टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे प्रश्नोत्तरे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे २. त्याची आवश्यकता काय आहे दुष्काळ पडलेल्या गावातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांना परीक्षा फीची प्रतिपूर्ती करून आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-१५९२/१२०२/(११३२)साशि-५ दिनांक-१८/१०/१९९३. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन