অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राथमिक शिक्षणामध्ये सह-शिक्षकांचे प्रभावी सहाय्य

प्राथमिक शिक्षणामध्ये सह-शिक्षकांचे प्रभावी सहाय्य

प्रतिक्रियांचा सारांश

सह-शिक्षकांचे कार्यप्रदर्शन, सामाजिक जाणिवा, नियुक्तीची धोरणे आणि जीवनाची गुणवत्ता ह्यांच्‍याशी संबंधित मुद्दयांचे संशोधन व त्‍या परिस्थितींचा विकास ह्यांचा समावेश असणार्‍या मुद्दयांवर सहभागींनी विविध सूचना दिल्या.

विद्यार्थ्‍यांनी ध्येय गाठण्यामध्‍ये सह-शिक्षकांची भूमिका

एकंदरीत सदस्यांना असे वाटले की सह-शिक्षक मुलांना नामांकनासाठी प्रोत्‍साहन देणे, उपस्थिति वाढविणे आणि विद्यार्थ्‍यांस टिकवून धरणे ह्यासारख्‍या कार्यातून मुलांच्‍या शैक्षणिक ध्येय-साधनेमध्‍ये एक सकारात्मकता राखतात. जेव्‍हां शिक्षकांची अनुपस्थिति, कमतरता असते किंवा जेथे विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्‍या सरासरीचे प्रमाण फार उच्‍च असते तेव्हा ते विशेष स्‍वरूपात प्रभावी ठरतात. सह-शिक्षक आधारभूत कुशलता आत्‍मसात करण्‍यात कमकुवत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना जादा आणि सखोल सहाय्याची गरज असलेल्‍या कार्यानुभव-आधारित शिक्षणासारख्‍या पध्‍दतींचा वापर करून विद्यार्थिनींच्‍या बरोबरीस आणतात (जेथे स्‍त्री-सह-शिक्षक असतील) आणि त्‍यांच्‍या बरोबर काम करण्‍यास मदत करतात. उदाहरणार्थ, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजराथ येथील प्रकल्‍पांमध्‍ये सह-शिक्षकांचा वापर केल्‍याने विद्यार्थिनींची हजेरी, त्या शाळेत टिकून राहणे, आणि त्यांच्या ध्येय गाठण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

चर्चा करणार्‍यांनी सह-शिक्षकांचा वापर केल्‍याने मिळणार्‍या मिश्र परिणामांची नोंदणी करून त्‍यांचा अभ्यास केला आहे. ह्या बाबींमध्‍ये सह-शिक्षक व विद्यार्थी ह्यांच्‍या समाधानकारक कार्यप्रदर्शनापासून ते (सेवा दिलेल्‍या असूनसुध्‍दा) कमकुवत कार्यप्रदर्शनापर्यंतच्‍या पातळींचा समावेश होता. इतर अभ्यासांनी संकेत दिले की शिक्षक आणि सह-शिक्षकांच्‍या ध्येय-साध्यते स्तरांमध्‍ये काहीही अंतर नाही, तर अन्य ठिकाणी 1-3 इयत्तेच्या कार्यप्रदर्शनात अगदी किरकोळ वाढ झालेली आढळली त्‍या मागोमागच कार्यप्रदर्शनात उल्‍लेखनीय घट दिसून आली. सहभागींनी उल्‍लेख केला की जिल्‍हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाच्‍या (डीपीईपी) संदर्भातील सह-शिक्षकांच्‍या बाबतीतील अध्ययनाबत त्‍यांना माहीत होते. पण सर्व शिक्षा अभियान (एसएसए) मोहिमेच्‍या संदर्भात नाही, सदस्यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणाच्‍या गुणवत्तेचा विकास करण्‍यासाठी तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्‍ये सह-शिक्षकांसह काम करीत असलेल्‍या संघटनांच्‍या प्रयत्नांचा आणि अखिल भारतीय पुढाकाराचा देखील उल्‍लेख केला ज्‍यायोगे विद्यार्थ्‍यांच्‍या कौशल्‍यामध्‍ये सुधारणा घडवून आणण्‍यास मदत झाली.

तथापि, त्‍याचबरोबर, सहभागींनी सांगितले की दीर्घ काळासाठी सह-शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांची ध्येय-साध्यता फक्‍त समाधानकारक किंवा वाईट असू शकते कारण सह-शिक्षक कमी प्रशिक्षित असतात आणि त्‍यांना पगार देखील कमी मिळतो. ह्या खेरीज, "सह-शिक्षक'' पद हे कंत्राटी स्‍वरूपाचे असल्‍याने कोणत्‍याही व्‍यावसायिक किंवा करिअरच्‍या विकासाचा मार्ग येथे नाही. तसेच एकीकडे समाजामध्‍ये त्‍यांचे कौतुक केले जाते पण त्‍यांना 'हाताखाली असणारे/किंवा वास्‍तविक पाहता शिक्षक नसलेले, असे म्‍हणून मान मात्र लाभत नाही. हे मुद्दे विचारांत घेतल्‍यावर, सहभागींनी असा विचार केला की सह-शिक्षक हे नियमित शिक्षकांची मदत करण्‍यास सर्वोत्तम पात्र आहेत, फक्‍त शिक्षकांच्‍या एखाद्या प्रशिक्षित ताफ्यासाठी एक पर्याय म्‍हणून नाही.

सह-शिक्षकांच्‍या बाबतीत सामुदायिक संकल्‍पना

सह-शिक्षकांच्‍या भूमिकेचे कौतुक करण्‍याकडे समाजाचा कल कां असावा ह्यावर चर्चा करतांना सदस्यांनी त्‍यांचा प्रामाणिकपणा, वेळेवर काम करणे, उत्साह, गुंतण्याची पातळी, तसेच सह-शिक्षक हे समाजाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत ह्याचा उल्‍लेख केला. तसेच सह-शिक्षकांकडे त्‍यांच्‍या नोकरीची परिस्थिति पाहतां कार्यप्रदर्शनाचा कोणताही पर्याय नाही ह्या बाबत समाजास माहीत आहे.

सह-शिक्षकांच्‍या नियुक्ति/भरतीची धोरणे

सहभागींनी उल्लेख केला की औपचारिक आणि अनौपचारिक दोन्‍ही प्रकारच्‍या शाळांमध्‍ये सह-शिक्षकांची भरती करण्‍यात येते. औपचारिक प्रणालीच्‍या माध्यमाने भरती करण्‍यात आलेल्‍या सह-शिक्षकांचा पगार नियमित शिक्षकांपेक्षा फार कमी असतो आणि त्‍यांच्‍या भरतीस नियंत्रित करणारे नियम देखील आहेत (वय, शिक्षणाची पातळी, जागा, इत्‍यादि), पगार, कंत्राटाचा अवधि आणि कार्यप्रदर्शनाचे (काम करण्‍याची पध्‍दत) निरीक्षण. तथापि, मोठ्या प्रमाणात सह-शिक्षकांची नियुक्ति पंचायतीच्‍या सरपंचांच्‍या द्वारे करण्‍यात येते. जेथे शाळांनी दर व्‍याख्‍यानाच्‍या आधारावर 'पाहुणे शिक्षक' म्‍हणून सह-शिक्षकांची नियुक्ति केली आहे अशा काही उदाहरणांचा देखील सदस्‍यांनी उल्‍लेख केला.

एका सह-शिक्षकाचे जीवन

चर्चा करणार्‍यांनी उल्‍लेख केला की सह-शिक्षक हे पद एवढ्यासाठीच स्‍वीकारतो कारण स्‍थानिक नोकर्‍या उपलब्‍ध नाहीत आणि तसेच सह-शिक्षक संघटित नाहीत आणि त्‍यांचे मुद्दे मांडायला कोणताही प्रतिनिधि संघ नाही.

सह-शिक्षकांच्‍या अनुभवांवरील अभ्‍यास दर्शवितात की पुष्‍कळशा लोकांशी पगाराच्‍या आणि नोकरीच्‍या स्थिरतेच्‍या बाबतीत असमानतेचे वर्तन करण्‍यात आलेले आहे कारण सह-शिक्षकांसाठी कोणत्‍या ही व्‍यावसायिक विकासाकरीता सुविधा उपलब्‍ध नाहीत किंवा त्‍यांचे व्‍यवस्थित नियमन करण्‍यासाठी कोणते ही निर्दिष्‍ट नियम नाहीत (फक्‍त त्‍यांच्‍या कर्तव्‍यासंबंधी नियम आहेत).

ह्या प्रकारे, पुष्‍कळसे सह-शिक्षक सरकारी शाळांमध्‍ये अनुभव घेवून खाजगी शाळांकडे वळतात. सदस्यांनी राजस्थानमध्‍ये शिक्षा कर्मी प्रकल्‍पाद्वारे वापरण्‍यात येणार्‍या पध्‍दतीचा उल्‍लेख केला, ज्‍यामध्‍ये सह-शिक्षकांमधील कौशल्‍याचा विकास करण्‍यासाठी एका संघटित आणि गहन क्षमता निर्मिती धोरणाचा उपयोग करण्‍यात येतो.

तथापि, काही योजनांनी वास्तविकपणे व्यवस्थित आणि गरजेवर आधारित पध्‍दतींचा वापर करून सह-शिक्षकांची कौशल्ये उंचावण्यात गुंतवणूक केली आहे असे दिसते.

सरतेशेवटी, चर्चा करणार्‍यांनी सह-शिक्षकांच्‍या अनिश्चित कार्यकाळाचा उल्‍लेख केला आणि प्रशिक्षित शिक्षक तयार करण्‍याच्‍या एक प्रदीर्घ अवधिच्‍या तंत्राचा विकास करण्‍यासाठी अशा प्रकारे सह-शिक्षकांचा उपयोग करण्‍याच्‍या पध्‍दतीवर भर दिला.

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate