युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून प्रभावशाली पद्धतीने वापरली जात आहे. भारताला हिची ओळख अरब आणि पर्शिअन लोकांनी अकराव्या शतकाच्या आसपास करुन दिली. आज, भारत हा एक प्रमुख देश आहे जेथे युनानी चिकित्सेचा अभ्यास केला जातो. येथे मोठ्या संख्येने युनानी शैक्षिक, संशोधन आणि आरोग्य संस्था आहेत.
नावाप्रमाणेच, युनानी प्रणाली ग्रीसमध्ये उत्पन्न झाली. युनानी प्रणालीचा पाया हिप्पोक्रेट्सने ठेवला होता. या प्रणालीच्या वर्तमान स्वरुपाचे अरबांना श्रेय जाते कारण त्यांनी जास्तीतजास्त ग्रीक साहित्य अरेबीक मध्ये परिवर्तीत करुन जपले आणि आपल्या दैनंदिन औषधोपचारात देखील याचा समावेश करुन सहभाग केला. त्यांनी प्रक्रियेत भौतिक, रसायन, वनस्पति, एनाटॉमी, फिजियोलॉजी, पॅथोलॉजी, चिकित्सा विज्ञान आणि शल्य चिकित्सा या सारख्या शास्त्रांचा व्यापक उपयोग केला.
मिस्र, सीरिया, इराक, परशीया, भारत, चीन आणि अन्य मध्य पुर्व देशांतील पारंपरिक समकालीन प्रणालींमुळे युनानी औषधांना सखोल समृद्धी मिळाली. भारतात युनानी औषध प्रणाली अरबांनी सुरु केली आणि लवकरच तिची मुळे इथे घट्ट झाली. दिल्लीच्या सुलतानांनी युनानी प्रणाली जाणकारांना संरक्षण दिले आणि काहींना तर राज्यात कर्मचारी म्हणून ठेवले आणि काहींना राजवैद्य म्हणून नेमले.
भारतात ब्रिटिश शासन काळात या प्रणालीला गंभार झटका बसला होता. अलोपॅथी प्रणाली सुरु केली गेली आणि तिला महत्त्व आले. त्यामुळे युनानी औषध प्रणालीचा वापर, संशोधन आणि शिक्षण यासर्वांकडेच दुर्लक्ष झाले. सर्वच पारंपारिक औषध प्रणालींना, युनानी प्रणालीबरोबरच, दोन शतकांपर्यंत दुर्लक्षित केले गेले. सरकारी दुर्लक्षामुळे जास्त नुकसान झाले नाही कारण या प्रणालीवर जनतेने विश्वास दाखविला आणि तिचा वापर करण्यास सुरुवात केली. दिल्लीतील शरीफी कुटुंब, लखनौचा अजीजी कुटुंब आणि हैद्राबादचा निझाम कुटुंब यांच्या प्रयत्नांनी युनानी चिकित्सा ब्रिटिश कालावधीत जिवंत राहिली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युनानी प्रणालीला इतर भारतीय औषध प्रणालींबरोबर राष्ट्रीय सरकार आणि लोकांच्या संरक्षणामुळे परत प्रोत्साहन मिळाले. भारत सरकारने या प्रणालीच्या विकसनासाठी बरीच पाऊले उचलली. तिला नियमित केले, शिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी कायदा जारी केला. औषध निर्मिती आणि त्याच्या वापरासाठी संशोधन केंद्रे, परीक्षण प्रयोगशाळा आणि मानकीकृत नियमांची स्थापना केली. आज युनानी औषध प्रणाली मान्यताप्राप्त चिकित्सक, रुग्णालय आणि शैक्षणिक आणि संशोधन संस्थांबरोबर राष्ट्रीय आरोग्य देखभाल वितरण प्रणालीचा एक अविभाज्य हिस्सा होऊन बसली आहे.
युनानी प्रणालीचा मूळ सिद्धांत प्रसिद्ध हिप्पोक्रेट्सच्या चार प्रकृतींच्या सिद्धांतांवर आधारित आहे. याने शरीरातील चार प्रकृतींचे पूर्वानुमान लावता येतो उदा., रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त.
मानवी शरीर खालील सात घटकांचे बनलेले आहे असे मानले जाते:
मानवी शरीरात चार घटक आहेत. प्रत्येक घटकाचे खालील प्रमाणे आपले स्वभाव आहेत:
तत्व |
स्वभाव |
हवा |
गरम आणि आर्द्र |
धरती |
थंड आणि शुष्क |
आग |
गरम आणि शुष्क |
पाणी |
थंड आणि आर्द्र |
युनानी प्रणालीत, प्रत्येकाचा स्वभाव हा फार महत्वाचा आहे कारण तो अद्वितीय मानला जातो. व्यक्तिगत स्वभाव हा तत्वांमधील संवादांचा परिपाक मानला जातो. जेव्हा चारही तत्व एका समान मात्रेत वापरण्यात येतात तेव्हा स्वभाव न्यायोजीत केला जावु शकतो. याचे अस्तित्व नाही. स्वभाव न्यायसंगत असू शकतो. म्हणजे गरजेपुरता आणि नेमका संगत स्वभाव असणे. शेवटी, स्वभाव विसंगत असू शकतो. या प्रकरणात फक्त स्वभावातील वितरणाची कमतरताच मानवी शरीराच्या आरोग्य वर्धक गरजांमध्ये बाधा आणते.
भाव हे शरीरीतील ते आर्द्र आणि रसयुक्त भाग आहेत जे शरीरात परिवर्तन आणि पोषणानंतर उत्पादित होतात; ते पोषण, विकास आणि दुरुस्तीचे कार्य करतात; आणि व्यक्ती आणि त्याच्या प्रजातींचे वर्धन करण्यासाठी ऊर्जा निर्माण करतात. शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना आर्द्रता देण्याचे कार्य भाव करतात. अन्न पचन हे चार टप्प्यात घडत असते; (1) गैस्ट्रिक पचन जेव्हा अन्न आम्ल आणि पायस मध्ये परिवर्तित होते आणि मेसेंट्रीक नसांमधून यकृताकडे पोहोचविले जाते (2). हेपॅटिक पचन ज्यात आम्लाचे परिवर्तन चार वेगवेगळ्या मात्रेत होते, ज्यात रक्त सर्वात जास्त असते. म्हणूनच, जे रक्त यकृतातून बाहेर पडते ते इतर भावांबरोबर मिसळते उदा. कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त. पचनाच्या तिस-या आणि चवथ्या पायरीला (3) वाहिन्या आणि (4) ऊतक पाचन म्हणतात. जेव्हा भाव रक्तवाहिन्यांमधून वहात असते तेव्हा ऊतके त्यातील पोशक तत्वे त्याच्या शोषण शक्तीने शोषून घेतात आणि धारणाशक्तीने साठवितात. नंतर पाचन शक्ती त्याच्या तुलनात्मक शक्तीने ऊतकात रुपांतरित करतात. या नंतर भावातील अनावश्यक सामग्री ही त्याच्या निष्कासक शक्तीने बाहेर फेकली जाते. या प्रणालीच्या मते भावांच्या संतुलनात कोणत्याही प्रकारची बाधा येते तेव्हा रोग होतो. म्हणूनच, उपचार म्हणजे देहद्रवास संतुलन बहाल करणे होय.
हे मानवी शरीराचे वेगवेगळे अंग आहेत. प्रत्येक अंगाचा रोग किंवा आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करतात.
रुह (आत्मा) हा प्रेरित हवेपासून प्राप्त असा गॅसयुक्त पदार्थ आहे, जो शरीरातील चयापचय गतीविधींमध्ये मदत करतो. तो अख्लत लतीफा हपन करुन कुवा(शक्ती) आणि हजरत घरिझीया प्राप्त करतो, जो शरीराच्या सर्व अंगाच्या जीवन शक्तीचे स्त्रोत आहे. ह्याला जीवन शक्ती मानले जाते आणि, म्हणूनच, रोगाच्या निदान आणि ऊपचारांमध्ये महत्वाचे मानले जाते. हे वेगवेगळ्या ताकतींचे वाहक आहेत, जे शरीर आणि त्याच्या अवयवांना कार्यरत ठेवण्यास, मदत करतात.
हे शक्तीचे तीन प्रकार आहेत:
हे घटक शरीराच्या हालचाली आणि इतर अंगांचे कार्य दर्शवितात. निरोगी शरीरात वेगवेगळे अवयव योग्य आकाराचे तर असतातच शिवाय ते आपले कार्य व्यवस्थित करत असतात. ह्यामुळे मानवी शरीररचनेचे आणि त्याच्या कार्यां विषयीचे सखोल ज्ञान असण्याची गरज आहे.
आरोग्य: आरोग्य म्हणजे मानवी शरीराची वर्तमान परिस्थिती. निरोगी शरीराचे सर्व अवयव सर्वसामान्य रुपाने काम करत असतात. रोग हा आरोग्याच्या विरुद्ध आहे ज्यात एखादा किंवा एका पेक्षा जास्त अवयवात किंवा त्या अवयवांचे कार्यात दोष निर्माण होतो.
निदान: युनानी प्रणालीत निदान हे अवलोकन आणि शरीरिक परिक्षणावर अवलंबून असते. व्यक्तीतील कोणत्याही प्रकारचा आजार हा खालील परिणामांचे स्वरुप असतो:
सर्व अंतर्संबंधित कारके लक्षात ठेवून, आजाराचे कारण आणि स्वरुप ठरविले जाते आणि त्याप्रमाणे त्यावरील उपचार दिला जाते. निदानात आजाराच्या कारणाचे परिक्षण सखोलपणे केले जाते. यासाठी, चिकित्सक मुख्यतः नाडी (नब्ज) पाहतो आणि लघवी आणि मलाची पाहणी करतो. ह्दयाच्या सिस्टोलिक आणि डायस्टॉलीक दबावामुळे धमन्यांचे होणारे वैकल्पिक आकुंचन आणि विस्तारणाला नाडी (नब्ज) असे म्हणतात. नाडी परिक्षण आणि शारिरीक परिक्षणातील मूत्र आणि मलाच्या परिक्षणा बरोबरच अन्य परंपरागत साधनांचा उदा. निरीक्षण, लय आणि प्रच्छादन या सर्वांचा देखील निदानात विचार केला जातो.
या प्रणालीत जास्त भर हा रोगावरील उपचार करण्या बरोबर रोगापासून बचाव करण्यावर दिला जातो. सरळ प्रारंभिक चरणातच मानवी शरीरावर होणारा आसपासच्या वातावरणाचा आणि पारिस्थितिक हालतीचा प्रभाव बघितला जातो. हवा,पाणी आणि अन्न हे प्रदूषण रहित राहावे यावर भर दिला जातो. आवश्यक अशा अनिवार्य सहा वस्तू (असबब सित्ता-ए-जरोरिया) स्वस्थ आणि रोग निवारणासाठी निर्धारित केल्या गेल्या आहेत. त्या म्हणजे:
चांगली आणि स्वच्छ हवा ही आरोग्यासाठी गरजेची मानली जाते. अविसेना ह्या प्रसिद्ध प्रसिद्ध अरब वैद्याने लिहून ठेवले आहे की वातावरणात बदलाने बरेच रोगी रोगमुक्त होतात. त्याच्या मते नेहमी स्वच्छ खेळती आणि मुबलक हवा घरात असणे गरजेचे आहे.
असे सांगितले जाते की प्रत्येकाने रोग उत्पन्न करणा-या पदार्थांपासून मुक्त असे ताजे अन्न खावे. घाण पाणी हे खूपच रोग वाहक मानले जाते. म्हणूनच पाणी कोणत्याही दोषांपासून मुक्त असावे यावर जास्त जोर दिला जातो.
व्यायाम तसेच विश्रांती हे चांगले आरोग्य राखण्यासाठी गरजेचे मानले जाते. व्यायामाने स्नायूंची वाढ होण्यास मदत मिळते आणि त्यामुळे पोषण सुनिश्चित होते, रक्त पुरवठा वाढतो आणि पचन संस्था चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळे हदय आणि जठर चांगले राहण्यास देखील मदत होते.
आनंद, दुख आणि क्रोध इ. सारख्या मानसिक कारकांचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होतो असे देखील प्रणालीत नोंदले आहे. युनानी चिकित्सेची अशी शाखा असून त्याला मनोवैज्ञानिक उपचार म्हणतात, ज्यात ह्या विषयी सखोल माहिती मिळते.
सर्वसाधारण झोप आणि जाग हे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे मानले जाते. झोप माणसाला मानसिक आणि शारीरिक आराम देते. निद्रानाशामुळे ऊर्जेचा अपव्यय होतो, मानसिक दुर्बलता येते आणि पचन प्रणालीत गडबड होते.
योग्य आणि नियमित मलविसर्जन प्रक्रिया ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेची आहे. जर शरीरातील मल योग्य प्रकारे शरीराबाहेर फेकले गेले नाही तर किंवा मलविसर्जनात अडथळा किंवा बाधा आल्यास रोग किंवा आजारपण येते.
ह्या प्रणालीत रोग्याचे संपूर्ण व्यक्तित्व गृहीत धरले जाते. प्रत्येकाच्या शरीराची वेगवेगळी ठेवण, मानसिकता, घडण, प्रतिकारशक्ती, प्रतिक्रिया, आवड आणि नावड असते.
युनानी चिकित्सा उपचाराचे खालील मुख्य प्रकार आहेत:
रेजिमेंटल चिकित्सा ही उपचाराची खास/ भौतिक पद्धती आहे ज्यात शरीरातील अपचिष्ट पदार्थ बाहेर काढून शरीराचे स्वसंरक्षण तंत्र मजबूत केले जाते आणि शरीर संविधानात सुधारणा आणली जातो आणि चांगले आरोग्य राखले जाते. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर ह्या पद्धतीला “विषाक्तमुक्ती पद्धती” देखील म्हणतात.
रेजिमेंटल चिकित्सेचे महत्वाचे तंत्र आणि ते कोणत्या उपचारांत वापरले जाते हे खाली संक्षिप्त स्वरुपात दिले आहे:
कातडीतील घाण, रक्त किंवा शरीरातील इतर अवयवांमधील कचरा घामाच्या सर्वसाधारण प्रक्रियेद्वारे बाहेर टाकणे. शरीरातील अतिरिक्त ऊर्जा कमी होण्यास मदत होते. रुगाण्स घाम आणण्यासाठी सुका किंवा ओला शेक देणे, कोमट पाण्याने अंघोळ, मालिश आणि रुग्णास गरम हवेच्या खोलीत ठेवणे ह्या काही प्रक्रिया आहेत.
विषारी पदार्थ, कचरा आणि आधिकांश देहद्रवी पदार्थ मूत्रा वाटे शरीराबाहेर टाकणे. ह्दय, फुफुस आणि जठराच्या रोगांमध्ये ही प्रक्रिया वापरण्यात येते. कधीकधी डाययूरेसिस थंड पाणी वापरुन किंवा थंड खोलीत रुग्णास ठेवुन देखील अवलंबिण्यात येते.
साधारणपणे अंघोळ थंड पाण्याने उत्तम मानली जाते. मालिश नंतर दिलेली गरम पाण्याने आंघोळ ही लकवा आणि स्नायू आखडणे इ. सारख्या रोगावरील उपचारांमध्ये उत्तम मानली जाते.
युनानी चिकित्सा उपचारात, अन्न हे फार महत्वाची भूमिका बजावतात. अन्नाची गुणवत्ता आणि मात्रा यावर नियंत्रण ठेवून कित्येक रोगांवर सफलतापूर्वक इलाज केला जातो. अशी बरीचशी प्रकाशित पुस्तके आहेत, ज्यात विशिष्ट रोगांवरील आहार विषयासंबधी माहिती लिहिलेली आहे. ठराविक अन्न हे मूत्रवर्धक, रेचक आणि स्वेदजनक मानले जाते.
ह्या प्रकारच्या चिकित्सा पद्धतीत नैसर्गिक ओषधींचा, वनस्पतींचा वापर केला जातो. जनावरांची औषधे आणि खनिजांचा वापर देखील केला जातो. नैसर्गिक ओषधींचा वापर फक्त यासाठी केला जातो की ते स्थानीय स्वरूपात उपलब्ध असतात आणि त्याचा शरीरावर नंतर कोणताही परिणाम होत नाही. युनानी चिकित्सा उपचारांचे असे मानणे आहे की औषधींचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो. या चिकित्सापद्धतीत, प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वभावावर लक्ष केंद्रित करुन त्याप्रमाणे औषधोपचार दिला जातो , म्हणूनच, बरे होण्याची प्रक्रिया वाढते आणि त्याचे दुष्परिणामांचे धोके कमी होतात. औषधे त्याच्या स्वभावाप्रमाणे गरम, थंड, रुक्ष, आर्द्र परिणाम करतात. खरे म्हणजे, औषधांचे त्यांच्या स्वभावाप्रमाणे चार भागात विभाजन करण्यात आले आहे आणि ते रोग्याला देतांना वैद्य रोग्याची क्षमता, त्याच्या वयाप्रमाणे त्याचा स्वभाव, प्रकृती आणि रोगाची तीव्रता पाहूनच औषधे देतात. औषधे ही पावडर, काढे, अर्क, ज्वरिश, मजून, खमिरा, सरबत आणि गोळ्या इ. स्वरुपात वापरली जातात. ह्या चिकित्सेत रुग्णाला औषधे देण्यासाठीचे काही नियम स्थापित केले आहेत.
जरी युनानी प्रणालीत ह्या पद्धतीचा आरंभ झाला असला आणि त्यासाठी स्वतःच्या उपकरणांचा आणि शैलीचा विकास केलेला असला तरीही ह्या चिकित्सेचा वापर अगदी अल्प प्रमाणात केला जातो.
भारतात युनानी औषधींचे उत्पादन औषध आणि प्रसाधन सामुग्री आधिनियम 1940 आणि त्यातील वेळोवेळी समाविष्ट तरतुदींअंतर्गत केले जाते. भारत सरकारचे औषध तांत्रिकी सल्लागार बोर्ड ह्या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असते. एक ड्रग सल्ला समिती देखील असते. केंद्र आणि राज्य सरकार/बोर्डाला औषध आणि प्रसाधन सामुग्री अधिनियमांच्या सामग्री प्रशासनासाठी देशात एकरूपता मिळविण्याच्या मामल्यांमध्ये ही समिती सल्ला देते.
आरोग्य मंत्रालय आणि भारताचे कुटुंब कल्याण सरकारने युनानी फार्माकोपिया समिती स्थापन केली आहे ज्यामध्ये समान मानकांचा विकसित वापर करुन मिश्रित युनानी औषधींचे निर्माण केले जाते. ह्या समितीत विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचा समावेश आहे - उदा. युनानी चिकित्सा, रसायन विज्ञान, वनस्पति विज्ञान आणि औषध विज्ञान.
औषधकोश हे एक मानकांचे पुस्तक आहे, ओषधांना अनुरूप मानके देणे, विश्लेषण/ परीक्षण प्रोटोकॉल आणि त्याच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी पडते. युनानी फार्माकोपिया समितीतर्फे ही मानके विकसित केली जातात / प्रयोगात्मक मापदंड कार्य भारतीय चिकित्सा औषधकोश प्रयोगशाळेवर सोपविण्यात आलेले आहे.
युनानी चिकित्सेसाठीचे राष्ट्रीय फॉर्म्युलरीचे पाच हिस्से आहेत (N.F.U.M) ज्यात 1091 सूत्र आणि युनानी फार्माकोपिया ऑफ इंडियाचे सहा खंड आहेत (U.P.I) ज्यात 298 एकल मूळ औषधींवर मोनोग्राफ आणि युनानी फार्माकोपिया ऑफ इंडिया, भाग-II, खंड I ज्यात 50 सम्मिश्रणे प्रकाशित केली गेली आहेत.
गाझियाबाद येथील भारतीय चिकित्सेची फार्माकोपियल संहिता प्रयोगशाळा (PLIM) ही आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध चिकित्सा पद्धतीची मानके निश्चित करणारी एक औषध परीक्षण प्रयोगशाळा आहे, जिची स्थापना 1970 साली झाली आणि ही आणि राष्ट्रीय स्तरावर औषध प्रसाधन सामग्री अधिनियम 1940च्या कक्षेत सामील झाली. प्रयोगशाळेतील संशोधित माहिती आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध चिकित्सेसंबंधित फार्माकोपियल समितीच्या अनुमतीनंतर आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध चिकित्सेच्या औषध शब्दकोशात प्रकाशित करण्यात येते.
युनानी चिकित्सेसाठीच्या संशोधन परिषदेची स्वतंत्र रुपाने कार्य करण्यास सुरुवात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारताच्या एका स्वायत्त संघटनेच्या रुपाने जानेवारी 1979 पासून झाली:
आधिक माहितीसाठी भेट द्या: www.ccrum.net
युनानी औषध प्रणालीही जनतेत बरीच लोकप्रिय आहे. देशभरात विखुरलेले युनानी चिकित्सेचे चिकित्सक राष्ट्रीय आरोग्य देखरेख वितरण संरचनेचा एक अभिन्न अंग आहेत. उपलब्ध सरकारी आंकड्यांनुसार, 47963 पंजीकृत युनानी चिकित्सक देशभरात आहेत.
सध्या 15 राज्यामध्ये युनानी रुग्णालये आहेत. एकंदरीत देशभरातील वेगवेगळ्या राज्यात कार्यरत असलेली रुग्णालये 263 इतकी आहेत. या सर्व रुग्णालयांत एकूण खाटांची संख्या 4686 इतकी आहे.
देशातील वीस राज्यात युनानी औषधालये आहेत. एकूण युनानी औषधालयांची संख्या 1028 इतकी आहे. तसेच, दहा औषधालयांपैकी- दोन आंध्रप्रदेशात, एक प्रत्येकी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आणि पाच दिल्लीत केन्द्रीय सरकार आरोग्य योजनेंतर्गत(CGHS) कार्यरत आहेत.
युनानी औषध प्रणालीतील शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा वर्तमानात केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषदेच्या देखरेखीत आहे. ही परिषद एक वैधानिक मंडळ आहे जे संसदेच्या एका अधिनियमाद्वारे स्थापित केले गेले आहे ज्याला 1970चा भारतीय केन्द्रीय चिकित्सा परिषद अधिनियम म्हणतात. आज देशात युनानी औषध प्रणालीची ४० मान्यताप्राप्त कॉलेजे आहेत व त्यांमधून शिक्षण आणि प्रशिक्षण सुविधा पुरवितात. ह्या कॉलेजात एकूण प्रवेश क्षमता स्नातक पाठ्यक्रमासाठी 1770 दर वर्षी इतकी आहे. ह्या एकतर सरकारी संस्था आहेत किंवा स्वयंसेवी संस्थांद्वारे स्थापित आहेत. ह्या सर्व शैक्षणिक संस्था विभिन्न विश्वविद्यालयांशी संबद्ध आहेत. केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषदेने निर्धारित केलेला पाठ्यक्रम या संस्थांद्वारे चालवला जातो.
स्नातकोत्तर शिक्षण आणि संशोधन सुविधा इल्मुल अदविया(औषध विज्ञान), मोआलिजत (औषधे), कुल्लियत (मूळ सिद्धांत), हिफजान-ए-सेहत (स्वच्छता), जराहियत (शल्य चिकित्सा), तहाफुझी वा समाजी तिब्ब, अमराज-ए-अतफल आणि कबाला-वा- अमराज-ए-निसवान (स्त्री रोग) या विषयात उपलब्ध आहेत. एकूण ह्या पाठ्यक्रमांची प्रवेश क्षमता 79 इतकी आहे.
आधिक माहितीसाठी भेट द्या: www.nium.in
राष्ट्रीय युनानी चिकित्सा संस्थान, बंगलोर ची नोंदणी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत 19 नोव्हेंबर 1984 ला उत्कृष्टतेचे एक केंद्र म्हणून आणि युनानी चिकित्सा प्रणालीचा प्रचार तसेच विकास करण्यासाठी झाली. N.I.U.M. हा भारत सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. ते राजीव गांधी आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय, बँगलोर, कर्नाटकाशी संबद्ध आहे.
स्नातकोत्तर शिक्षण आणि संशोधन सुविधा इल्मुल अदविया(औषध विज्ञान), मोआलिजत (औषधे), कुल्लियत (मूळ सिद्धांत), हिफजान-ए-सेहत (स्वच्छता), जराहियत (शल्य चिकित्सा), तहाफुझी वा समाजी तिब्ब, अमराज-ए-अतफल आणि कबाला-वा- अमराज-ए-निसवान (स्त्री रोग) या विषयात उपलब्ध आहेत. एकूण ह्या पाठ्यक्रमांची प्रवेश क्षमता 79 इतकी आहे.
आधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या: www.nium.in
स्त्रोत : आयुष विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
अंतिम सुधारित : 4/27/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...