शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे माहिती तक्ता शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे १. सेवेचे नाव / उपक्रम(विषय). शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. २. त्याची आवश्यकता काय आहे शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जाते. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) जिल्हा परिषद व शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक,महाराष्ट्र राज्य पुणे १ ५. माहितीसाठी अर्ज किती प्रती,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावी द्विप्रतीत शिक्षण संचालनालयात,फी भरल्याची मूळ पावती व उत्पन्नाचा दाखला. ६. अर्ज कोठे सादर करावा केंद्रशासनाच्या पत्रानुसार संचालनालयाचे परिपत्रकानुसार शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे १ येथे अर्ज सादर करावा. ७. सेवा मिळण्यास कालावधी विहित कालावधी निश्चित केलेला नाही . ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे १ येथे अर्ज सादर करावा.