शासकीय विद्यानिकेतने | |
---|---|
योजनेचे नाव व प्रस्थावना | शासकीय विद्यानिकेतने विद्यार्थांच्या अंगी बौद्धिक व शारिरिक शिस्त बाणावी,त्यांना सहजीवनाची सवय लागावी,त्यांच्या ठिकाणी सहकार्याने काम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी,अंगीकृत सामाजिक कर्तव्यात व सेवेत निष्ठापूर्वक परिश्रम करण्याची वृत्ती त्यांच्यात वृद्धिंगत व्हावी व निर्भयता वाढावी यासाठी या विद्यानिकेतनामध्ये वसतीगृहात्मक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. |
योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पुसेगाव जिल्हा सातारा,धुळे,औरंगाबाद,अमरावती आणि केळापूर,जिल्हा यवतमाळ ही पाच शासकीय वसतिगृहात्मक विद्यानिकेतने आहेत.त्यात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या निकषानुसार प्रवेश दिला जातो.त्यासाठी त्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते व गुणानुक्रमे दरवर्षी इ.५ वी मध्ये ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.शासन निर्णय क्र.एसएसजी-१०९५/८१९५/९५/माशि-८, दि.२७ सप्टेंबर १९९५ अन्वये १९९६-९७ पासून शासकीय विद्यानिकेतन,केळापूर याचे सामान्य विद्यानिकेतनात रुपांतर करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च उत्पन्नाच्या निकषानुसार शासन करते.विद्यानिकेतनाची कार्यपध्दत्ती आणि व्यवस्थापन यासाठी एक राज्यस्तरीय नियामक मंडळ नियुक्त करण्यात आले असून,मा.राज्यमंत्री (शालेय शिक्षण) हे या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत व मा.प्रधानसचिव,शालेय शिक्षण हे या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. |
योजनेचा उद्देश | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे.तसेच आदिवाशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ,त्यांना शिक्षण सुविधा दिल्या जाव्यात.विद्यार्थांच्या अंगी बौद्धिक व शारिरिक शिस्त बाणावी,त्यांना सहजीवनाची सवय लागावी,त्यांच्या ठिकाणी सहकार्याने काम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी,अंगीकृत सामाजिक कर्तव्यात व सेवेत निष्ठापूर्वक परिश्रम करण्याची वृत्ती त्यांच्यात वृद्धिंगत व्हावी व निर्भयता वाढावी यासाठी या विद्यानिकेतनामध्ये वसतीगृहात्मक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.यासाठी पाच शासकीय वसतीगृहात्मक विद्यानिकेतने आहेत. |
अंमलबजावणी यंत्रणा | शासन आदेशानुसार संचालनालयाकडून शासकीय विद्यानिकेतन यांना अनुदान दिले जाते. विभागीय शिक्षण उप संचालक यांच्यामार्फत कार्यवाही व नियंत्रण केले जाते. |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 1/30/2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...