आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन प्रश्नोत्तरे आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन २. त्याची आवश्यकता काय आहे गरीब आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शिक्षणाची उन्नती व्हावी. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टीएसी-१३७७/इडी-२२६०७/१२०८-(एसी)-१५/पर्यटन दिनांक-११ ऑगस्ट १९७७ अन्वये राबविण्यात येत आहे. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ इयत्ता मुलांना मुलींना ५ वी ते ८ वी रुपये ४० रुपये ५० ८ वी ते १० वी रुपये ५० रुपये ६० स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन