परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील.
ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.
ज्या १० विद्यार्थ्यांना (मुले- मुली) परिपाठ असेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.
संचालन करणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दाखवेल.
“ उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा असावी.
घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही,
पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “
केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो , कोणता वर आणि कोणती तारीख आहे. हे आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजते. म्हणून आजचा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही न काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे --- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
प्रश्नमंजुषा जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आता मिळालेले ज्ञान थोड्यावेळेने शिळे होत आहे. स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.)
समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)
इंग्रजी शब्दार्थ – इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
दिनांक तो पाढे – गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुह्गीत गायन करावे.
पसायदान – बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.
मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
विसर्जन - विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात रांगेत जावे.
स्रोत - शिक्षक मंच
अंतिम सुधारित : 7/24/2020