অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंटरनेट

आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.

हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट`

इतिहास


१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला.

नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि 'इंटरनेट` चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्कमध्ये रूपांतरीत झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे.

इरनेट (एर्नेट

भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे. इरनेटचा उपयोग फक्त शिक्षण व संशोधन संस्थांना करता येतो.व्ही.एस.एन.एल. (विदेश संचार निगम लि.) ने १९९४ मध्ये इंटरनेटसाठी निविदा मागविल्या. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने परदेशी निविदा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. `कॉम्प्युसर्व्ह' नावावर अमेरिकेतील एका कंपनीने इंटरनेटची सेवा देणे सुरू केले. आता भारतातील कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ लागले आहे. व्ही.एस.एन.एल.ने स्वतंत्रपणे अशी सेवा (इंटरनेट अक्सेस सर्व्हीस) देणे सुरू केले. व्ही.एस.एन.एल.चे मुख्य केंद्र मुंबई असून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर व पुणे ही भारतातील शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडण्यात आली आहेत. इतरही शहरे हळुहळु या नेटवर्कला जोडली जाणार आहेत.

वापर पध्दतीइंटरनेटचा उपयोग करण्यासाठी संगणक, फोन याशिवाय त्या दोघांना जोडणारे मॉडेम नांवाचे उपकरण लागते. मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

इंटरनेट वरून तुम्हाला समजा माहिती पाठवायची असेल तर जेथे ती पाठवायची त्याचा सांकेतिक क्रमांक देऊन ती पाठवावी लागते. ही माहिती जशीच्या तशी न जाता आधी त्याचे छोट्या भागांत (पॅकेज) रूपांतर केले जाते हे भाग कमी जास्त लांबीचे असू शकतात. हे भाग रूटर नावाच्या विशिष्ट संगणकाव्दारे एका नेट वरून दुसऱ्या नेटवर असे करत योग्य पत्त्यावर पाठविले जातात. (जणू काही वेगवेगळया बॅगांमधून पाठविलेले सामान) ज्या ज्या ठिकाणाहून भाग घेतले वा पाठविले जातात तेथे अनेक मार्गांनी माहितीची पाकिटे येत असतात. ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी देखील अनेक मार्ग उपलब्ध असतात.

त्यामुळे कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे व वेळ कमी लागेल याचा विचार करून प्रत्येक पॅकेज पाठविले जाते. हे सर्व अतिशय वेगात चालत असल्याने वेगवेगळया मार्गाने प्रवास करूनही हे भाग अत्यल्प वेळात मुक्कामी पोचतात. त्याचवेळी इतर ठिकाणहून माहिती येत असल्यास त्याचा क्रम लावला जातो. व पोस्ट बॉक्ससारखी त्या संगणाकावर सर्व माहिती साठवून ठेवली जाते. म्हणजे रोज कामाला सुरूवात करण्यापूर्वी कोणाकोणाची पत्रे आली आहेत ते ही पोस्ट बॉक्स उघडून पाहता येते. ज्या ठिाकणी माहिती जावयाची तेथे दुसरे काम चालू असल्यास मध्येच तातडीची खिडकी पडद्यावर येऊन माहिती आल्याची

इंटरनेट व फॅक्स

इंटरनेटवरील इ मेल (इलेक्ट्नॅनिक मेल) आणि फॅक्स यांची तुलना केली. फॅकस कमी वेळात नियोजित स्थळी पाठविता येतो. इ मेल नेटवर्कवरील रहदारीवर अवलंबून असल्याने त्यास वेळ लागू शकतो. मात्र फॅक्ससाठी बराच खर्च येतो. एक पान माहितीसाठी भारतातल्या ठिकाणी १० रूपये तर अमेरिकेतील ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च येतो. इ मेलसाठी फक्त फोनचा खर्च येत असल्याने तो नाममात्र असतो. फॅक्स ज्याला पाठवायचा त्यालाच तो मिळाला का दुसऱ्याने घेतला व फॅक्सचे ुत्तर त्याने परत फॅक्स केला तरच मिळू शकते. इ मेल मात्र योग्य त्या माणसाच्या सांकेतिक क्रमांकावर जात असल्याने त्याच्याशिवाय दुसऱ्याला मिळत नाही.

तो मिळाला की नाही ते लगेच कळू शकते व थोड्याच वेळात त्याचे उत्तरही आपल्या संगणकावर मिळू शकते. आपण फॅक्स पाठविणार पाठविणार तो बाहेरगावी गेला असेल वा प्रवासात असेल तर त्याला फॅक्स मिळू ाकत नाही. इ मेलमध्ये पत्ता म्हणजे एक सांकेतिक क्रमांक असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

इ मेल

इंटरनेटवरून पाठविलेल्या माहितीवर गुप्तता ठेवणे कठीण असते. पुष्कळ वेळा इ मेलवरील माहितीवर नजर ठेवली जाते. अर्थात इंटरदेटवरून माहितीच्या देवाणघेवाणीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की असे लक्ष ठेवणे वा माहिती विना परवाना वापरणे या गोष्टी कठीण आहेत. तरीही खाजगी कंपन्याना इंटरनेटव्दारे आपली माहिती बाहेर फुटण्याचा धोका वाटतो. यासाठी त्यांच्याकडे संरक्षक व्यवस्था ठेवणारे प्रोग्रॅम (फायरवॉल सारखे) वापरले जातात. पुष्कळ कंपन्या सर्व माहिती विशिष्ट सांकेतिक पध्दतीने बदलून इंटरनेटवर सोडतात. ज्यांना ती सांकेतिक लिपी माहीत असेल त्यांनाच त्याची उकल होऊ शकते. संरक्षण, गुन्हा अन्वेषण, संशोधन संस्था अशाप्रकारे इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करतात.


इंटरनेटवरील काही माहिती प्रचार वा प्रसारासाठीच असते. बातम्या, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, वस्तूंच्या किंमती, देखभाल व दुरूस्ती, शिक्षण. ग्राहक सेवा, पर्यावरण संरक्षण इत्यादी अनेक प्रकारची माहिती कोणासही सहजपणे विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था इंटरनेटवर करण्यात आलेली असल्याने शिक्षण, व्यापार, संस्कृती, राजकारण यांच्या प्रसारास 'इंटरनेट ` हे महत्वाचे साधन झाले आहे. शिवाय इंटरनेट ही कोणा एकाची मालमत्ता नाही. जो कोणी इंटरनेटशी आपला संगणक जोडेल त्याचा तो हक्कदार होतो.

इंटरनेटवर खालील सेवा पुरविल्या जातात  1. इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो.
  2. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात.
  3. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करून घेऊ शकता.
  4. जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो.
  5. करमणुकीसाठी नवीन साधने उपलब्ध होतात.


जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे ही शक्यता आता दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत एका देशातील बुध्दीमत्ता तेथील इतर परिस्थिती योग्य नसल्याने त्या देशास वापरता येत नव्हती. त्यामुळे बुध्दीमान लोक प्रगत राष्ट्नत जाऊन बुध्दीमत्तेच्या साठ्यास गळती लागून (ब्रेन ड्न्ेन) प्रगतशील राष्ट्नना नव्या धोक्याला सामोरे जावे लागत होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्नत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुले खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो. टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते. सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.

बी.बी.एस्. (बुलेटीन बोर्ड सिस्टीम) कंपन्या माहिती साठवून ठेवणे व वितरीत करणे या पध्दतीने काम करतात. या ठिकाणी आपण केव्हाही माहिती पाठवूश शकतो. घेणाऱ्याचा संगणक चालू नसला तरी अशा कंपन्यांच्या सहाय्याने ही माहिती पाठविता येते.वर्ल्ड वाइड वेब (www) या सर्वांना वाचता येऊ शकेल असे पान (साईट) अनेक कारणांसाठी कंपन्या तयार करतात. त्यांना एक विशिष्ट संकेतक्रमांक मिळतो. यालाच संकेतस्थळाच्या नावाने ओळखता येते. छोट्या कंपन्या अशा पानाचा छोटा हिस्साही आरक्षित करू शकतात. या पानावर वर्णनात्मक वा चित्रमय माहिती असते. वर्णनात्मक माहितीतून आवश्यक ते शब्द पकडून वाचकास त्या शब्दाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकते. अशा वर्णनाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) असे म्हणतात.

गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.इंटरनेटवर वेगवेगळया प्रकारचे संगणक जोडले जाण्याची किमया व त्यात संपर्क साधण्याची शक्यता टी.सी.पी./आय.पी. (ट्नन्स्मिशन कंट्नेल प्रोटोकोल/इंटरनेट प्रोटोकोल या नियम प्रणालींचा वापर केल्याने प्रत्यक्षात आली आहे. इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक सुलभ व प्रभावीपणे करता येणार आहे.

इ मेल हा इंटरनेटचा प्राथमिक उद्देश वाटला तरी प्रत्यक्षात वापर करमणुकीसाठी खेळ, चित्रपट आणि संगीत यांच्या आदान प्रदानासाठी जास्त होत आहे.इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील राष्ट्नंना एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.

स्त्रोत - ज्ञानदीप© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate