राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना /राज्य शिक्षक पुरस्कार योजना | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/उपक्रम(विषय). | १).राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना २).राज्य शिक्षक पुरस्कार योजना |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना सुरु झाली.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकपासुन दोन आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना कार्यन्वित आहे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | अ).राष्टीय शिक्षक पुरस्कार योजना सन १९९५-५९ पासुन केंद्र शासनाने सुरु केलेली आहे. ब).राज्य शिक्षक पुरस्कार योजना सन १९६२ मध्ये राज्य केंद्र शासनाने सुरु केलेली आहे |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | जिल्हयातील संबंधित शिक्षकांनी संबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे संपर्क साधुन विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे |
५. | माहितीसाठी अर्ज किती प्रती ,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावे. | संबंधित शिक्षकांनी त्यांचे विहित नमुन्यातील प्रस्ताव ३ प्रतीत जिल्हयाच्या संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे.तसेच प्रस्तावासोबत विहित नमुन्यातील प्रपत्र भरुन शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक)यांच्याकडे सादर करावेत |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी प्रत्येक वर्षी जानेवारी मध्ये(राज्य शिक्षक पुरस्कार)जाहीर केली जाते.व केंद्र शासनाची यादी जुलै/ आँगष्ट मध्ये जाहीर केली जाते |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/18/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...