महाराष्ट्र छात्रसेना योजना माहिती तक्ता महाराष्ट्र छात्रसेना योजना १.योजनेचे नाव व प्रस्तावना महाराष्ट्र छात्रसेना योजना. २.योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व,चारित्र्य,बंधुत्व,खेळाडूवृत्ती,सेवाभाव इत्यादी गुणांचे संवर्धन निर्माण होण्यासाठी राज्यातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत शासनाने १९९६-९७ पासून कार्यान्वित केले त्यानुसार आता सदर योजना इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक राहील.परंतु सर्व माध्यमिक शाळांसाठी अनिवार्य राहील. ३.योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये छात्रवृत्ती जोपासावी ,देशप्रेमाची जागृती व्हावी . ४.अंमलबजावणी यंत्रणा शिक्षण संचालक,शालेय शिक्षण विभाग हे या योजनेची राज्यस्तरावरील अंमलबजावणी करतात माहिती संकलक : अतुल पगार