हानेमान यांची अनेक शास्त्रांमध्ये उत्तम गती असल्याने तसेच रसायनशास्त्राची चांगली माहिती असल्याने त्यांनी सर्व प्रयोग अत्यंत काटेकोरपणे केले. त्यांचे परिणाम ते नोंदवीत गेले. औषधे सूक्ष्म करण्याकरता त्यांनी शतांश पध्दत वापरली. म्हणजे प्रथम औषध विशिष्ट प्रकाराने तयार केले. नंतर त्या औषधाचा एक भाग आणि वाहकाचे नव्याण्णव भाग (म्हणजे पाणी, किंवा मद्यार्क), दुग्धशर्करा यांसारखे अप्रकियाशील पदार्थ घेतले. त्यानंतर त्यांच्यावर निश्चित क्रमाने धक्के देणे (द्रवांसाठी ) किंवा घनरूपपदार्थासाठी एकाच दिशेने खलणे अशा पध्दतीने 'एक्र' शक्तीचे औषध निर्माण केले.
'दोन' शक्तीचे औषध करताना त्यांनी वरील एक शक्तीच्या औषधाचा एक भाग घेतला व त्यात आणखी नव्व्याण्णव भाग वाहक घातले. पुन्हा धक्के देणे अथवा खलणे आवश्यक आहेच. याचा अर्थ असा, की होमिओपथीच्या 'दोन' शक्तीच्या औषधाच्या एक घन से. मी. मध्ये 1/10,000 घन सें.मी इतके भाग औषध असते. हाच आकडा आपण 1x100-2असा लिहू शकतो.
होमिओपथीच्या उपचारामध्ये सामान्यत: 30 किंवा अधिक शक्तीचे औषध वापरले जाते. म्हणजेच हा आकडा आपण 1/10030 किंवा 1x100-30 असा लिहू शकतो. होमिओ औषधांच्या नावापुढे घातांकांचा आकडा लिहिलेला असतो. यालाच कोणी औषधाची शक्ती किंवा 'पोटेन्सी' म्हणतात. पण त्याला शक्ती म्हणणे घोटाळयांचे आहे. कारण तो औषधाच्या सूक्ष्मतेचा आकडा आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 5/2/2020
औषधे वापरण्याच्या बाबतीत महत्त्वाचा नियम म्हणजे धी...
काही रोगांच्या साथी येतात,त्यांत काही जण बळी पडतात...
डोक्यात कोंडा होणे ही तक्रार खूपदा आढळते. स्त्रिया...
पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्र...