माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) योग्य वापर करण्यासाठी तुमच्या शाळेसाठी योग्य तांत्रिक उपकरणे निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागात माहिती मिळविण्यासाठी वापरता येऊ शकणार्या विविध तंत्रज्ञानांची माहिती देण्यात आली आहे शिवाय ही तंत्रे वापरताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याविषयी देखील यात चर्चा करण्यात आली आहे.
माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान. यामध्ये रेडियो, दूरदर्शन, व्हिडियो, डिव्हिडी, दूरध्वनी, मोबाईल फोन, उपग्रहावर आधारीत सेवा व सुविधा, संगणक व त्या संबंधित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा गोष्टींचा समावेश होतो. ह्या व्यतिरिक्त, व्हिडियो कॉन्फरन्सिंग, ईमेल, ब्लॉग अशा तंत्रांचा ही यात समावेश होतो.
सध्याच्या ‘माहिती युगात’ शैक्षणिक ध्येये समजून घेण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या (ICT) नवनवीन स्वरूपांचा शिक्षणात अंतर्भाव करणे गरजेचे आहे. हे सर्व प्रभावीरीत्या करण्यासाठी शैक्षणिक नियोजनकार, मुख्याध्यापक, शिक्षक व तंत्रज्ञांना प्रशिक्षण, तंत्रज्ञान, वित्त, शिक्षण, संप्रेषण अशा विविध क्षेत्रात अनेक निर्णय, ते ही योग्य रीत्या घेता आले पाहिजेत. अनेकांसाठी हे काम म्हणजे एखादी नवी भाषा शिकणे व ती शिकविण्यास शिकणे इतके कठीण काम वाटते.
या विभागात विविध उपकरणे व तंत्रे यांची माहिती दिलेली आहे. यात देशांना जोडणार्या उपग्रहांपासून, विद्यार्थी वर्गात वापरत असणार्या उपकरणांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. शिक्षणतज्ञ, नीतीशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभ्यासक्रम तयार करणारे तज्ञ तसेच इतरांना माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची (ICT) गुंतागुंतीची उपकरणे, त्या संबंधित संज्ञा आदींतून मार्ग काढत योग्य निर्णय घेणे सोपे जावे हा यामागील उद्देश आहे.
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करून शिक्षणाच्या दर्जात उल्लेखनीय आणि सकारात्मक सुधारणा करता येईल असे साधारणतः सर्वच शिक्षणतज्ञांचे व संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र शिक्षणपद्धतीमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचे स्थान नेमके काय असावे व त्याच्या उपयुक्ततेचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येऊ शकतो हा अजून ही चर्चिला जाणारा मुद्दा आहे.
या विभागात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा शिक्षणपद्धतीवर पडलेला प्रभाव व शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल या विषयी अनेक लेख, अहवाल समाविष्ट करण्यात आले आहेत शिवाय या विषयावरील ऑनलाईन जर्नल्स व वेबसाईटस्च्या लिंक्स देखील देण्यात आल्या आहेत.
(शिक्षणपद्धतीत माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे सांगणारे लेख या विभागात आहेत. तसेच, शिक्षणपद्धतीत या तंत्रज्ञानाचा समावेश करताना होऊ शकणार्या चुका, त्या टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयावरील लेख व उदाहरणे देखील देण्यात आली आहेत.)
सार्या जगातून मिळविलेल्या, तंत्रज्ञानाचा वापर करताना वापरल्या जाणार्या पद्धती, उपाय, धोरणे, त्यांचे यश अपयश यांच्या कथा, यात खालील मुद्यांचा समावेश आहे:
सद्यकाळातील तंत्रे:
तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणकोणत्या गोष्टींचा वापर शिक्षणपद्धतीत करता येऊ शकतो याचा आढावा:
भविष्यातील तंत्रज्ञान:
सध्या अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान व भविष्यात येऊ घातलेले तंत्रज्ञान यावर एक नजर. वापर करणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्यांच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काय उपलब्ध आहे ह्या वरच आधारित नव्हे तर काय येत आहे, ह्यावर भविष्यातील तंत्रज्ञानावर एक दृष्टि
20व्या शतकाच्या सुरूवातीपासून रेडियो व दूरदर्शन यांचा वापर शिक्षणासाठी केला जात आहे.
रेडियो व दूरदर्शनचा वापर मुख्यत्वे खालील प्रकारे केला जातो: ICT च्या ह्या स्वरूपांचा मुख्यत्वे तीन प्रकारे उपयोग करण्यात येतो:
रेडियोवरून (IRI) प्रसारित केले जाणारे कार्यक्रम दैनिक स्वरूपाचे असतात. हे रेडियो धडे, एका विशिष्ट विषयाशी संबंधित असतात व त्यांचा प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊन त्यांची काठिण्यपातळी ठरविली जाते. या कार्यक्रमांमुळे शिक्षकांना तो विषय अधिक चांगल्या रीतीने शिकविण्यास मदत होते तसेच मुलांना ही तो विषय समजून घेणे सोपे जाते. या पद्धतीमुळे दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थी व ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ही शिक्षण घेणे सोपे जाते. रेडियोवरून (IRI) प्रसारित केल्या जाणार्या या कार्यक्रमामुळे औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचा दर्जा व त्याची व्याप्ती, दोन्ही गोष्टींवर सकारात्मक प्रभाव पडला आहे. शिवाय रेडियो कमी खर्चिक असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येला शिक्षणाचा लाभ मिळू शकतो.
दूरचित्रित केलेले कार्यक्रम अभ्यासक्रमास पूरक म्हणून किंवा स्वतंत्र पाठ म्हणून ही वापरले जाऊ शकतात. अशा कार्यक्रमांत आता अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. पूर्वी अनेकदा अशा कार्यक्रमांत एखादा शिक्षक एखाद्या विषयावर विवेचन करताना दाखविला जाई मात्र आता त्याची जागा विद्यार्थ्यांना जवळ वाटणार्या मुद्यांनी व सुसंवाद साधणार्या कार्यक्रमांनी घेतली आहे त्यामुळे हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना अधिकाधिक खिळवून ठेवत आहेत. विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता व सुसंवाद वाढविण्यासाठी बहुतेक अशा शैक्षणिक कार्यक्रमांसह छापील व इतर प्रकारचे साहित्यदेखील पुरविले जाते.
आशिया-पॅसिफिक प्रदेशात शैक्षणिक प्रसारण मोठ्या प्रमाणात केले जाते. उदा. भारतात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम दूरदर्शन व व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या मदतीने शिकविले जातात.
काही विशिष्ट अभ्यासक्रमांशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करण्याबरोबरच सर्वसामान्य शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी ही दूरदर्शन व रेडियोचा वापर केला जाऊ शकतो. वास्तविक, शैक्षणिक मूल्य असणारा व रेडियो किंवा दूरदर्शनवरून प्रसारित केला जाणारा कोणता ही कार्यक्रम ’सर्वसामान्य शैक्षणिक कार्यक्रम’ म्हणून गणला जाऊ शकतो. उदा. अमेरिकेत प्रसारित केला जाणारा ‘सीसेम स्ट्रीट’ हा कार्यक्रम किंवा कॅनडामधील ’फार्म रेडियो फोरम’ हा रेडियो चर्चा कार्यक्रम.
रेडियो १९२० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तर दूरदर्शन १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून शैक्षणिक साधन म्हणून वापरला जात आहे. हा वापर मुख्यत्वे खालीलप्रकारे केला जात आला आहे:
याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे रेडियोद्वारे सुसंवाद (इंटरऍक्टिव्ह रेडियो इंस्ट्रक्शन्स) (IRI) या २० ते ३० मिनिटांच्या कार्यक्रमांत विविध स्वाध्यायांद्वारे वर्गांत शिकविले जाते. रेडियोवरून प्रसारित केले जाणारे हे धडे मुख्यतः गणित, विज्ञान, आरोग्य, अभ्यासक्रमांतील विविध भाषा यांच्याशी संबंधित असतात. या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश वर्गात दिल्या जाणार्या शिक्षणाचा दर्जा उंचाविणे तसेच ज्या शाळांमधील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण मिळू शकलेले नाही अशा शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास मदत करणे हा आहे.
असे कार्यक्रम भारत व इतर काही दक्षिण आशियाई देशांत राबविले गेले आहेत. आशिया खंडात अशा प्रकारचा कार्यक्रम सर्वात प्रथम थायलंड या देशात १९८० साली राबविण्यात आला. १९९०च्या दशकात इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश व नेपाळ या राष्ट्रांत असे कार्यक्रम सुरु करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट त्याच्या उद्देशात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे केवळ शिक्षणाची व्याप्ती न वाढविता त्याची गुणवत्ता वाढविणे. आणि त्याच्या या उद्देशात त्याला पुष्कळसे यश ही मिळाले आहे. जगभरात केल्या गेलेल्या संशोधनाच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की या कार्यक्रमामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर अनुकूल परिणाम झाला आहे. शिवाय रेडियो इतर साधनांच्या तुलनेत बराच स्वस्त असल्याने त्याच्या सहाय्याने प्रसार करणे ही सोपे जाते.
दूरचित्रवाणी कार्यक्रम उपग्रहांच्या मदतीने संपूर्ण देशभरात शाळांच्या वेळेत प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम शाळांत शिकविल्या जाणार्या अभ्यासक्रमांवर आधारित असतात. प्रत्येक तासाला वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यक्रम प्रसारित केले जातात. शाळेत विद्यार्थ्यांबरोबर एक शिक्षक असतोच शिवाय कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षकांच्या शिकविण्याची पद्धत अनुभवायला मिळते.
या कार्यक्रमांच्या स्वरूपात आता कालपरत्वे बदल घडून आलेला आहे. केवळ बोलणार्या व्यक्ती (टॉकिंग हेडस्) दाखविण्यापेक्षा हे कार्यक्रम अधिक सुसंवादी करण्याकडे व त्या माध्यमातून समाजाला शिक्षणाशी जोडण्याकरीता ‘’लिंक्स्’’ आकर्षित करण्याकडे आता भर दिला जात आहे. या कार्यक्रमांमुळे माध्यमिक शाळांतून होणारी विद्यार्थ्यांची गळती बर्याच प्रमाणात कमी झाली आहे. रेडियो व दूरदर्शनचा शिक्षणासाठी अधिकाधिक वापर चीनमधील ४४ रेडियो व दूरदर्शन विद्यापीठे (ज्यामध्ये चायना सेंट्रल रेडियो व दूरदर्शन विद्यापीठाचा समावेश आहे) इंडोनेशियातील टरबुका विद्यापीठ, भारतातील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्याद्वारे करण्यात येत आहे.
जापानच्या एअर विद्यापीठाने २००० साली १६० दूरदर्शन व १६० रेडियो अभ्यासक्रम प्रसारित केले. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये १५ ते ४५ मिनिटांची व्याख्याने आठवड्यातून एक दिवस याप्रमाणे पंधरा आठवडे संपूर्ण देशभरात प्रसारित केली जातात. ही व्याख्याने विद्यापीठाच्या आकाशवाणी केंद्रांवरुन सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक असे छापील साहित्य, सूचना, व्यक्तिगत मार्गदर्शन व ऑनलाईन स्वाध्याय देखील पुरविले जातात.
छापील साहित्य, कॅसेटस् आणि सीडीज् यांसारख्या साधनांच्या साहाय्याने प्रसार माध्यमांद्वारे शिकविल्या जाणार्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र शाळेत प्रसारित केले जाणारे अभ्यासविषयक कार्यक्रम शाळेतील शिक्षकांची जागा घेण्यासाठी बनविलेले नाहीत तर या कार्यक्रमांद्वारे शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेत सुधारणा व्हावी व एकूणच शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारावा हा यामागील मुख्य हेतू आहे. रेडियोवरून (IRI) प्रसारित केल्या जाणार्या कार्यक्रमांपेक्षा दूरदर्शन संचावर दाखविता येणारे कार्यक्रम अधिक सोयीस्कर असतात कारण शिक्षक आपल्या वर्गाच्या सोयीनुसार ते दाखवू शकतात व त्याला पूरक अशा साहित्याची जमवाजमव करू शकतात. इंग्लडमधील बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन एज्युकेशनल रेडियो टीव्ही) शैक्षणिक रेडियो आणि जापानमधील एन एच के (NHK) रेडियो अशा रेडियो प्रसारण क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या रेडियोद्वारे शिक्षणप्रसार करतात. विकसनशील देशांमध्ये शाळांतून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम मुख्यतः शिक्षण मंत्रालय व माहिती प्रसारण मंत्रालय यांच्या भागीदारीत चालविले जातात.
सर्वसामान्य शैक्षणिक कार्यक्रमांत बातम्या, माहितीपट, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, शैक्षणिक कार्टून्स अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होतो. म्हणजेच माहिती मूल्य असणारे रेडियो व दूरदर्शनवरील सर्वच कार्यक्रमांचा यात समावेश होतो. नॅशनल जिओग्राफिक चॅनेल, डिस्कव्हरी अशा माहितीपर वाहिन्या, अमेरिकेत प्रसारित होणारा व्हॉईस ऑफ अमेरिका, द फार्म रेडियो फोरम ज्याची सुरूवात कॅनडा येथे 1940 मध्ये झाली आणि ज्याने वैश्विक पातळीवर रेडियो चर्चेचे प्रारूप म्हणून सेवा प्रदान केल्या, अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रमांची ह्या बाबतीतील काही उदाहरणे.
संशोधन केल्या नंतर हे सिद्ध झाले आहे की माहिती व संप्रेषण साधने (ICTs) योग्यरीत्या वापरल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करता येते व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
माहिती व संप्रेषणांच्या (ICTs) साधनांमुळे, विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी कवाडे उघडी झाली आहेत. संगणक व इंटरनेट वापरून शिक्षक व विद्यार्थी पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन त्यांच्या विषयाशी तसेच इतर विषयांशी संबंधित नवनवी माहिती मिळवू शकतात व आपल्या ज्ञानात भर घालू शकतात. यामुळे आतापर्यंत शिक्षककेंद्रित असणार्या शिक्षणपद्धतीत नवा बदल घडून आला आहे. आतापर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देत असत मात्र आता विद्यार्थी देखील स्वतः इंटरनेट वापरून माहिती मिळवू शकतात व ती वर्गात वाटू शकतात. म्हणजेच शिक्षणपद्धती हळूहळू शिक्षार्थी केंद्रित होत चालली आहे.
सक्रिय सहभाग: माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे परीक्षापद्धती, माहितीचे विश्लेषण करण्याच्या पद्धती यांत अनेक बदल घडून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळविण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. आता विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे माहिती मिळवू शकतात, निरनिराळ्या प्रकारे तिचा अभ्यास करू शकतात, दैनंदिन जीवनातील घटना अभ्यासू शकतात व त्यायोगे विषय अधिक सखोलरीत्या जाणून घेऊ शकतात. अशा पद्धतीने माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे केवळ अभ्यासाची घोकंपट्टी करून गुण मिळविण्याच्या पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा शिक्षणातील रस वाढण्यात मदत होत आहे.
दुहेरी शिक्षण: माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थी, शिक्षक, तज्ञ यांच्यात संवाद व सहकार्याची भूमिका निर्माण होण्यास मदत होते. शिवाय या साधनांमुळे वेगवेगळ्या संस्कृतीतील व्यक्तींशी, त्यांच्या संस्कृतींशी ओळख होते व आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते. या सर्वांचा आयुष्याच्या पुढील वाटचालीत नक्कीच फायदा होतो.
माहिती व संप्रेषणाच्या साधनांचा शिक्षणावर कितपत आणि कसा प्रभाव पडतो हे ती साधने कशी व कशासाठी वापरली जातात यावर अवलंबून असते. या साधनांचा सर्वांनाच सारख्याच प्रमाणात फायदा होईल असे ही नाही. मात्र ही साधने योग्य पद्धतीने वापरली गेल्यास त्यांचा फायदा नक्की होतो.
दर्जा उंचाविणे
माहिती व संप्रेषणाच्या साधनांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो ह्याचा विस्तृत अभ्यास अजूनपर्यंत केला गेलेला नाही मात्र जो काही थोडाफार अभ्यास करण्यात आलेला आहे त्यावरून हे स्पष्ट झालेले आहे की माहिती व संप्रेषणाच्या साधनांमुळे शिक्षणपध्दतीवर निश्चितच चांगला परिणाम होतो. प्रसारित केल्या जाणार्या अनेक शैक्षणिक कार्यक्रमांपैकी रेडिओद्वारे सुसंवाद कार्यक्रमाचा सखोल अभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमामुळे शिक्षणाचा दर्जावर उत्तम परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणांत व उपस्थितीत ही सुधारणा झाल्याचे आढळले.
मात्र संगणक, इंटरनेट यांच्या वापरामुळे शिक्षणाच्या दर्जात फारसा फरक पडल्याचे आढळून आले नाही. याविषयाव संशोधन करणार्या रसेल या अभ्यासकाने ‘काही उल्लेखनीय अंतर नसल्याचे’ म्हटले आहे की माहिती व संप्रेषणाच्या साधनांचा वापर करणार्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व व्यक्तीगत मार्गदर्शन घेणार्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत त्याला फारसा फरक आढळला नाही. माहिती व संप्रेषणाच्या साधनांद्वारे दिल्या जाणार्यामुळे व्याख्यांनामुळे विद्यार्थ्यांमधील अनुपस्थितीचे प्रमाण वाढल्याचे ही मत अनेक समीक्षक व्यक्त करतात.
मात्र माहिती व दळणवळणाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. पारंपारिक शिक्षणाच्या जोडीला संगणकाचा वापर करण्यात आल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते. संगणकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाल्याची ही काही उदाहरणे आहेत.
शिक्षकांना माहिती व दळणवळणाची साधने हाताळण्याचे योग्य ते प्रशिक्षण दिल्यास शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. मात्र अजून या प्रयत्नांना म्हणावा तसा भर देण्यात आलेला नाही शिवाय अशा प्रशिक्षणामुळे शिक्षणपद्धतीत बदल घडून आल्याचे काही ठोस पुरावे ही उपलब्ध नाहीत. सध्या या विषयी उपलब्ध असणारी माहिती ही विद्यार्थी व शिक्षकांकदून मिळविण्यात आली आहे व त्याद्वारे काढलेले निष्कर्ष सकारात्मक आहेत.
संगणक व इंटरनेटमुळे होणारे फायदे मोजण्यासाठी प्रमाणित अशा चाचण्या नाहीत त्यामुळे ही या साधनांचा प्रभाव मोजण्यात अडथळे येत आहेत. शिवाय ही साधने शिक्षणपद्धतीत अशा काही तर्हेने मिसळली आहेत की त्यांचा वापर वेगळा करून त्यांचा प्रभाव मोजणे हे एक कठीण काम झाले आहे.
अंतिम सुधारित : 7/12/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...