राज्याच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडापटू घडविण्यासाठी तसेच मैदानांच्या विकासासाठी विविध योजना कार्यन्वित आहे. या सर्व माध्यमांतून राज्यात गुणवंत खेळाडू तयार व्हावे आणि त्यांनी आपल्या राज्याचे पर्यायाने देशाचे नाव जगात उज्ज्वल करावे असा एक महत्वाचा उद्देश या योजनांमागे आहे. गावपातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर खेळ व खेळाडूंसाठी अनेक प्रकारच्या सुविधा व्हाव्यात म्हणूनही विविध योजनांच्या माध्यमातून क्रीडांगणासाठी अनुदानही दिले जाते. अशाच काही योजनांची ही थोडक्यात ओळख.. .. गावपातळीवर खेळाडू तयार झाले तर ते पुढे तालुका व जिल्हास्तरावर मैदान गाजवून राज्यस्तरावर वा राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करु शकतात. मात्र त्यासाठी त्यांना त्या त्या गावी काही सुविधांची गरज असते. अगदी हेच पहा.. गावची व्यायाम शाळा जरी अत्याधुनिक झाली तरी खूप काही फरक पडून चांगले खेळाडू मिळू शकतात. म्हणूनच व्यायामशाळा विकास योजना क्रीडा विभागाने सुरू केली. क्रीडा व खेळाचा विकास, पारंपारिक खेळ व क्रीडा विषयक बाबींचे जतन, व्यायाम शाळा व तालीम यांच्या माध्यमाद्वारे होत असतो. म्हणूनच युवकांची शारिरीक सदृढता वाढविणे हा मूळ उद्देश घेऊन व्यायामशाळा विकास योजना क्रीडा विभागाने सुरू केली. या योजनेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
क्रीडांगण अधिक सुसज्ज व विकसीत करण्यासाठीही महत्वाची अशी क्रीडांगण विकास योजना आहे.
स्त्रोत : महान्यूज |
अंतिम सुधारित : 8/2/2020
सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विका...
आशियातील खेळाडूंसाठी सुरू झालेले आंतरराष्ट्रीय साम...
ट्रॅक्टरचलित "क्रिडा' टोकणयंत्राचा वापर केल्यास उ...
आपल्या खेळाबद्दलच्या भावना आणि संस्कृती जपण्यासाठी...