इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण प्रश्नोत्तरे इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण २. त्याची आवश्यकता काय आहे राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळावे. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-१०८४(२५६८)साशि-५ मंत्रालय विस्तार भवन,मुंबई-३२ दिनांक ०६ फेब्रुवारी ११८७. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा सबंधित शाळेचे मुख्याध्यापकांकडे सादर करावा.शाळेचे/शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १