অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

प्रस्तावना

मुलभूत दुर्बलतेचा प्रतिकार करण्याबरोबरच आयुष्य आत्मसन्मानाने जगण्यासाठी प्राथमिक शिक्षण हा समावेशक आणि स्वातंत्र्यदायक असा मूलभूत घटक आहे. तर कोणत्याही देशात अर्थव्यवस्था बदलण्याच्या दृष्टीने, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आणि समृध्दी प्राप्त करण्याच्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण हे प्रवेशद्वारासारखेच महत्वाचे आहे. माध्यमिक शिक्षण देशातील युवकांसाठी कामाचे द्वार खुले करते आणि देशाच्या सामाजिक - आर्थिक विकासात मोलाची भूमीका बजावते. शैक्षणिक विकासाच्या मार्गावर माध्यमिक शिक्षण हा एक महत्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाच्या दृष्टीने पूर्वतयारी होते आणि कामकाजाच्या जगात पाऊल टाकण्याचीही पूर्वतयारी होते. भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरण आणि जागतिकीकरण लक्षात घेता जगातील झपाटयाने होणा-या वैज्ञानिक आणि तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्याचे प्रमाण कमी करत राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करताना, विद्यार्थ्यांना आठ वर्षांच्या प्राथमिक शिक्षणानंतर ज्ञान आणि कौशल्यांची पातळी वाढवणारे माध्यमिक शिक्षण प्राप्त होणे गरजेचे आहे. इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीपेक्षा उच्च गुणवत्ता अपेक्षित असलेल्या माध्यमिक शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांच्या / प्रमाणपत्रधारकाच्या क्षमतेतही ही वृध्दी दिसून येणे आवश्यक आहे.
माध्यमिक शिक्षणाची पोहोच वाढवणे आणि दर्जा सुधारणे, हे हेतू नजरेसमोर ठेवून मार्च 2009 –10 साली राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीपर्यंत अर्थात 2017 सालापर्यंत माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक स्तरावर उपलब्ध करणे, निर्धारित अटींच्या साहाय्याने सर्व माध्यमिक शाळांचा दर्जा सुधारणे, लिंगाधारीत, सामाजिक, आर्थिक अथवा अक्षमतेचे सर्व अडसर दूर करणे असे या योजनेचे अन्य हेतू आहेत. 2020 सालापर्यंत सर्वाधिक धारकतेचे उद्दिष्टे योजनेत समाविष्ट आहे.

या योजनेअंतर्गत उपलब्ध मुख्य ठोस सुविधा पुढीलप्रमाणे

  • अतिरिक्त वर्गखोल्या,
  • प्रयोगशाळा,
  • वाचनालये,
  • कला आणि हस्तकला कक्ष,
  • प्रसाधनगृहे,
  • पेयजल सुविधा आणि
  • दुर्गम भागात शिक्षकांसाठी निवासी वसतीगृहे.

योजनेअंतर्गत उपलब्ध महत्वपूर्ण दर्जावृध्दी सेवा पुढीलप्रमाणे

  • शिक्षक विद्यार्थी प्रमाण 30:1 असावे, यासाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक ,
  • विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष,
  • शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण,
  • वैज्ञानिक प्रयोगशाळा,
  • ICT आधारित शिक्षण,
  • अभ्यासक्रम फेररचना आणि
  • अध्ययन, अध्यापन फेररचना.

योजनेअंतर्गत समानता राखण्याच्या दृष्टीने नियोजित सुधारणा

  • सूक्ष्म नियोजनावर विशेष भर
  • आश्रमशाळांच्या सुविधा सुधारण्याला प्राधान्य
  • नवीन शाळा सुरु करताना अ.जा./अ.ज., अल्पसंख्यक बहुल भागांना प्राधान्य
  • दुर्बल घटकांसाठी विशेष प्रवेश मोहिम
  • शाळांमध्ये अधिक स्त्री शिक्षिका आणि
  • मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह

रा मा शि अ चौकट (PDF Size: 287KB. अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा)
PAB Minutes with letter

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत - महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषद

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate