शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना यावर्षापासून पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणकीय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे.

या अभ्यासक्रमांना लागू होणार योजना

व्यावसायिक शिक्षणक्रमांतर्गत आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांतर्गत येणारे

वैद्यकिय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग.

तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि एचएमसीटी हे पदवी व पदविका स्तरावरील अभ्यासक्रम.

वास्तुशास्त्र हा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम.

एम.बी.ए., एम.एम.एस, एम.सी.ए. हे पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम.

कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत येणारे कृषी, दुग्ध व्यवसाय विकास, कृषी व संलग्न विषय.

कृषी, जैव तंत्रज्ञान, कृषी, अन्न व तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांना ही योजना लागू आहे.

काय होणार लाभ

प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100 टक्के.

इतर मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 50 टक्के प्रतिपूर्ती त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी शासकीय कोट्यातूनच प्रवेश घेतलेला असावा.

कोणाला होणार लाभ

महाराष्ट्रातील रहिवासी तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.50 लाखाच्या मर्यादेत असावे.

खुल्या वर्गातून प्रवेश घेतलेल्या प्रवर्गातील विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

संकलन - धोंडिराम अर्जुन,

स्त्रोत : महान्युज