इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे. याचे अनेक प्रकार आहेत व ते योगविषयक पुस्तकात विस्ताराने दिलेले असतात. इथे फक्त त्यांतला एक प्रमुख प्रकार नमूद केला आहे. हा प्राणायाम पूरक-कुंभक-रेचक या नावाने ओळखला जातो.
यात वेळेचे प्रमाण अनुक्रमे 1:4:2 असे असते. म्हणजे पूरक (श्वास आत घेणे) 4सेकंदभर, तर कुंभक (आत ठेवणे)16 सेकंद व रेचक (श्वास सोडणे) 8 सेकंद याप्रमाणे नियम आहे. यासाठी कोठल्याही स्थिर आसनाची सवय झाली की पुरते. (मांडी घालूनही चालते, पद्मासन, सिध्दासन इ. आसनेही वापरली जातात). श्वास आत घेताना नाकाच्या मोकळया बाजूने सुरुवात करून दुस-या बाजूने सोडावे. पुढच्या श्वसनाचे वेळी नाकाच्या उलट बाजूने सुरुवात करावी. हा प्राणायाम करण्याआधी बंध शिकावे लागतात. सुरुवातीस दीर्घ श्वसन (संथश्वसन) शिकणे हे सर्वात सुरक्षित व सोपे असते. बसून, उताणे पडून किंवा उभ्या उभ्याही संथ श्वसन करता येईल. उताणे अवस्थेत 'पोटाने' संथ श्वसन केल्यास मन लवकर शांत होते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community मेडिसिन)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तिला ‘योगच...
स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्य...
२१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप...
यात योग थेरेपी क्षेत्रातील पर्याया विषयी असलेल्या ...