AIDS एक असाध्य पण बचाव होऊ शकेल असा रोग आहे. HIV, तो व्हायरस ज्यामुळे AIDS होतो, असुरक्षित यौनक्रिया (कंडोमरहित संभोग), अशुध्द रक्त चढविले जाणे, किंवा दूषित सुया आणि सिरिंजेस् (ज्या बहुतेक ड्रग देण्यासाठी उपयोग करण्यात आलेल्या आहेत) चा वापर करणे, आणि एखाद्या संसर्गग्रस्त मातेपासून तिच्या मुलास गर्भावस्थेच्या काळात, प्रसूतीच्या वेळी किंवा स्तनपान करवितांना संसर्गग्रस्त करीत आहे.
AIDS ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे होतो. जो शरीराच्या सुरक्षा प्रणालीस इतर रोगांशी लढा देण्याच्या शक्तिला क्षतिग्रस्त करतो.
HIV संक्रमित लोक सामान्यतया रोगाचे कोणते ही लक्षण आढळल्याविना पुष्कळ वर्षां पर्यंत जगतात. ते सुदृढ दिसत असतील किंवा त्यांना तसे वाटत असेल, तरी पण ते एखाद्याला व्हायरस पास करू शकतात.
AIDS, HIV संसर्गाचे अंतिम चरण आहे. AIDS ग्रस्त लोक अशक्त होतात कारण त्यांच्या शरीरात रोगप्रतिबंधक क्षमता संपलेली असते. प्रौढांमध्ये, सरासरी, संसर्गाच्या 7 ते 10 वर्षांनंतर AIDS चा विकास होतो. तरूणांमध्ये हा फार तीव्र आहे. AIDS बरा नाही होऊ शकत, पण नवीन औषधे AIDS ग्रस्त लोकांना दीर्घकाळासाठी आरोग्यमय जीवन जगण्यास मदत करीत आहेत.
बहुतेक बाबतीत, HIV असुरक्षित यौनक्रिये द्वारे, ज्यामध्ये संसर्गग्रस्त व्यक्तिचे वीर्य, योनिमार्गातील द्रवपदार्थ किंवा रक्त दुसÚया व्यक्तिच्या शरीरात जाते.
एचआयव्ही, अनस्टेरेलाइज्ड सुया किंवा सिरिंजेस्, ज्या बहुतेक ड्रग देण्यासाठी उपयोग करण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यापासून पसरतो. उपयोग केलेले रेझर, चाकू किंवा अवजारे जी त्वचेमध्ये टोचून आत घुसतात, एचआयव्हीचा धोका तयार करतात.
सर्व ब्लड ट्रान्सफ्यूजन्स् चे HIV साठी स्क्रीनिंग करायला हवे. संसर्गग्रस्त लोकांना स्पर्श केल्याने HIV पसरत नाही. आलिंगन, हात मिळविणे, खोकणे आणि शिंकणे देखील हा रोग पसरवित नाहीत. HIV शौचकूप, टेलिफोन, ताटे, ग्लासेस, जेवायची भांडी, अंथरूणावरील चादरी, पोहण्याचे तलाव किंवा सार्वजनिक न्हाणीघरापासून पसरत नाही.
HIV/AIDS डास किंवा इतर कीटकांमुळे पसरत नाही.
HIV/AIDS ग्रस्त मुलास आणि किशोरांस सामान्य शिशुरोग, जे घातक ठरू शकतात, त्यांच्यापासून बचावासाठी चांगले पोषण, टीकाकरण आणि नियमित आरोग्य देखभालीची आवश्यकता आहे. जर मूल संसर्गग्रस्त आहे, तर त्याचे आईवडिल संसर्गग्रस्त असण्याची खूप अधिक संभावना आहे.
घरी येऊन लक्ष ठेवण्याची (होम केयर) आवश्यकता पडू शकते.
त्या देशांमध्ये जेथे HIV संसर्ग दर उच्च आहे, मुलांना संसर्ग होण्याचा धोका नाही, तथापि HIV/AIDS मुळे त्यांच्या कुटुंबावर आणि समुदायांवर होणाÚया परिणामांचा प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो.
HIV/AIDS प्रभावित कुटुंबांना जवळ ठेवण्याचे प्रयास झाले पाहिजेत. अनाथ मुलांना एखाद्या संस्थेत ठेवणे देखील टाळायला हवे कारण जर कोणी या मुलांचा सांभाळ करेल तर, मुले लवकर शहाणी होतात.
खूप थोड्या तरूणांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य आणि अचूक माहिती प्राप्त होत आहे. शाळेत जाणाÚया मुलांना HIV/AIDS च्या बाबतीत योग्य माहिती देणे आवश्यक आहे जोपर्यंत ते सेक्शुअली सक्रिय होतील. या वयात देण्यात आलेल्या अशा माहितीचा परिणाम हा झाला की त्यांनी हे फार उशीरा सुरू केले आणि लोकांना याबद्दल शिक्षण दिले.
मुलांस संस्थेमध्ये, रस्त्यांवर, किंवा शरणार्थी कैंपांमध्ये राहात आहेत, त्यांना देखील इतर मुलांपासून HIV/AIDS संसर्गाचा धोका असतो. त्यांना देखील आसरा देण्याची आवश्यकता आहे.HIV काउंसिलिंग आणि परीक्षण HIV संसर्गाबाबत लवकर माहिती मिळविणे आणि ज्याला संसर्ग झालेला आहे त्यांना योग्य सहाय्य सेवा देण्यात, त्यांना जर इतर काही संसर्गजन्य आजार असेल तर त्याच्या उपचारात मदत करते आणि HIV/AIDS सह कसे जगावे याबाबत आणि इतर लोक कशाप्रकारे जगतात याच्या संसर्गापासून बचव करायचा त्याबाबत ज्ञान प्राप्त करीत आहेत.
काउंसिलिंग आणि परीक्षण त्या लोकांनाच मदत करते ज्यांना संसर्ग झालेला नाही आणि त्यांना सुरक्षित यौनक्रियेच्या द्वारे संसर्गरहित राहण्याबाबत शिकविले जाते.
जर एखाद्या HIV/AIDS परीक्षणाचा परिणाम नकारात्मक येतो, तर याचा अर्थ ती व्यक्ति संसर्गरहित आहे किंवा मग या समयी व्हायरसचे परीक्षण करणे घाईचे ठरेल. HIV साठी करण्यात आलेले रक्तपरीक्षण सुरूवातीच्या सहा महिन्यांत संसर्गास ओळखू शकणार नाही असा संभव आहे. HIV च्या एखाद्या ही संभाव्य संपर्काची शंका असल्यावर हे परीक्षण सहा महिन्यांनंतर पुन्हा करविणे. या प्रकारे संसर्गग्रस्त व्यक्ति व्हायरस केव्हा ही पसरवू शकतो, सेक्सच्या दरम्यान कंडोमचा वापर करणे किंवा पेनिट्रेशन टाळणे खूप महत्वपूर्ण आहे.
कुटुंबे आणि समुदायांना HIV/AIDS चे गुप्त काउंसिलिंग, परीक्षण आणि माहितीची मागणी करायला हवी ज्यामुळे प्रौढ आणि मुलांना देखील याच्या संसर्गापासून वाचविण्यास मदत मिळेल.
HIV/AIDS ग्रस्त जोडप्यास मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. जर एक पार्टनर संसर्गग्रस्त आहे तर गर्भधारणेच्या प्रयासाच्या वेळी तो दुसÚयाला ही संसर्गग्रस्त करू शकतो.
जर युवा HIV च्या पसरण्याबाबत माध्यमांच्यासंबंधी माहिती मिळवितील, सेक्सपासून दूर राहतील, आणि सेक्सच्या वेळी कंडोमचा वापर करतील तर, HIV ला आगामी पिढीमध्ये पसरण्यापासून बचाव करता येईल.
दोन संसर्गरहित भागीदारंच्या मधील परस्पर निष्ठा त्यांना HIV/AIDS पासून सुरक्षित ठेवते.
जितके जास्त सेक्स पार्टनर असतील, त्यांच्यातील एकास लागलेला HIV/AIDS संसर्ग इतर लोकांपर्यंत अवश्य पोचेल. तथापि, एखाद्याला ही HIV/AIDS होऊ शकतो – हे त्यांच्यासाठी प्रतिबंधित नाही ज्यांचे अनेक सेक्स पार्टनर आहेत.
एखाद्याला HIV/AIDS आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा सर्वांत चांगला मार्ग रक्त परीक्षण आहे. संसर्गग्रस्त व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ दिसू शकतो.
जोपर्यंत दोन पार्टनर परस्पर सेक्स करीत आहेत आणि त्यांना हे माहित आहे की दोघे ही संसर्गरहित आहेत, त्यांनी सुरक्षित सेक्स करायला हवे. सुरक्षित सेक्स म्हणजे नॉन-पेनिट्रेटिव सेक्स (ज्या यौनक्रियेमध्ये शिश्नाचा प्रवेश तोंड, योनिमार्ग किंवा गुदामार्गात केला जात नाही) किंवा दर वेळी यौनक्रियेत एक नवीन लॅटेक्स कंडोमचा उपयोग करणे. (लॅटेक्स कंडोम जनावरांच्या कातडीच्या कंडोमपेक्षा जास्त मऊ असतात आणि यांमध्ये ब्रेकेज किंवा लीकेजचा धोका नसतो). कंडोम कधी ही दुसÚयांदा वापरू नये.
लुब्रिकेशन बरोबर येणारे कंडोम (स्लिपरी लिक्विड किंवा जैल) च्या फाटण्याची कमी शंका असते. जर कंडोम नीट लुब्रिकेटेड (स्लिपरी) नसेल तर, ‘वॉटर बेस्ड’ लुब्रिकेंट (तैलीयपणा), जसे सिलिकॉन किंवा ग्लिसरीन, उपयोग करावा. जर असे लुब्रिकेंट उपलब्ध नसतील तर, लाळेचा (तोंडातील लाळ) उपयोग करावा. तेल किंवा पेट्रोलियमपासून तयार केलेल्या लुब्रिकेंट (स्वयंपाकाचे तेल, मिनरल किंवा बेबी ऑइल, पेट्रोलियम जेली जसे व्हॅसलीन, बहुतेक लोशन्स्) चा उपयोग कधी ही करू नये कारण हे कंडोमला हानि करतात. चांगले तैलीय कंडोम गुदामैथुनाच्या दरम्यान बचावासाठी आवश्यक आहे.
कारण बहुतेक सेक्शुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन्स् (STIs) जननेंद्रियाच्या संपर्काने होत आहेत, जननेंद्रियाचा संपर्क आरंभ होण्याआधी, कंडोम उपयोगात आणायला हवा.
शिश्नप्रवेश रहित यौनक्रिया HIV संसर्गापासून बचाव करण्याचा आणखी एक सुरक्षित मार्ग आहे तरीका आहे (यद्यपि हा देखील सर्व STIs पासून पूर्णपणे वाचवू शकत नाही).
पुरूषांच्या कंडोमचा सुरक्षित पर्याय स्त्रियांचा कंडोम आहे. स्त्रियांचा कंडोम एकदम मुलायम, लूज-फिटिंग (ढीला) पॉलीयूरेथिनचा पापुद्रा असतो ज्याला योनिमार्गाच्या आंत ठेवावे लागते. याच्या दोन्ही टोकांना मुलायम रिंग आहेत. बंद टोकाचे रिंग या साधनास सेक्सच्या वेळी योनिच्या आंतमध्ये टाकून बरोबर जागी पकडून ठेवते. इतर रिंगयुक्त टोक योनिच्या बाहेर राहते आणि लॅबियाला थोडे-से झाकून टाकते. सेक्स आरंभ होण्याआधी, स्त्री आपला कंडोम बोटांनी आंतमध्ये टाकते. पुरूषांच्या कंडोमपेक्षा बिल्कुल भिन्न, स्त्री कंडोम एखाद्या क्रीम बरोबर टाकला जाऊ शकतो – मग तो लुब्रिकेंट वॉटर बेस्ड, ऑइल बेस्ड किंवा पेट्रोलियम जेली बेस्ड असला तरी, कारण हा पॉलीयूरेथिनने तयार केलेला असतो.
अल्कोहोल पिणे किंवा मादक द्रव्य घेणे यांमुळे परिणामांमध्ये हस्तक्षेप होतो. जे AIDS चे धोके जाणतात ते कदाचित अल्कोहोल पिणे किंवा कोणते ही मादक द्रव्य घेण्या नंतर सुरक्षित सेक्सचे महत्व विसरू शकतात.
पुष्कळशा देशांत, किशोरवयीन मुलींमध्ये HIV दर किशोर मुलांपेक्षा जास्त आहे. किशोरवयीन मुलींमध्ये HIV संसर्गाचा जास्त धोका आहे कारण:
मुली आणि स्त्रियांना नको असलेल्या आणि असुरक्षित यौनाचारास नकार देण्याचा अधिकार आहे. आईवडिल आणि शिक्षकांनी मुला-मुलींना याबाबत शिकवायला हवे आणि त्यांना मुली आणि स्त्रियांच्या अधिकारांसंबंधी जागरूक केले पाहिजे, मुलींना समान समजणे आणि त्यांचा सन्मान करणे, आणि नको असलेल्या सेक्सच्या बाबतीत स्वत:ची मदत करण्यात त्यांचे सहाय्य करणे सर्व मुलांना देखील सांगायला हवे.
तरूणांना HIV/AIDS च्या धोक्याच्या बाबती सांगणे आवश्यक आहे. आईवडिल, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पालक किंवा समुदायाची प्रतिष्ठित लोक तरूणांचे मार्गदर्शन करू शकतात. हे लोक तरूणांना HIV/AIDS आणि STIs आणि नको असलेल्या गर्भाच्या बाबतीत सतर्क करू शकतात.
तरूणांबरोबर यौनविषयक मुद्द्यांवर बोलण्यास संकोच होऊ शकतो. शाळेतील मुलांशी या बाबतीत बोलणी सुरू करण्यासाठी हेच विचारणे खूप आहे त्यांनी HIV/AIDS च्या बाबतीत काय ऐकले आहे. जर त्यांच्या द्वारे देण्यात आलेली कोणती ही माहिती चुकीची निघाली तर तिथूनच त्यांना समजावण्याची संधी घ्या. तरूणांशी बोलतांना त्यांचे म्हणणे ऐकून घेणे फारच आवश्यक आहे. जर पालक बोलणी करण्यास संकोच करीत असतील तर, शिक्षकाकडून, नातेवाईकाकडून किंवा असे कोणी ज्यांच्या बरोबर संवेदनशील मुद्द्यांवर बोलणी केली जाऊ शकतील किंवा मुलास चांगल्या प्रकारे समजाविणे ज्याला येते.
तरूणांना सांगण्यात आले पाहिजे की HIV/AIDS एक असाध्य रोग आहे व याचा काही ही उपाय नाही. त्यांना हे सांगणे आवश्यक आहे की या रोगापासून बचाव हाच एकमात्र सुरक्षित मार्ग आहे. तरूणांना सेक्ससाठी नकार देता यायला हवा.
मुलांना हे समजावण्याची आवश्यकता आहे की अशी मुले किंवा प्रौढ लोक जे HIV संसर्गग्रस्त आहेत त्यांचयाशी सामाजिक संपर्क ठेवण्याने ते संसर्गग्रस्त होणार नाहीत.
HIV/AIDS सह जगणाÚयांना देखभाल आणि मदतीची आवश्यकता असते. तरूण त्यांना सहानुभूति देऊन त्यांची मदत करू शकतात.
एचआयव्ही संसर्ग गर्भवती मातेपासून तिच्या मुलापर्यंत पसरण्यापासून थांबविण्यासाठी सर्वांत चांगला उपाय आहे की स्त्रियांमध्ये HIV चा संसर्ग थांबवावा.
स्त्रियांमध्ये HIV च्या संसर्गाची रोकथाम करण्यासाठी सुरक्षित सेक्स, कंडोमचा वापर आणि STIs चे जलद निदान होणे आवश्यक आहे. जर एखाद्या स्त्रीला HIV संसर्गग्रस्त असल्याची माहिती मिळते तर, तिला भावनात्मक आधार आणि आपल्या भविष्याबाबत योजना बनविण्यास मदतीची आवश्यकता असते. समुदाय आधार समूह आणि NGOs सर बाबत स्त्रियांची खूप मदत करतात.
गर्भवती स्त्रियांना माहित असणे आवश्यक आहे की:
नव्यानेच आई झालेल्या आहार देणे आणि संबंधित धोक्यांचा पर्याय माहित असणे आवश्यक आहे. आरोग्य कर्मचारी आहार देण्यासाठी एखादा पर्याय सांगण्यात यशस्वी होऊ शकतात ज्यायोगे नवजात मुलास HIV मुक्त विकास मिळू शकतो.
HIV संसर्गग्रस्त स्त्रिया ज्यांना चांगला उपचार मिळालेला नाही त्यांच्या गर्भस्थ मुलास HIV सह जन्म घेण्याचा धोका 1-मध्ये-3 होऊ शकतो. दोन तृतियांशपेक्षा ही जास्त नवजात मुले पांच वर्षांची होईपर्यंत वयाच्या आधी मृत्युमुखी पडतात.
एक निर्जंतुक सुई किंवा सिरिंज एकापासून दुसÚया व्यक्तीपर्यंत HIV पसरवू शकते. जोपर्यंत निर्जन्तुक केली जात नाही तोपर्यंत कोणती ही वस्तू शरीरात टोचू नये. ते लोक जे स्वत:लाच मादक इंजेक्शन लावून घेतात किंवा असे इंजेक्शन लावणाÚयासह सेक्स करतात त्यांना HIV चा धोका होऊ शकतो. जे लोक मादक इंजेक्शन लावतात त्यांना नेहमी एक स्वच्छ सुई आणि सिरिंजचा वापर करायला हवा, कधी ही एखाद्या दुसÚयाची सुई वापरू नका. इंजेक्शन फक्त प्रशिक्षित आरोग्य कर्मचाÚयाकडूनच लावून घ्यावे. जेव्हां प्रत्येक मुलाचे किंवा प्रौढाचे लसीकरण करवित असाल तेव्हा प्रत्येकासाठी वेगळी सुई असणे आवश्यक आहे.
एखाद्याची सुई वापरणे, मग तो नातेवाईक का असेना, HIV किंवा इतर घातक संसर्गजन्य रोगास पसरण्याची संधी देण्यासारखे आहे. कोणी ही इतरांची सुई आणि सिरिंज वापरू नये. आईवडिलांनीदेखील आरोग्य कर्मचाÚयास वेगळी नवीन सुई घेण्यास सांगितले पाहिजे.
अनिर्जंतुक वस्तु मग ती रेझर किंवा चाकू असली तरी HIV पसरवू शकते. कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी कापण्या-चिरण्याची साधने निर्जंतुक असणे आवश्यक आहे जसे ब्लीचिंग पावडर मध्ये वस्तु धुणे किंवा उकळत्या पाण्याने त्यांना धुणे.
नवजात शिशुची नाभी तंडिका कापण्यासाठी उपयोगात आणायचे साधन निर्जंतुक असणे आवश्यक आहे. प्रसूतीच्या वेळी प्लॅसेंटा आणि रक्त या सारख्या वस्तुंना स्पर्श करतांना लक्ष ठेवायला हवे. सुरक्षात्मक हातमोजे (लॅटेक्स) जर उपलब्ध असतील तर वापरावेत.
दॉंतांच्या उपचारासाठी, गोंदण्यासाठी, फेशियल मार्किंगसाठी, कान टोचण्यासाठी, आणि ऍक्यूपंक्चरसाठी उपयोगात आणायचे साधन निर्जंतुक असणे आवश्यक आहे. जी व्यक्ती हे कार्य करीत आहे तिला या कामाच्या दरम्यान रक्ताशी संपर्क करायला लागू नये, याकडे फार लक्ष ठेवावे.
महत्वपूर्ण संदेश 9 :जे लोक सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) ग्रस्त आहेत त्यांना एचआयव्ही होण्याचा किंवा त्यांच्या द्वारे पसरण्याचा धोका जास्त असतो. STI ग्रस्त लोकांनी योग्य औषधे घ्यावीत किंवा सुरक्षित यौन करावे. (नॉनपेनिट्रेटिव सेक्स किंवा कंडोमसह सेक्स).
सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STIs) ते संसर्ग आहेत जे सेक्शुअल संपर्कामुळे आणि शरीराच्या द्रव पदार्थोच्या अदलाबदलीमुळे, (वीर्य, योनिमार्ग द्रव किंवा रक्त) किंवा जननेंद्रियाच्या त्वचेशी संपर्कानंतर (विशेषत: त्या जागी फोड, कटस् किंवा आणखी काही चिन्हे जी STI मुळे होतात) पसरत आहे.
STI गंभीर प्रकारचे शारीरिक नुकसान पोचवितात.
कोणता ही STI जसे गनोरिया किंवा सिफलिस, HIV च्या पसरण्याचा, किंवा संसर्गाचे कारण बनू शकतो. STI ग्रस्त लोकांमध्ये HIV च्या संसर्गाचा धोका 5 से 10 पट जास्त असतो जर एखाद्या HIV संक्रमित व्यक्तीशी असुरक्षित सेक्स केले तर.
संभोगाच्या वेळी—जसे वजायनल, गुदा किंवा मुखमैथुनाच्या वेळी लॅटेक्स कंडोमचा बरोबर आणि निरंतर उपयोग STIs चा संसर्ग खूप सीमेपर्यंत कमी करून टाकतो ज्यांमध्ये HIV देखील समाविष्ट आहे.
STI ला जाणून घेण्याचा परंपरागत उपाय म्हणजे प्रयोगशाळा परीक्षणे आहेत, तथापि, ही परीक्षणे कधी-कधी खूपच महाग किंवा अनुपलब्ध असतात.
1990 पासून, WHO ने STI च्या लक्षणांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये STI च्या ‘सिंड्रोमिक मॅनेजमेंट’ करण्याविषयी शिफारस केली आहे. सिंड्रोमिक मॅनेजमेंटची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
फ्लो चार्टचा उपयोग केल्याने सिंड्रोमिक दृष्टिकोण ताबडतोब पोच आणि मूल्य-प्रभावित दक्षतापूर्ण उपचार देतो.
स्त्रोत : UNICEF
अंतिम सुधारित : 6/18/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...