महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. शासनाने विशेष प्रयत्नांचे क्षेत्र म्हणून आदिवासी शिक्षणाचा विचार केलेला आहे. महाराष्ट्रात आश्रमशाळांनी आदिवासी शिक्षणासाठी फार मोठे कार्य केले आहे. आश्रमशाळेसंबंधी महत्वाच्या योजनांची माहिती देणारा हा लेख …
महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्र विकासाचा दृष्टिकोन स्विकारण्यात आला. अशा भागाचा मुलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा असावी. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश, अंथरुण-पांघरुण, पुस्तके व इतर लेखन साहित्य इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येतात.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित मुख्याध्यापक आश्रमशाळा यांच्याशी संपर्क साधावा.
आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असलेल्या स्वेच्छा संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळांना 1953-54 पासून अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या आश्रमशाळात आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेष, शैक्षणिक साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगार व परिक्षणासाठी विहित प्रमाणात अनुदान शासनाकडून देण्यात येते.
शासकीय/अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणाऱ्या हुशार/बुद्धिवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरुपाची शाळा राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
आश्रमशाळातून शिक्षण घेणाऱ्या हुशार / बुद्धिवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या मुलांना शिक्षण देणे.
एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा (केंद्र पुरस्कृत पब्लिक स्कूल)
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे यासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे. अशा शाळेत इ. 5 वी ते इ. 10 वीपर्यंत शिक्षण देण्यात येते.
अशा इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा 1) पेठरोड, नाशिक, जि. नाशिक. 2) बोर्डी ता. डहाणू, जि. ठाणे. 3) तालुस्ते (बडनेरा) ता. नांदगाव खांडेश्वर 4) चिखलदरा, ता. धारणी, जि. अमरावती 5) खैरी परसोडा, ता.जि.नागपूर येथे आहेत.
अशा निवासी शाळेत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन, गणवेश, अंथरुण-पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक किंवा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.
माहिती लेखन - विभागीय माहिती कार्यालय,
कोंकण भवन, नवी मुंबई.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...