लोकाधारित देखरेख सुरू असलेल्या गावांपैकी प्रत्येक निवडक गावांमध्ये आरोग्यसेवांबद्दल लोकांच्या गरजा/ मागण्या गोळा करण्यासाठी कमीतकमी 2 बैठकांचे आयोजन होणे आवश्यक आहे. यासाठी पहिली बैठक गाव आरोग्य पाणी पोषण समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व गाव पातळीवरील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आणि दुसरी बैठक वंचित गटांसोबत व स्त्रियांसोबत होणे अपेक्षित आहे.
तालुका पातळीवरील संस्था/ संघटनेच्या प्रतिनिधीने आशा/अंगणवाडी सेविकेबरोबर समन्वयाने काम करून स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक गरजांचे नियोजन व्यवस्थित कसे पार पडेल याची जबाबदारी घ्यावी.
गटचर्चांमध्ये लोकांकडून पुढील प्रश्नांवर लक्ष्य केंद्रित करून चर्चा घडवून आणावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव-
प्रा.आ.केंद्राचे नाव- गावाचे नाव-
आरोग्यसेवांविषयक विविध पातळ्यांवरील कमीतकमी 5 गरजा/मागण्यांचा प्राधान्यक्रमानुसार तक्ता
क्र. |
गाव/उपकेंद्र पातळी (।1) |
प्रा.आ.केंद्र पातळी (।2) |
ग्रा.रु./उपजिल्हा रु. पातळी (।3) |
|
|
|
|
|
|
|
|
प्रत्येक गावातून पुढे आलेल्या गरजा यांचे प्रा.आ.केंद्रानुसार एकत्रीकरण करावे. त्यानंतर आलेल्या गरजांचे प्राथमिक वर्गीकरण करण्यासाठी पुढील आराखड्याचा वापर करावा. हे वर्गीकरण प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व लोकाधारित देखरेख प्रक्रियेतील संस्थेच्या प्रतिनिधी यांनी मिळून करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव-
प्रा.आ.केंद्राचे नाव- गावाचे नाव-
सार्वजनिक आरोग्यसेवांसंदर्भातील मागण्यांचे पी.आय.पी.मध्ये रूपांतर करण्यासाठीं खालीलप्रकारे वर्गीकरण करावे-
सार्वजनिक आरोग्यसेवांसंदर्भातील मागण्यांचे वर्गीकरण |
|||
क्र. |
गाव/उपकेंद्र पातळी (।1) |
प्रा.आ.केंद्र पातळी (।2) |
ग्रा.रु./उपजिल्हा रु. पातळी (।3) |
लोकाधारित देखरेखीतून सुटू शकणारे मुद्दे (।) |
बजेट/ निधीची गरज असलेले मुद्दे (।) |
धोरणात्मक मुद्दे किंवा सध्याच्या शासकीय व्यवस्थेत बदल करून सोडविण्याचे मुद्दे (।) |
|
|
|
|
|
|
|
|
|
जे मुद्दे लोकाधारित देखरेख प्रक्रियेच्या माध्यमातून सुटू शकतात अशा मुद्द्यांची चर्चा देखरेख व नियोजन समिती बैठक, जनसंवाद इ. मध्ये करून सोडविण्याचा प्रयत्न करावा. लोकाधारित देखरेख प्रक्रियेतून सुटू शकणार्या मुद्द्यांची नोंद करण्यासाठी पुढील आराखडा वापरावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव-
प्रा.आ.केंद्राचे नाव- गावाचे नाव-
क्र. |
मागणीचे स्वरूप |
गाव/प्रा.आ.केंद्र/ग्रा.रु./ जिल्हा रु.चे नाव |
अपेक्षित कृती |
जबाबदार व्यक्ती/ समिती/ संस्था |
कालावधी |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लोकांच्या ज्या गरजा/ मागण्या जिल्हा नियोजन कृती आराखडा (पी.आय.पी.) प्रक्रियेतून सुटू शकतात, त्यांचे बजेट प्रस्तावात रूपांतर करण्यासाठी पुढील आराखडा वापरावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव- तारीख-
मागणीचे राज्य नियोजन कृती आराखडा (पी.आय.पी.) कालावधी 20....बजेट प्रस्तावात रूपांतर करण्यासाठी आवश्यक माहिती (Background Information required for approval of State PIPs for the period 20...)
Name of Activities |
No. of Unit |
Unit Cost (Rs.) |
Total Budget (Rs.) |
Remarks |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लोकसहभागातून जे बजेट प्रस्ताव तयार होतील, ते सर्व प्रस्ताव जिल्हा पातळीवरील समित्यांमध्ये मांडून त्यावर मंजुरी घेणे आवश्यक आहे. अशा मंजूर झालेल्या बजेट प्रस्तावांचा पी.आय.पी.मध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व शल्य चिकित्सक यांची आहे.
आराखडा 2.3- बजेट/निधीची आवश्यकता असलेले रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून सुटू शकणार्या मुद्द्यांसाठीचा आराखडा
लोकांच्या ज्या गरजा/ मागण्या रु. क. स. निधीतून सुटू शकतात, असे मुद्दे रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत मांडून त्यावर चर्चा करावी व चर्चेअंती नोंदींसाठी पुढील आराखडा वापरावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव-
आरोग्य संस्थेचे नाव- |
तारीख- |
|||
मागणीचे स्वरूप |
अपेक्षित कृती |
जबाबदार व्यक्ती/ समिती/ संस्था |
कालावधी |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जे मुद्दे सोडविण्यासाठी धोरणात्मक किंवा सध्याच्या शासकीय व्यवस्थेत बदल करायची आवश्यकता आहे, असे जिल्हा व राज्य पातळीवर उपस्थित करण्याचे मुद्दे नोंदविण्यासाठी पुढील आराखडा वापरावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रिया
जिल्ह्याचे नाव- तालुक्याचे नाव-
आरोग्य संस्थेचे नाव- तारीख-
क्र. |
मागणीचे स्वरूप |
अपेक्षित कृती |
जबाबदार व्यक्ती/ समिती |
संस्था कालावधी |
|
|
|
|
|
विकेंद्रीत-लोकसहभागी नियोजन प्रक्रियेत वेगवेगळ्या पातळ्यांवर सहभागी असलेले लोक आणि यंत्रणा-
एनएचएम मधील पीआयपी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बजेट प्रस्ताव मांडणे व त्याची मान्यता घेणे. |
|
राज्यस्तरीय यंत्रणा: राज्य आरोग्य यंत्रणा, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, राज्य समन्वय संस्था आणि इतर |
|
स्थानिक पातळीवर लोकसहभागी नियोजन प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक आदेश काढणे, क्षमताबांधणी करणे, |
तयार बजेट प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी निधीचा योग्य स्त्रोत शोधून त्यामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे. |
|
जिल्हास्तरीय यंत्रणा: जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा समन्वय संस्था |
|
स्थानिक पातळीवर प्रक्रिया राबविण्यासाठीची जबाबदारी निश्चित करणे, क्षमताबांधणी करणे. |
मोठ्या प्रमाणात निधीची गरज असलेल्या मागण्यांचे बजेट प्रस्ताव तयार करणे. गावातून आलेल्या गरजांचे एकत्रीकरण, विश्लेषण आणि वर्गीकरण करणे. |
|
तालुकास्तरीय यंत्रणा: तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्ण कल्याण समिती, वैद्यकीय अधिक्षक, स्थानिक संस्था-संघटना |
|
लोकसहभागातून जनजागृती कार्यक्रम, नियोजन कृती कार्यक्रम घडवून आणणे. |
गावातील आरोग्यसेवांच्या गरजांबाबत माहिती गोळा करणे. |
|
स्थानिक/गाव आणि आरोग्य केंद्र स्तरावरील यंत्रणा: गाव आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पोषण आहार समिती; रुग्ण कल्याण समिती, प्रा.आ.केंद्र अधिकारी-कर्मचारी आणि गावपातळीवरील आरोग्य यंत्रणा |
|
|
लेखन, संकलन, संपादन: हेमराज पाटील, डॉ. नितिन जाधव, श्वेता मराठे, दिपाली यक्कुंडी
माहिती स्रोत: साथी (SATHI- Support for Advocacy & Training to Health Initiatives)
अंतिम सुधारित : 1/30/2020
काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चा...
2007 पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे....
भारतातली सध्याची आरोग्यसेवा ही एका अरिष्टात सापडले...
या सर्व आजार आणि मृत्यूदरांच्या पार्श्वभूमीवर भारत...