इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण प्रश्नोत्तरे इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण १ सेवेचे नाव किंवा उपक्रम इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण २ त्याची आवश्यकता काय ? राज्यातील १८ वर्षापर्यंतच्या सर्व अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे. ३ कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? शासन निर्णय क्रमांक एफईडी/२००१/(१११/०१) केंपुयो दिनांक ७ जून २००५ नुसार कार्यवाही केली जाते. ४ कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद,कार्यालय ५ माहितीसाठी अर्ज - किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे ज्या योजनेची माहीती आवश्यक असेल त्या योजनेचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहीती बाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे.अपंगत्वाच्या दाखल्या सह ६ अर्ज कोठे सादर करावा? शिक्षणाधिकारी ,(माध्यमिक ) जिल्हा परिषद कार्यालय ७ सेवा मिळण्यास कालावधी ? वर्षभर ८ उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? शिक्षण संचालनालय (माध्यमिक उच्च माध्यमिक )महाराष्ट्र राज्य पुणे -१ स्त्रोत : महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)