इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे.
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येईल.
खर्चाची बाब |
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी |
महसूल विभागीय शहर व 'क' वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी |
उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी |
भोजन भत्ता (वार्षिक) |
32000 रु. |
28000 रु. |
25000 रु. |
निवास भत्ता (वार्षिक) |
20000 रु. |
15000 रु. |
12000 रु. |
निर्वाह भत्ता (वार्षिक) |
8000 रु. |
8000 रु. |
6000 रु. |
एकूण (वार्षिक) |
60 हजार रुपये |
51 हजार रुपये |
43 हजार रुपये |
टिप :- वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू.पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे आवश्यक कागदपत्रासह दाखल करावेत.
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/7/2023
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...