অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी

प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी

शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्याप्नात त्याचा वापर करावा.

प्रस्तावना

शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.

जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.

डॉ. राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षकाची व्याख्या करतात 'शिक्षकाने कमीतकमी शिकवून विदयार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल यासाठी त्‍याला प्रशिक्षित केले पाहिजे.

सुप्रसिद्ध तत्ववेत्ता जॉर्ज बर्नार्ड शॉ याने एके ठिकाणी म्हटले आहे की, मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकांनी मारू नये. उलट त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा आहे.

स्वत: शिकण्याची तयारी

शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विदयार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा.

शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ असते. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.

बालकाच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २० ०९: शिक्षकांची कर्तव्ये- (कलम २४ ब)

महाराष्ट्र शासनाने बालकाच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ ला केला आणि त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१० पासून सुरू झाली. त्यात शिक्षकांची कर्तव्‍ये सांगितली आहेत.

1.शाळेत नियमितपणे वक्तशीरपणे हजर राहणे.

2.कायदयातील तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचालित करणे, व तो पूर्ण करणे.

3.निर्धारीत कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे.

4.प्रत्येक बालकाच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणे.

5.कोणतीही आवश्यकता भासल्यास अतिरित पूरक शिक्षण देणे.

6.माता-पिता आणि पालकाबरोबर नियमित सभा घेणे.

7.अध्ययनातील प्रगती याबाबतची माहिती पालकांना अवगत करणे.

8.विहित करण्यात येतील अशी सर्व कर्तव्ये पार पाडणे.

9.आनंददायी, नावीन्यपूर्ण, पद्धतीचा अध्यापनात वापर व तणावमुक्त अध्ययन प्रक्रियेचा अवलंब करणे.

10.शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व विशेष प्रशिक्षण पुरविणे.

11.अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, मूल्यमापन प्रक्रिया विकसन, प्रशिक्षण रचना व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे

12.बालकांचे संकलित नोंदपत्रक, अंतर्भूत असणारी माहिती अदययावत ठेवणे.

या अधिनियमातील शिक्षकांच्या कर्तव्यामुळे शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे शिक्षकांनी ती टाळून चालणार नाही. शिक्षकांनी राबविण्याचे उपक्रम: शिक्षकांनी खालील उपक्रम राबवावेत.

१) शिक्षकाने ग्रंथालयात संस्कार करणा-या पुस्तकांच्या समावेश करावा.

२) शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरित इतर वेळात संस्कार वर्गाचे आयोजन करावे.

३) पालकांशी विदयार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करणे.

४) शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतिथी, इतर विशेष दिन मार्गदर्शनाचे जाणीवपूर्वक नियोजन करणे.

5. अध्‍यापन ही एक साधना मानणे.

6. तणावमुक्‍त अध्‍यापन करून सुसंस्‍कारित भावी पिढी निर्माण करणे.

7. व्‍यापक सातत्‍यपूर्ण सर्वकष मुल्‍यमापन करून मुलांचे प्रगतीपत्रक तयार करणे.

8. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे.

9. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.

१०) शासनाने निर्धारीत केलेली किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे.

११) सकाळ-दुपार विदयार्थ्यांची हजेरी घेणे.

१२) गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.

१३) कृतिशील अध्ययन, ज्ञान रचनावाद, बालस्नेही, स्वयं अध्ययन इत्यादी द्वारा ज्ञानदानाचे कार्य करणे.

१४) कार्यक्रमाचे सादरीकरण, सूत्र संचालन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करणे.

१५) शैक्षणिक सहलीचे आयोजन करून ऐतिहासिक

१६) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे मूल्य रुजविणे.

१७) मुलांचे नियमित स्वाध्याय तपासणे व झालेल्या चुका त्यांचे निदर्शनास आणून देणे.

१८) विविध स्पर्धांचे आयोजन करणे. उदा. हस्ताक्षर इत्यादी.

१९) विशेष गुणवत्ताप्राप्त विदयार्थ्यांना बक्षिसे देणे.

२०) शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे.

असा असावा शिक्षक

शिक्षक हा - शि म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असावा.

शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे. स्वत:चे विषयात पारंगतता प्राप्त करून घ्यावी. अध्यापन कला अवगत करून घ्यावी.

शिक्षकाने आपले ज्ञान अदययावत करावे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.

4. शिक्षकाला विदर्याबददल आत्मियता, प्रेम असावे आपल्‍याला विदयार्थ्‍यांचे कोणीही मुळे नुसान होत असेल तर त्‍या विरूध्‍द झगडण्‍यासाठी तयार असावे.

5. शिक्षक हा नवनिर्मितीचा निर्माता प्रसारीक असावा.

6. न्‍याय समता बंधुता धर्म निरपेक्षता वैज्ञानिक दृष्‍टीकोन, लोकशाही जीवनपध्‍दती या मुलांच्‍या समोर ठेवून शिक्षकांचे स्‍वतःला विकसित करावे.

7. विदयार्थ्‍यांवर आपले विचार न लादता शिक्षकाने विदयार्थ्‍यांच्‍या मताचा आदर करावा. त्‍याला प्रकटीकरणाची संधी दयावी. शिक्षकाने केवळ मार्गदर्शन करावे.

8. विज्ञान युगातील नवनवीन आव्‍हानांना सामोरे जाण्‍याइतके सक्षम बनविणारे शिक्षण शिक्षकाने विदयार्थ्‍यांना दयावे.

९) शिक्षकाने स्वत: क्रियाशील, उपक्रमशील असावे. व विदयार्थ्‍याला क्रियाशिल राहण्‍याची प्रेरणा दयावी.

१०) शिक्षकाने धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद याचा विचार न करता सर्वांना समान शिक्षण दयावे.

११) शिक्षकाने विदयार्थ्‍यां तील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची सवय विदयार्थ्यांना लावून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा.

१२) शिक्षकाने आपल्या बोलण्यातून, वागण्यातून चांगले

सदैव सत्य तेच बोलावे.

१५) शिक्षकाने जिज्ञासू वृत्ती धारण करून नित्य नव्या गोष्टी जाणून घ्याव्यात. शिक्षक व्यासंगी सखोल अभ्यास करणारा असावा.

१६) शिक्षकाने श्रमप्रतिष्ठा जोपासावी, कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता सहजतेने करावे.

१७) शिक्षक अष्टपैलू, अष्टावधानी असावा, आपल्या विषयाव्यतिरित इतर कलागुणांची आवड त्याला असावी.

१८) शिक्षकाला आपल्या वरिष्ठांबद्दल प्रेम, आदर असावा.

१९) शिक्षकाने आपल्या अध्यापनात विविधता, नावीन्य, कल्पकता जोपासावी. विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून विदयार्थ्यांना विषय सहज समजेल अशा कौशल्याची जोपासना करावी.

२०) शिक्षकांमध्ये छोट्यामोठ्या गोष्टींचे निर्णय स्वत: घेण्याची क्षमता असावी.

२१) शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.

२२) त्याचे घरी किमान १०० पुस्तकांचे ग्रंथालय असावे.

२३) शिक्षकाने पालक व समाज यांच्या संपर्कात नेहमी असावे. त्यांचे सहकार्याने समाजातील अनिष्ट प्रथा विरुद्ध आवाज उठवावा.

२४) शिक्षकाने आपली वाचन क्षमता, श्रवण क्षमता वाढवावी, भरपूर लेखन करावे.

२५) शिक्षकाने आपल्या विचाराशी ठाम असावे. ते विचार इतरांना पटवून देण्याचे भाषण कौशल्य व लेखन कौशल्य असले पाहिजे.

२६) शिखक साहसी, धैर्यवान, परोपकारी, निरपेक्ष वृत्तीचा असावा. त्याच्या प्रत्येक कामात रेखीवता व वाणीत मधुरता असावी. त्याची राहणी साधी व विचारसरणी उच्च असावी. दर्जाचा शिक्षक 'स्पष्टीकरण करतो' एक चांगला शिक्षक प्रात्यक्षिक करतो. आणि खरा थोर शिक्षक प्रेरणा देतो.

शिक्षक व्यवसायाची आचारसंहिता : १) शिक्षकांनी विदयार्थ्‍यांना राजकीय बाबीवर अथवा धर्म, जात, वंश आणि लिंग या खाजगी बाबीवर भेदभाव न करता समानतेची वागणूक दयावी. २) शाळेसाठी मिळालेल्या साधन सामुग्रीचा कोणत्याही शिक्षकाने स्वत:च्या वैयक्तिक, व्यापारी अथवा राजकीय हेतूसाठी उपयोग करणे निषिद्ध आहे. ३) शिक्षकाने विदयार्थ्यांचे मूल्यमापन नि:पक्षपातीपणे करावे.

लेखक : प्रा. गौतम दयाराम डांगे, गडचिरोली  ९४२२३६१ o७७

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate