समन्याय - विशेष गरजा असणारी बालके सर्व शिक्षा अभियान आणि त्या अनुषंगाने शिक्षण हक्क अभियान यांचा एकमेव हेतू म्हणजे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण. शिक्षण प्रक्रियेत या विद्यार्थ्यांची पोहोच, प्रवेश आणि टिकून राहणे महत्वाचे आहे. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या समावेशाशिवाय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे लक्ष्य साध्य होणार नाही, हे लक्षात घेत शिक्षण हक्क अधिनियमाने या बालकांच्या शिक्षणाविषयीही आग्रह धरल्याचे सिध्द झाले आहे. त्याचमुळे समावेशक शिक्षण, हे सर्व शिक्षा अभियानाचे अविभाज्य अंग आहे. बहु पर्यायी आराखड्याच्या साहाय्याने राज्य शासनाने अशा विशेष गरजा असणा-या बालकांसाठी विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. या व्यवधानांची अंमलबजावणी करताना विशेष गरजा असणारी बालके ओळखणे, त्यांची वैद्यकीय तपासणी, पुनर्वसनासाठी सहाय्य करणा-या सेवा तसेच शैक्षणिक सहाय्य सेवा देण्याची तरतूद करण्यात आली, तसेच या बालकांना समाजात सहजतेने मिसळता यावे यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समावेशक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. विशेष गरजा असणा-या बालकांना ओळखणे पुनर्वसन क्षेत्रातील तज्ञांच्या सहाय्याने प्राथमिक स्तरावर विशेष गरजा असणारी बालके ओळखली जातात. वैद्यकीय मूल्यांकन शिबीर महाराष्ट्रातील शैक्षणिक पुनर्वसन संस्था NRHM, सार्वजनिक आरोग्य शिबीरे, गट, नागरी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय निधी यांमार्फत वैद्यकीय मूल्यांकन शिबीरांचे आयोजन केले जाते. शिबीरातील तज्ञांचे पथक विशेष गरजा असणा-या बालकांच्या तपासणीनंतर त्यांना विविध सहाय्यक सेवांबाबत निर्देशित करते. या शिबिरांमध्ये शैक्षणिक, व्यावसायिक तसेच पुनर्वसनाचे अन्य पर्यायही निश्चित केले जातात. सुधारक शस्त्रक्रिया गटस्तरावरील शिबीरांमध्ये स्नायूव्यंग अस्थिव्यंग तसेच जीभ टाळूला चिकटलेली असणे, डोळ्यांतील व्यंग, टाळु फाटलेली असणे अशा दोषांवर शस्त्रक्रिया करून ते दूर केले जातात. आतापर्यंत अशा प्रकारच्या 34000 सुधारक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. घरातून नियमित शाळेत संक्रमण विशेष गरजा असणा-या अशा बालकांना त्यांची काळजी घेणा-या मदतनिसाच्या साहाय्याने नियमित शाळेत घालणे गरजेचे असल्याची बाब, शैक्षणिक मूल्यमापन आणि प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून लक्षात आली. त्यानंतर लगेचच CRC स्तरावर या विद्यार्थ्यांसाठी दळणवळणाच्या अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती वाढवण्यासाठी उप स्रोत कक्षाची निर्मिती करण्यात आली. बहु गट प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षमता उभारणी बालकांना घरातून शाळेत आणि शाळेतून वर्गात आणण्यासाठी आणि त्यांना प्राथमिक शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी असंख्य उपक्रमांची भर घालण्यात आली. तरीही दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने अनेक आव्हाने शिल्लक राहिली. प्रभावी अंतर्गत सहाय्य, मूल्यामापन प्रक्रिया, पायाभूत सुविधांची उपलब्धता, योग्य प्रकारचे अध्ययन साहित्य, ते वापरण्याची योग्य पध्दत अशा बाबी लक्षात घेत कालबध्दरित्या प्रस्तावित ध्येय गाठणे, हे खरोखरच आव्हान आहे स्त्रोत : महाराष्ट्र शासन