राज्याचे पर्यटन धोरण निश्चित करण्यात आले असून राज्यातील पर्यटन धोरणाला चालना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे अशी पर्यटन विभागातर्फे विंनती करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळाशी संलग्नीत शाळांतील इयता ५ ते १० मधील विद्याथ्याँचा ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयाच्या जानवाढीसाठी शैक्षणिक सहल अथवा ग्राम पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल अथवा ग्राम पर्यटनाच्या वेळी ऐतिहासिक,भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहिती मिळावी, तसेच त्या गोष्टीं प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाची यासाठी एका शैक्षणिक वर्षांमध्ये एक शैक्षणिक सहल अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास शाळांना मान्यता देण्यात आली आहे.
मात्र अशा सहलींच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांनवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही.
सहलीमध्यें सहभागीं होण्याकरिता संबंधित पालक आणि विद्यार्थ्यांची संमती असणे आवश्यक राहील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलबध असून त्याचा संकेताक्र. 201705201500581321 असा आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने दिनांक २० मे २०१७ रोजी जारी केला
स्त्रोत : लोकराज्य मासिक, जुलै २०१७
अंतिम सुधारित : 2/2/2020
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ : महाराष्ट्र...
पर्यटन आणि विकास या विषयक माहिती.