शासन निर्णय क्रमांक एफईडी २००८/(१५९/०८) केपुयो दिनांक २३/०१/२००९ नुसार कार्यवाही केली जाते. प्रश्नोत्तरे तक्ता दि.२६/११/२००८ ते २९/११/०८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत देणेबाबत व इतर सवलतीबाबत. १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . दि .२६/११/२००८ ते २९/११/०८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत देणेबाबत व इतर सवलत योजना. दि .२६/११/२००८ ते २९/११/०८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात वीर मरण पत्करलेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा/महाविद्यालयातील(फक्त इयत्ता १२ वी पर्यंत) शिक्षणाचा खर्च शासनामार्फत केला जातो.सदर विद्यार्थी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्यास त्यांना त्या शाळेने/संस्थने विहित केलेले सर्व शैक्षणिक शुल्क अदा करण्यात येते. २. त्याची आवश्यकता काय आहे आतंकवादी हल्ल्यात मरण पत्करलेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सदर सवलत दिली जाते. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शासन निर्णय क्रमांक एफईडी २००८/(१५९/०८) केपुयो दिनांक २३/०१/२००९ नुसार कार्यवाही केली जाते. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा संबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन