पोटाचे पाठीचे व तत्संबंधी विशेष विकार असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय व मार्गदर्शना शिवाय हे आसन करू नये.
१. जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत.
२. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा.
३. श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या.
४. मागचा भाग उचलल्यानंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या.
५. शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा.
६. श्वास सोडताना क्रमशः पूर्व स्थितीत या. श्वासोश्वास सामान्य झाल्यावर पुनः करा. असे ३-४ वेळा करा.
१. कणा लचकदार व स्वस्थ होतो. सर्वाइकल, स्पाँडीलायटीस, कंबर दुखणे व उदर रोगात लाभदायक आहे.
२. नाभी सरकली असल्यास फायदा होतो.
३. स्त्रियांच्या मासिक धर्माविषयी अडचणीत लाभदायक आहे.
४. मूत्रपिंड निरोगी करून मूत्र विकार दूर होतो भीतीमुळे मूत्र स्त्राव होत असल्यास हे आसन लाभदायक आहे.
संदर्भ : ग्लोबल मराठी
अंतिम सुधारित : 10/7/2020
पोटावर झोपून दोन्ही पाय सरळ स्थितीत वर उचलून स्थिर...
या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने य...
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व ...
या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत अ...