या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.
१) पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत.
२) दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्वास सोडा व श्वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्वसन संथपणे सुरू ठेवा.
३) आसन सोडताना श्वास सोडत सावकाळ पूर्ववत स्थितीत या.
१) या आसनात पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे पचनांद्रियांवर चांगले परिणाम होतात. त्यामुळे पचनेंद्रियांवर चांगले परिणाम होतात.
२) पाठीचा कणा लवचिक होतो.
३) पाठीच्या कण्यातील स्नायू कार्यक्षम होतात.
स्त्रोत : ग्लोबल मराठी
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 10/7/2020
विपरीत शयनस्थिती. पाठीमध्ये संपूर्ण कमान, मागील बा...
प्राणायामच्या प्रकारांविषयी माहिती यामध्ये दिली आह...
पोटावर झोपून दोन्ही पाय सरळ स्थितीत वर उचलून स्थिर...
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व ...