नक्षल विरोधी कारवाई कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व सवलतीबाबत, मोफत शिक्षणाची सवलत प्रश्नोत्तरे नक्षल विरोधी कारवाई,नक्षलवादी हल्ल्यात मृत पावलेले /जखमी झालेल्या पोलीस अधिकारी /कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व इतर सवलतीबाबत मोफत शिक्षणाची सवलत देण्याबाबत १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . नक्षल विरोधी कारवाई,नक्षलवादी हल्ल्यात मृत पावलेले /जखमी झालेल्या पोलीस अधिकारी /कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व इतर सवलतीबाबत मोफत शिक्षणाची सवलत देण्याबाबत. नक्षल विरोधी कारवाई,नक्षलवादी हल्ल्यात वीर मरण पत्करलेल्या पोलीस,गृहरक्ष दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा/महाविद्यालयातील(फक्त इयत्ता १२ वी पर्यंत) शिक्षणाचा खर्च शासनामार्फत केला जातो.सदर विद्यार्थी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जरी शिक्षण घेत असल्यास त्यांना त्या शाळेने/संस्थने विहित केलेले सर्व शैक्षणिक शुल्क अदा करण्यात येते. २. त्याची आवश्यकता काय आहे नक्षल विरोधी कारवाई/नक्षलवादी हल्ल्यात वीर मरण पत्करलेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सदर सवलत दिली जाते. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शासन निर्णय क्रमांक एफईडी २००९/(८८/०९) केपुयो दिनांक २८/०७/२००९ नुसार कार्यवाही केली जाते. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा संबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १