स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती प्रश्नोत्तरे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती १ सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती २ त्याची आवश्यकता काय ? स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगला अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीना/मुलांना/नातवंडाना(हयात नसलेल्या मुलांच्या मुलांना) ही शुल्क माफीची सवलत दिली जाते. ३ कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? शासन निर्णय क्रमांक एमआयएस/१४६५-एच दि.२३/११/१९६५ व शासन निर्णय क्रमांक एनडीएफ १०९४/(१६६८/९४)साशि-५,दिनांक १३/०९/१९९४. ४ कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५ माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावीत? आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. ६ अर्ज कोठे सादर करावा? संबंधित जिल्ह्यातील मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७ सेवा मिळण्यास कालावधी ? अनुदान उपलब्धतेवर ८ उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? संबंधित जिल्ह्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १. स्त्रोत : शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य