2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली. प्रती गट - एक शाळा या प्रमाणात बुद्धीमान ग्रामीण बालकांना दर्जेदार शिक्षण देता यावे, यासाठी उत्कृष्टतेचा मापदंड असणा-या आदर्श शाळा उभारणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेचे उद्देश पुढीलप्रमाणे:-

प्रत्येक गटामध्ये दर्जेदार उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध करणे (किमान एक)

साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षणक्रमाचा वापर करणे.

पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि शालेय प्रशासनासंदर्भात आदर्श भूमिका

योजनेची अंमलबजावणी दोन प्रकारे होते.

शैक्षणिकदृष्ट्या मागास भागांमध्ये राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांमार्फत

शैक्षणिकदृष्ट्या मागास नसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक - खाजगी भागीदारीमार्फत

Model School Scheme

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/FrmModelSchool.aspx?ID=11