परिचय
2008-09 साली ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु झाली आणि 2009-10 साली त्यावर अंमलबजावणी सुरु झाली. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये (EBB) शंभर खाटांचे मुलींचे वसतिगृह उभारणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. यापूर्वी खाजगी संस्थांमार्फत मुलींसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींसाठी वसतिगृह स्थापन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्य दिले जात असे. त्या बदल्यात ही योजना सुरु करण्यात आली.
उद्दिष्टे
शाळेपासून घर दूर असणे, पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थींनींना आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, हा या योजनेचा दुय्यम हेतू आहे..
लक्ष्य गट
14 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यक समुदाय तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील इयत्ता नववी आणि बारावी दरम्यानच्या वर्गातील मुलींचा गट, हा या योजनेचा लक्ष्य गट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जाईल. किमान 50% विद्यार्थीनी अ.जा, अ.ज., इमाव आणि अल्पसंख्यक समुदायातील असतील.
माहिती संकलक : अतुल पगार