राष्ट्रीय साधने-कम-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
प्रस्तावना
राष्ट्रीय साधने-कम-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारने मे २००८ मध्ये सुरु केली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पुरस्कृत करणे, माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे जेणेकरून ते वर्ग ८वी नंतर शिक्षण सोडणार नाहीत ही या योजनेची उद्दिष्टे आहे.
शिष्यवृत्ती ची रक्कम
प्रत्येक वर्षी या शिष्यवृत्ती साठी सरकार अनुदानित शाळांमधून, स्थानिक संस्थाच्या शाळांमधून किंवा राज्य शासनाच्या शाळांमधून निवडण्यात आलेल्या विद्यार्थांना वर्ग ८वी ते १०वी पर्यंत प्रत्येक वर्षी रु.६००० (रु.५०० प्रति महिना) देण्यात येते.
पात्रतेचे निकष
- ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न १,५०,००० पेक्षा कमी आहे, असे सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारच्या नियमानुसार यावर आरक्षण आहे.
- विदयार्थी हा नियमित विद्यार्थी म्हणून सरकारी, स्थानिक संस्थाच्या किंवा सरकार अनुदानित शाळेत शिकत असावा. जे विध्यार्थी केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकत असतील त्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्याचा हक्क नाही. राज्य शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळेत शिकणारे विद्यार्थी, ज्यांना राहण्याची, खाण्याची आणि शिकण्याची सुविधा पुरवली जातेय असे विद्यार्थी आणि जे विद्यार्थी खाजगी शाळेत शिकत आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र नाहीत.
- या शिष्यवृत्तीच्या निवड प्रक्रियेदरम्यान विद्यार्थाने कमीत कमी ५५% गुण किंवा इयत्ता ८वी च्या परीक्षेत समांतर ग्रेड मिळवलेली असावी. अनुसूचित जाती जमातीसाठी ५% ची सवलत शिथिल केलेली आहे.
- माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक किंवा वर्ग ९वी ते १२वी मध्ये देण्यात येणारी शिष्यवृत्ती ही जास्तीत जास्त ४ वर्षांपर्यंत आणि फक्त भारतामध्ये शिक्षण घेण्याकरिता देण्यात येईल.
निवड प्रक्रिया
शिष्यवृत्ती देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड ही राज्यशासनाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे होईल. प्रत्येक राज्य/केन्द्रशासित प्रदेश विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर (टप्पा २) परीक्षेतील नामांकनाकरिता NCERT द्वारे परीक्षा आयोजित करीत असते. अशाच प्रकारची परीक्षा प्रत्येक राज्याने\केंद्रशासित प्रदेशांने राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेसाठी घ्यावी.
योजनेच्या अधिक माहितीसाठी (हिंदी) या लिंकवर क्लिक करावे .
स्रोत : पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 8/11/2023
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.