संस्कृत भाषेच्या विकासाच्या योजना | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/उपक्रम(विषय). | संस्कृत भाषेच्या विकासाच्या योजना |
अ.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे वासंतिक संस्कृत प्रशिक्षण वर्ग टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत राज्यातील संस्कृत शिक्षकांसाठी वासंतिक संस्कृत प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.दरवर्षी या वासंतिक वर्गासाठी राज्य शासन अनुदान देते. |
||
ब.संस्कृत वाड:मयास प्रोत्साहन देणे. या योजनेअंतर्गत संस्कृत लेखकांची,राज्य संस्कृत स्थायी समितीचे सदस्य आणि शिक्षण संचालक यांनी शिफारस केलेली पुस्तके विकत घेऊन राज्यातील संस्कृत पाठशाळांना विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत विनामूल्य पुरवली जातात. |
||
क.संस्कृत पाठशाळांना अनुदान राज्यातील मान्यताप्राप्त संस्कृत पाठशाळा/महाविद्यालये यांना शासन नियमानुसार संस्कृत पाठशाळांना त्यांच्या मागील वर्षाच्या मान्य खर्चाच्या ३/४ अथवा कमाल रुपये २५,००० /- पर्यंत वार्षिक अनुदान देण्यात येते. |
||
ड. देववाणी मंदिरम मुंबई यांना अर्थसहाय्य देणे. या संस्थेद्वारे "गीर्वाणसुधा" नावाचे मासिक प्रकाशित करण्यात येते.या मासिकाच्या प्रकाशनासाठी ५०००/- वार्षिक अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात येते. |
||
इ.संस्कृत,पाली,अरेबिक व पार्शियन पंडितांना केंद्र शासनाचे पुरस्कार : केंद्रशासनातर्फे प्रतिवर्षी आर्थिक मदतीसह सन्मानपत्रे प्रदान केली जातात.या पुरस्कारासाठी केंद्रशासनाकडून राज्य शासन/केंद्रशासित प्रदेशाकडून शिफारसी मागविल्या जातात.केंद्रशासनाच्या मनुष्यबळ विकास,नवी दिल्ली यांचेकडून पुरस्काराची निवड करण्यात येते. |
||
ई.संस्कृत भाषेच्या विकासाच्या योजना(केंद्रीय अर्थसहाय्यासाठी) |
||
(१) विपन्न अवस्थेत असलेल्या संस्कृत पंडितांना आर्थिक सहाय्य विपिन्न अवस्थेत असलेल्या संस्कृत पंडितांना (जे संस्कृत अभ्यास व संधोधन करतात)केंद्रशासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.ही मदत मिळण्यासाठी संस्कृत पंडितांचे वय ५५ वर्षा पेक्षा जास्त असावे.अर्जदाराने विहित प्रपत्रात इंग्रजीतून मा.प्रधान सचिव,मानव संसाधन विकास मंत्रालय ,शिक्षण विभाग ,केंद्र शासन ,नवी दिल्ली ११० ००१ यांच्याकडे अर्ज सादर करावा. |
||
(२) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून संस्कृत विषय शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी संस्कृत भाषेची गुणवत्ता शिष्यवृत्ती केंद्र शासनाकडून दिली जाते.ही शिष्यवृत्ती इ.९ वी व इ.१० वी तील विद्यार्थ्यांसाठी रुपये २५०/- व इ.११ वी व १२ वी तील विद्यार्थ्यासाठी रुपये ३००/- दरमहा याप्रमाणे १९९८-९९ पासून दिली जाते.या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शासनामार्फत केंद्रशासनाकडे पाठविले जातात. |
||
(३) संस्कृत भाषेच्या अध्यापनाकरीता माध्यमिक शाळांना केंद्र शासनाच्या सुविधा या योजनेखाली संस्कृत भाषेचे अध्यापन करणार्या शिक्षकांना जेथे राज्य शासनाकडून या विषयासाठी स्वतंत्र शिक्षक देता येत नसेल अशा शाळांमध्ये संस्कृत विषयासाठी शिक्षक नेमल्यास त्यास त्यांच्या वेतनावरील खर्च भागविण्यासाठी रुपये १०० /- अनुदान केंद्र शासन देते.या संबंधीचे प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून राज्य शासनाकडून केंद्र शासनास सादर केले जातात. |
||
(४)संस्कृत पाठशाळांच्या आधुनिकीकरणाकरिता अर्थसहाय्य: या योजनेखाली संस्कृत पाठशाळेस इंग्रजी,गणित,व विज्ञान हे विषय शिकविणार्या शिक्षकांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान केंद्र शासनाकडून मंजूर केले जाते.संस्कृत पाठशाळेने अशा प्रकारचे पूर्णवेळ शिक्षक नेमले असल्यास त्यासंबंधीचे प्रस्ताव शिक्षण संचालनालया मार्फत शासनास सादर केले जातात. |
||
(५)संस्कृत भाषेच्या विकासासाठी राज्य शासनाच्या योजनांना केंद्र शासनाचे अर्थसहाय्य : संस्कृत भाषेच्या विकासासाठी जे कार्यक्रम राज्य शासनाने आयोजित केलेले असतील उदा.संस्कृत पंडितांचा सत्कार ,विद्वत सभांचे आयोजन ,संध्याकाळचे संस्कृत भाषेचे वर्ग,कालिदास समारोह,इ.योजनांना केंद्रशासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. |
||
२. | त्याची आवश्यकता काय | संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे शासनाचे धोरण |
3. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? | अ.महाराष्ट्र शासन,शिक्षण व सेवायोजन विभाग,मुंबई शासन निर्णय क्रमांक एसकेई-१२७९/१७४५०४(२००) विशि-५ दिनांक १९/४/१९८३ ब.महाराष्ट्र शासन,शिक्षण व सेवायोजन विभाग,मंत्रालय,मुंबई शासन निर्णय क्रमांक एसकेई-११८४/(२०८) विशि-५ दिनांक २०/१२/१९८४. क.महाराष्ट्र शासन,शिक्षण व सेवायोजन विभाग,मंत्रालय,मुंबई क्रमांक एसकेई-१०८६/१५८४७३/(३३८/८६)उमाशि-१ दिनांक २०/७/१९८८. ड.महाराष्ट्र शासन,शिक्षण व सेवायोजन विभाग,मंत्रालय,मुंबई क्रमांक एसकेई-१०८५/११००३९/(१०१४४)उमाशि-१ दिनांक २६/५/१९८७. इ.महाराष्ट्र शासन,शिक्षण व सेवायोजन विभाग,मंत्रालय,मुंबई क्रमांक एसकेई-१०९८/(३९/९८)साशि-१ दि. ३१/३/१९९९. ई.महाराष्ट्र शासन,शालेय शिक्षण विभाग,परिपत्रक क्र एसकेई-१०९८/४२४०/(२२९/९८)माशि-८ मंत्रालय,मुंबई २ आक्टोंबर १९९८. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | स पुस्तक शाखा,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१. |
५. | माहितीसाठी अर्ज किती प्रती,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत.? | अ.कुलसचिव,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि आशियाई अध्ययन केंद्र,विद्यापीठ भवन,गुलटेकडी पुणे-३७ ब.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक. |
६. | अर्ज कोठे सादर करावा ? | विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत शिक्षण संचालनालय,पुस्तक शाखा,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
७. | सेवा मिळण्यास कालावधी ? | -- |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारण्यासाठी कोठे अर्ज करावा ? | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१. |
अंतिम सुधारित : 8/8/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...