सध्या आरोग्य क्षेत्रात ढोबळमानाने दोन दृष्टिकोनातून काम केले जात आहे. एक म्हणजे सेवाभावी दृष्टिकोन ज्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यसेवा पुरवणे हा त्याचा मुख्य हेतू असतो. आणि दुसरा दृष्टिकोन म्हणजे हक्काधारित दृष्टिकोनातून काम करणे. यामध्ये आरोग्यसेवा मिळणे हा लोकांचा अधिकार आहे. लोकांना आरोग्यसेवा पुरवण्याची मुख्य जबाबदारी सरकारची असून लोकांना जर ती मिळत नसेल तर सरकारकडे मागण्यासाठी लोकांना उभे करण्याचा मुख्य हेतू या दृष्टिकोनात आहे. या हक्काधारित दृष्टिकोनाबद्दलची सविस्तर मांडणी या मोड्युलमध्ये केली आहे. त्याचप्रमाणे आरोग्याची खर्या अर्थाने व्याख्या कशी करावी? आरोग्यावर परिणाम करणारे आधारभूत घटक कोणते? समाजातील सामाजिक, आर्थिक विषमता, त्यांचा व्यक्तीच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो व त्यांना कमी तसेच प्रतिबंधित करण्यासाठी हक्काधारित दृष्टिकोनातून बघण्याची कशी गरज आहे याबद्दलची माहिती आपण या मोड्युलद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य अबाधित राखणे हे शासनाचे कर्तव्य तसेच जबाबदारी असते. शासनाचे नागरिकांच्या आरोग्याप्रती असलेले दायित्व व त्याची पूर्तता करून घेण्यासाठी नागरिकांना हक्काचा वापर कसा करता येईल याचा ऊहापोह या मोड्युलमध्ये करण्यात आलेला आहे.
या मोड्युलमध्ये सुरुवातीला आपण मानवी हक्कांची संकल्पना, व आरोग्याला हक्काधारित दृष्टिकोनातून कसे बघता येईल याबद्दल चर्चा करणार आहोत. तसेच समता, समानता व आरोग्यविषयक विषमता म्हणजे काय? त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो? लिंगभाव म्हणजे काय? स्त्री आरोग्यासंबंधीचे प्रश्न कोणते? हे समजून घेणार आहोत व आपापल्या पातळीवर विकेंद्रितरित्या आरोग्यविषयक नियोजन करून हे प्रश्न कसे सोडवायचे याबद्दलची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना दूर करण्यासाठी आपापल्या पातळीवर विकेंद्रीतरित्या आरोग्याचे नियोजन करून कसे सोडवायचे याबद्दलची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे मोड्युल विकसित करण्यासाठी आमच्या ‘साथी’ संस्थेच्या विविध प्रकाशनांची मदत झाली असून ‘कर्वे समाज सेवा’ संस्था व आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्यसेवांवर सामाजिक उत्तरदायित्व व कृतीसाठी काम करणार्या ‘कोपासा’ या नेटवर्कच्या सुकाणू समितीने या मोड्युलचे समीक्षण केले आहे.
मोड्युल मधील अंतर्भूत मुद्दे
माहिती स्रोत: sathicehat.org (साथी, पुणे)
अंतिम सुधारित : 3/5/2020
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक...
या विभागात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्या...
आरोग्य आधार व आरोग्यसेवांचा अधिकार - हक्काधारित द...
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक...