शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षण संस्थाना पुरस्कार देणे | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षण संस्थाना पुरस्कार देणे |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | महाराष्ट्र राज्यात खाजगी शिक्षण संस्थांचा राज्याच्या शैक्षणिक विकासात महत्वाचा वाटा आहे. राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षणाची उज्वल परंपरा वर्षानुवर्ष राखलेली आहे. शिक्षण क्षेत्रात असे उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षण संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | महाराष्ट्र शासनाने सन २०००-२००१ पासून सदरची योजना शासन निर्णय क्रमांक पीटीसी-२०००/(१७९/२०००)साशि-१ दिनांक ०३.०८.२००१ सुरु केली आहे. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | पुरस्कारासाठी प्रस्ताव शिक्षण संस्थेने संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे संपर्क साधुन विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव तीन प्रतीत त्यांच्याकडे पाठवावा.पुरस्कारासाठी विभागीय निवड समितीकडुन शिफारस केली जाते व अंतिम निवड राज्य समितीकडुन केली जाते. |
५. | माहितीसाठी अर्ज किती प्रती ,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावे. | संबंधित संस्थेने विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित विभागीय निवड समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विहित माहिती त्यांच्याकडे पाठविणे आवश्यक असते.विहित नमुना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | संबंधित संस्थांचे प्रस्ताव विहित नमुन्यात संबंधित विभागीय निवड समितीकडे पाठविणे आवश्यक आहे |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | पुरस्कार प्राप्त संस्थाची यादी प्रत्येक वर्षी आँगष्ट मध्ये शासनामार्फत जाहीर केली जाते |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे १. |
अंतिम सुधारित : 8/3/2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...