सर्व सामाजिक सभांमधुनच शक्य आहे. शाळेच्या शैक्षणिक संस्थांनी, मुलींसाठी शाळेत विशेष सोयी जसे प्रसाधनगृहे वा सुरक्षितता वाढविण्यास सुरवात केली आहे. मुलींसाठी काम करणा-या समाजसेविका, ज्यांना स्वतःलाही शिक्षण फार त्रासातून घ्यावे लागले अशा, मुलींच्या प्रश्नांना जास्त जांगल्या प्रकारे समजु शकतात. त्यांनी घरोघरी फिरत्या वस्त्यांना जाऊन, समजावले व, ११ मुलींच्या पालकांनी बालमजुरी थांबवुन त्यांना शाळेत पाठवायला सुरवात केली.
स्वतःच्या अनुभवांचा वापर करुन त्यांनी पालकांना शिक्षणाबद्दल पटवले व कसेतरी मुलींना लग्न होई पर्यंत तरी शिकवा म्हणून तयार केले. एकदा पालक तयार झाल्यावर लहान मुलींना शाळेत वा थोड्या मोठया मुलींना वस्तीशाळेत टाकले.  हे करत असताना त्यांनी पालकांना पैशाची मदत देखिल केली. त्यांनी मुलींना शाळेतून काढण्याच्या आकड्यांवर नजर ठेवली व आणखी मागासलेल्या जमातीतील बालमजुर मुलींना शाळेत आणण्यासाठीचेही प्रयत्न सुरु केले. या मोहीमांमुळे समाजसुधारक मुलींना मुली जमविण्यात त्यांना त्यांचे अनुभव सांगून, त्यांना समजाऊन व त्यांना पाठींबा देऊन यश आले. ह्या मुली मग दुस-या मुलींसाठी त्यांच्या पालकांसाठी व जमातिसाठी एक ऊदाहरण झाल्या. त्यांनी बालविवाह, खेड्यातले इतर विषय, किंवा मुलींना शाळेपासुन वंचित रहावे लागण्याच्या समस्या यासाठी देखील त्या झटत आहेत. मुली समाज सेविकांनी प्रत्येक कार्यक्रमात जाऊन या मुलींच्या शिक्षणाविषयी व त्यांच्यातील भेदभाव या विषयावर पालकांना समजावण्याचे काम केले. हळू हळू ह्याचे बिज पेरण्याचे काम ह्या समित्यांनी (लहान मुलींच्या हक्काचे संगोपन, आई, शाळेच्या मुली आणि युवा मुलींसाठी समिती) – सगळ्यांनी मिळून मजुर मुली व फिरत्या वस्त्यांमधील मुली यांसाठी काम अवलंबिले आहे.  नाटुकले व पगनाट्यांच्या आधारे लोकांमध्ये जनजागृती व समज देण्याचे काम केले. याचा परिणाम असा झाला की मजुर मुलींना मजुर म्हणुन न ठेवता त्यांना त्यातुन बाहेर काढून त्यांचा ऊद्धार करता आला,  त्यामुळे शाळेत व वसतिगृहांमध्ये प्रवेश वाढले व बालविवाहांना त्यांच्या पालकांशी चर्चेनंतर रोख लावली गेली वा रद्द केले गेले. ह्या एम.वी समितीला देश व विदेशात अशा प्रकारची जनजागृती करण्यात व मुलांची बालमजुरी थांबविण्यात यश आले. त्यावरुन इतर लोकांना एक चांगले उदाहरण मिळाले.
(मुळ: कामातून बाहेर आणि शाळेत प्रवेश, यु.नेस.को. )
२००१ च्या जनगणने नुसार आंध्रप्रदेशची जनगणती ७५.५ मिलीयन इतकी असून त्यात ६०.५% ही शिक्षीत जनता आहे. संपुर्ण जनगणने नुसार, ५ मिलीयन ही खेडयातली जमात असून त्यात फक्त १७% शिक्षित जनता आहे. हे आदीवासी वा भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, यांचा प्रथम व्यवसाय शेती असून, जंगलात सर्पण जमा करणे व मजुरी हा आहे. आंध्रप्रदेशच्या सरकारने देखिल बरेच साक्षरता ऊपक्रम राबविले ज्यात त्यांची गरिबी थोडी दूर होईल.  त्यातीलच एक ऊपक्रम म्हणजे गुरुकूलम – वस्ती शाळा ज्या फुकट शिक्षण देतीलच वर ज्यांना परवडत नाही अशांसाठी राहण्या-खाण्याची सोय देखील करतील. हे गुरुकूल शिक्षण संस्था, राज्य सरकारची  सार्वजनीक विकास केंद्रे आणि खेडी विकास केंद्रे चालवितात.
होल इन द वाँल लि. ही संस्था आंध्रप्रदेशच्या खेडी विकास केंद्रांबरोबर काम करत आहेत ज्यात राज्याच्या ४ जिल्ह्यात ४ शिक्षणाची ठाणी स्थापीत केली आहेत. ज्या खेड्यात ही ठाणी सुरु केली आहेत ती खेडी पार्वतीपूरम, श्रीसेलम, भद्रचलम आणि नागार्जुनसागर आहेत. ह्या ठाण्यांमधून पार्वतीपूरम, श्रीसेलम, भद्रचलमला खास शाळा आहेत ज्या आँगस्ट २००५ मध्ये सुरु झाल्या, ह्या शाळांमार्फत याच खेडूत मुलांमधील जरा हुशार मुले निवडून त्यांच्या प्रगतीकडे विषेश लक्ष दिले जाते. ह्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते, ज्यात दोन्ही मुले व मुली ८ ते १० वी पर्यंत शिक्षण घेतात.
नागार्जुनसागर येथील शाळेचे नाव आंध्रप्रदेश खेडी विकास  निवासी शाळा असून ही शाळा १९८६ ला सुरु झाली (प्रथम खेडूत समुह- मुले). या शाळेत एकुण ४५८ मुले आणि २३ शिक्षक काम करतात व ३ री ते १० वी पर्यंत वर्ग येथे आहेत. शिकवण्याची भाषा माध्यम तेलगु असून इंग्रजीही शिकवले जाते. या शाळेत संगणक लँब असून त्यात १५ संगणक आहेत. शाळा मुख्यतः फारच खेडूत समुहासाठी असून जास्तीतजास्त मुले ही पहिल्यांदाच शाळेत जाणारी आहेत.
मुळ: http://www.hole-in-the-wall.com/News10.html

यु.एनचा शैक्षणिक हक्कांवर नवा आराखडा

आराखड्यात काही व्यंग असलेल्या मुलांचा विचार केला असून त्यांना चांगल्या प्रतिचे शिक्षण मिळावे असा रोख आहे. यु.नेस.कोच्या मोठ्या हातभारामुळे,  चांगले व्यवस्थापन, देखरेख व वेगवेगळे मुद्दे लक्षात घेऊन हे साक्षात घडवता आले.

शाळांच्या वातावरणात बदल केल्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये स्फुर्ती आली.

सर्व शिक्षण अभियानांर्तगत, एक सामुहिक फिरती मोहीम यवतमाळ जिल्ह्यात मि. वसंत पुरके, महाराष्ट्राचे राज्य शिक्षण मंत्री व यु.नी.से.फ. यांच्या सौजन्यांने करण्यात आली, ज्यात पालकांना  आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्या बाबत सांगितले गेले. ही मोहीम ज्ञानरथ परिक्रमा किंवा ज्ञानाचा रथ या नावाने संबोधली जाते व ह्या मार्फत खेडोपाडी हा रथ फिरुन मुलांना शाळेत घालण्याचे फायदे समजावते व मुलांना पालकांनी शाळेत घालावे असा संदेश पोहोचविला जातो.

कोलकाताच्या रस्त्यावरच्या प्रत्येक मुलांची गणती

कोलकाता नगरपालिका, सरकारी खाती, यु.नि.से.फ, व एन.जी.ओ.चे कार्यकर्ते यांनी मिळुन कोलकाताच्या दुर्लक्षित भागातील प्रत्येक मुलाचा जन्म दाखला लागु केला, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यात व शैक्षणिक सुधारणेत व त्यांचा वेश्याव्यवसायापासून बचाव करण्यात हातभार लागला.

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate