वेगवेगळ्या प्रकारांबाबतचा (तार्किक/तर्कशास्त्रीय, दृष्यमान, संगीतात्मक इत्यादि) सिध्दांत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सात प्रकारची अक्कल किंवा बुध्दिचातुर्य असते. एखाद्या व्यक्तीमध्ये एक किंवा दोन चातुर्ये ही प्रधान असतात, आणि काही लोकांमध्ये सात ही प्रकारच्या आकलनांमध्ये समतोलपणा राखणारे समतोल आकलन असते.
हॉवर्ड गार्डनर ह्याने सर्वप्रथम साती आकलनांच्या यादीचे प्रतिपादन केले. त्याची यादी ही तात्पुरती होती. पहिल्या दोन विशेषत: शाळांसाठी मौलिक ठरल्या, नंतरच्या तीन मधील सामान्यत: कला आणि अंतिम दोन्ही हॉवर्ड गार्डनरच्या म्हणण्याप्रमाणे ‘वैयक्तिक कौशल्य/आकलनशक्ति’ म्हणवितात.
दृष्यमान/मर्यादित आकलन
दृष्यमानास जाणून घेण्याची योग्यता. ह्या शिक्षणार्थींचा कल चित्रात्मक विचार
करण्याचा असतो आणि माहिती किंवा सूचना राखून ठेवण्यासाठी त्यांना स्पष्ट
मानसिक प्रतिमांची रचना करण्याची गरज असते. त्यांना नकाशे, चार्ट, चित्रे, व्हिडिओ आणि चित्रपट पहाणे आवडते.
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
कोडी तयार करणे, वाचन, लेखन, चार्टस् व ग्राफ समजून घेणे, दिशांची चांगली समज, स्केचिंग, पेंटिंग, दृष्यमान रूपके आणि साम्य यांची रचना करणे (कदाचित व्हिज्युअल आर्टसच्या द्वारे), प्रतिमांची कौशल्यपूर्ण हाताळणी, निर्मिती करणे, फिक्सिंग, प्रत्यक्ष वस्तूंची संरचना करणे, दृष्यमान प्रतिमांचा उलगडा करणे इत्यादि.
करियरमधील संभावित आवडी:
मार्ग निर्देशक, मूर्तिकार, व्हिज्युअल आर्टिस्ट (दृष्य कलाकार), संशोधक, आर्किटेक्टस् (स्थापत्यशास्त्री), इंटिरियर डिझायनर (आंतरिक सज्जा प्रसाधक), मेकॅनिक (यंत्र कारागीर), इंजिनियर्स (अभियंता).
तर्कशुध्द/गणितविषयक कौशल्य
कारण, तर्कशास्त्र आणि अंकांचा वापर करण्याची योग्यता. अशा व्यक्ती तार्किक व अंकशास्त्रीय पध्दतीने माहिती किंवा सूचनांचे अंश किंवा तुकडे जोडून कल्पना करतात. सभोवती असलेल्या जगाबद्दल नेहमीच एक कुतूहल असणे, हे लोक खूप प्रश्न विचारतात आणि ह्यांना प्रयोग करणे आवडते.
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
समस्या सोडविणे, माहिती किंवा सूचनांचे वर्गीकरण करणे, प्रत्येकाच्या दुसर्याशी असलेल्या संबंधास जाणण्यासाठी अमूर्त कल्पनांचा वापर करणे, स्थानिक प्रगती घडवून आणण्यासाठी कारणांची लांबलचक श्रृंखला हाताळणे, नियंत्रित प्रयोग करणे, नैसर्गिक प्रसंगांबद्दल कुतूहल असणे आणि प्रश्न विचारणे, गुंतागुतीची गणिते सोडविणे, भूमितीय आकारांचा वापर करणे.
करियरमधील संभावित मार्ग:
शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, संगणक प्रोग्रॅमर, संशोधक, अकाउंटंटस्, गणितज्ञ.
शारीरिक हालचालींवर ताबा आणि वस्तू कौशल्यपूर्णतेने हाताळण्याचे कौशल्य. अशा व्यक्ती हालचालींद्वारे स्वत:ची अभिव्यक्ती करतात. त्यांना समतोलपणा आणि नेत्र-हस्त समन्वयाची चांगली समज असते (उदा. बॉल खेळणे, बॅलेंसिंग बीम्स्). त्यांच्याभोवती असलेल्या जागेशी सामंजस्य साधून, माहिती किंवा सूचना पुढे पाठविण्यास किंवा लक्षांत ठेवण्यास समर्थ असतात.
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
नृत्य, शारीरिक समन्वय, खेळ, प्रयोग करणे, शारीरिक भाषेचा वापर करणे, हस्तकला, अभिनय, मूक अभिनय करणे, रचना किंवा निर्माण करण्यासाठी हातांचा वापर करणे, शारीरिक हावभावांच्या द्वारे अभिव्यक्ती करणे.
करियरमधील संभावित मार्ग:
क्रीडापटु/धावपटु, व्यायाम शिक्षक, नर्तक, अभिनेता, अग्निशामक, कलाकार
संगीत ऐकण्याची आणि निर्माण करण्याची योग्यता. संगीताचे वेड असलेल्या या व्यक्ती ध्वनी, ताल आणि पध्दती यांच्या माध्यमाने विचार करतात. ते संगीत
ऐकतांना ताबडतोब आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात मग ती टीका असो किंवा स्तुति. यांतील काही व्यक्ती तर आजुबाजुच्या आवाजांच्या बाबतीत फारच संवेदनशील असतात (उदा. क्रिकेट, घंटा, गळत असलेले नळ)
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
गाणे, शिट्या वाजविणे, वाद्ये वाजविणे, स्वरोचित पध्दतीची ओळख असणे, संगीत देणे, माधुर्यमय गाणी लक्षात ठेवणे, संगीताचे प्रारूप आणि ताल यांची समज असणे.
करियरमधील संभावित मार्ग:
संगीतज्ञ, डिस्क जॉकी (डिजे), गायक, कंपोझर
इतरांना जाणून घेण्याची आणि संबंध जोडण्याची योग्यता असणे. या व्यक्ती इतरांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करून त्यांना कसे वाटत असेल किंवा ते कसा विचार करीत असतील ते जाणून घेण्याची क्षमता बाळगतात. त्यांच्याकडे भावना, हेतु आणि उद्दिष्ट यांचा आभास होणारी असामान्य क्षमता असते. ते उत्कृष्ट आयोजक असतात, तथापि काही वेळा ते चाणाक्षपणा करतात. सर्वसामान्यपणे ते गटामध्ये शांतता राखली जावी आणि सहकार्य वाढावे यासाठी प्रयत्न करतात. ते इतरांशी संवाद साधण्यासाठी मौखिक (उदा.वक्तृत्व) आणि गैर-मौखिक (उदा. डोळ्याला डोळे भिडवून, शारीरिक हावभाव) दोन्हीचाही वापर करतात.
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
इतरांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा विचार करणे (दुहेरी विचारसरणी), ऐकणे, स्वत:ला इतरांच्या जागी मानण्याची योग्यता, इतरांच्या भावना आणि मनोवृत्ती समजून घेणे, समुपदेशन, गटांशी सहकार्य करणे, लोकांच्या मनोवृत्ती, हेतु आणि उद्दिष्टे यांचे अवलोकन करणे, इतरांशी मौखिक आणि गैर-मौखिक संवाद साधणे, विश्वास निर्माण करणे, समस्यांचे शांतीपूर्ण निदान, इतरांशी सकारात्मक संवादाची स्थापना करणे.
करियरमधील संभावित मार्ग:
समुपदेशक, सेल्समन (विक्रेता), राजकारणी, व्यवसायी
दुसर्याच्या आंतरिक अस्तित्वाबाबत जागरूक आणि स्व-अभिव्यक्तीची योग्यता असणे. या व्यक्ती त्यांच्या भावना, स्वप्ने, संबंध, आणि ताकद व कमकुवतपणा हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यांच्या कौशल्यांमध्ये समावेश असतो:
स्वत:चे बळ आणि कमकुवतपणा, स्वत:ची अभिव्यक्ती व विश्लेषण करणे, आंतरिक भावना, इच्छा आणि स्वप्नांबद्दल जागरूकता, त्यांच्या विचारसरणीच्या प्रारूपाचे मूल्यांकन, स्वत:शी कारणमीमांसा करणे, इतरांशी संबंध जोडण्यातील त्यांची भूमिका समजून घेणे
करियरमधील संभावित मार्ग:
संशोधक, थेअरिस्टस्, फिलॉसॉफर्स
हॉवर्ड गार्डनरच्या फ्रेम्स ऑफ माइंड (1983) मध्ये संभाव्य उमेदवारांच्या समावेशासाठी (किंवा काढून टाकण्याबाबत) चर्चा होत आहेत. हॉवर्ड गार्डनर आणि त्याच्या सहकर्मींच्याद्वारे अनुक्रमिक संशोधन आणि अभिव्यक्तींमधून तीन संभावना आहेत: निसर्गविषयक कौशल्य, आध्यात्मिक कौशल्य आणि अस्तित्वजन्य कौशल्य.
(Naturalist intelligence) निसर्गविषयक कौशल्यामुळे मानवाला पर्यावरणाची ओळख, वर्गीकरण आणि विशिष्ट लक्षणांकडे लक्ष देण्याची योग्यता मिळते. यामुळे ‘अनेक संस्कृतींचे मूल्यांकन करणार्या एका विशिष्ट भूमिकेच्या लक्षणांचे वर्णन करण्याची संपूर्ण योग्यता एकत्रित करण्याची’ योग्यता मिळते.
परंपरागत पध्दतीने, शाळांमध्ये तार्किक कौशल्य आणि भाषाविषयक कौशल्य (मुख्यत्वे वाचन आणि लेखन) यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ह्या पर्यावरणात काही विद्यार्थी चांगल्या प्रकारे काम करीत आहेत आणि काही नाहीत. गार्डनरचा सिध्दांत म्हणतो की शिक्षणाच्या विस्तृत दृष्टिकोनामुळे विद्यार्थीजनांस जास्त लाभ मिळेल, तर फक्त भाषा विषयक आणि तर्कशास्त्रीय कौशल्य असलेल्याच नव्हे तर, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पध्दती, प्रयत्न आणि गतिविधिंचा वापर करतात.
बहुविध कौशल्याच्या सिध्दांताचे लागूकरण विस्तृत आहे. एखाद्या विद्यार्थ्यास एखाद्या विषयाबाबत काही समस्या असल्यास, त्या सोडविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करून त्याला त्या शिकविण्याचा प्रयत्न करणार्या एका शिक्षकापासून ते एमआयचा उपयोग एखाद्या फ्रेमवर्कप्रमाणे करीत असलेली एक संपूर्ण शाळा ह्या मर्यादेचे पालन करते, सर्वसाधारणपणे, जे लोक विविध कौशल्यांचा विकास आणि उपयोग करण्यासाठी ह्या पध्दतीचा अवलंब करून त्यांच्या विद्यार्थ्यांस संधी देऊ इच्छितात, फक्त त्यांनाच नव्हे ज्यांमध्ये त्यांचे नैसर्गिक कौशल्य आहे.
ज्यामध्ये ह्या सिध्दांताचा वापर केला जातो अशा 41 शाळांचे एक हॉवर्ड-अध्ययन ह्या निष्कर्षावर येऊन पोचले की ह्या शाळांमध्ये एक कठिण परिश्रम, सन्मान, आणि संगोपनाची परंपरा होती; परस्परांपासून काही तरी शिकणार्या आणि त्यांचा संग्रह करणारा शिक्षकगण; अर्थपूर्ण पण निश्चित निवडींच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना कार्यरत ठेवणार्या वर्गांच्या खोल्या, आणि विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्तायुक्त कार्यसंपादन करावे ह्याकडे केंद्रित असणे.
आधारित प्रामाणिक शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना पुरवाल. बहुविध कौशल्याचे वर्ग म्हणजे ‘वास्तविक’ जगच असते: एखाद्या पुस्तकाचा लेखक आणि स्पष्टीकरणकर्ता दोघे ही एक सारखेच महत्वपूर्ण निर्माणकर्ते आहेत. विद्यार्थी जास्त सक्रिय, एकाग्र लर्नर्स बनतात.
आपण किती कुशल/बुध्दिमान आहोत हे विद्यार्थी शिकू लागतात. गार्डनरच्या दृष्टिकोनातून, शिकणे ही सामाजिक व मानसिक अशी दुहेरी प्रक्रिया आहे. जेव्हां विद्यार्थ्यांस त्यांच्या स्वत:चे बहुविध कौशल्य समजू लागते तेव्हां ते
विद्यार्थी किती बुध्दिमान आहेत किंवा कसे बुध्दिमान आहेत हे शिक्षकांना समजते. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये सशक्त अंर्तवैयक्तिक कौशल्याची संभावना आहे हे जाणून घेतल्यास, उदाहरणार्थ, इतरांमध्ये ते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी संधींची निर्मिती तुम्ही करू शकाल. तथापि, बहुविध कौशल्याचा हेतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन आयक्यू पातळी लेबल उपलब्ध करवून द्यावे असा नाही.
विद्यार्थ्यांना विविध पध्दतींनी समजाविता येते. ‘वाळू म्हणजे काय’? ह्या प्रश्नाला शास्त्रीय, काव्यात्मक, कलात्मक, संगीतात्मक, आणि भौगोलिक कडा आहेत.
स्रोत: thirteen.org infed.org
अंतिम सुधारित : 3/4/2020
शिक्षण हक्क अधिनियम
आपला भारत देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो हे आपल...
भारतातील विभिन्न संस्थांमध्ये प्रवेश
शिकविणे आणि शिकणे ही पुष्कळशा अनियमिततांचा/परिवर्...