राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) | राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाज सेवेचे शिक्षण मिळावे म्हणून महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९६९ पासून राष्ट्रीय सेवा योजना केंद्र शासनाने सुरु केली आणि महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच ती अंगीकारलेली आहे.+ २ स्तरासाठी ही योजना सन १९९५ पासून सुरु करण्यात आली आहे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असल्यामुळे अनुदानाप्रित्यर्थ होणार्या खर्चाची विभागणी केंद्र व राज्य शासनाकडून ७:५ याप्रमाणे होते.या योजनेसाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी विद्यार्थी संख्या मंजूर करून घेणे,त्यांचे योग्य प्रमाणात सर्व विद्यापीठांमध्ये वाटप करणे,केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा एकत्रित करून अनुदान मंजूर करणे,अनुदानाचे हिशेब पडताळून स्विकारणे आणि या योजनेशी निगडीत,सर्व प्रकारची कामे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मंत्रालयीन स्तरावर सुरु करण्यात आलेल्या कक्षामार्फत करण्यात येतात.तसेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून / विद्यापीठांकडून या योजनेसंबंधी वार्षिक अहवाल मागवून राज्याचा एकत्रित अहवाल केंद्र शासनाकडे या कक्षाद्वारे पाठविण्यात येतो. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | प्रत्येक वर्षी मंजूर झालेली विद्यार्थी संख्या आठ विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयांना पाठविली जाते.युनिट मंजूरीचे अधिकार संचालनालयाने त्यांना प्रदान केले असल्याने त्यांचे कार्यालयाशी संपर्क करावा. |
५. | माहितीसाठी अर्ज किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत ? | अर्जाची एक प्रत व कनिष्ठ महाविद्यालयाची तुकड्या,विद्यार्थी संख्या यांची सविस्तर माहिती द्यावी.संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय त्याची प्रत शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक),म.रा.पुणे यांच्याकडे द्यावे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे सादर करावा. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय ठरवेल |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | +२ स्तर समन्वयक तथा सहाय्यक शिक्षण संचालक,स.पुस्तक शाखा,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 7/22/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...