ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी

प्रश्नोत्तरे

ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी

१.

सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) .

ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी

२.

त्याची आवश्यकता काय आहे?

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे.

३.

कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते?

शासन निर्णय शिक्षण व समाजकल्याण विभाग क्रमांक इबीसी/१७६३/एच दिनांक १९ जून १९६४

४.

कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा?

शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.

५.

माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा?

आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.

६.

अर्ज कोठे सादर करावा?

संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.

७.

सेवा मिळण्यास कालावधी

अनुदान उपलब्धतेवर.

८.

उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा?

संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प

स्त्रोत -  महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)