खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजारांच्या बाबतीत सूचनेचे वाटप करणे आणि त्या नुसार कार्य करणे का आवश्यक आहे?
खोकला, पडसे, घसा धरणे आणि नाक वाहणे मुलांच्या जीवनातील सामान्य घटना असतात आणि बहुतेक जास्त गंभीर ही नसतात.
तरी ही, काही आजारांसंबंधी, काही बाबतीत, खोकला आणि पडसे ही न्युमोनिया या टी.बी. या सारख्या गंभीर रोगांची लक्षणे असतात. वर्ष 2000 मध्ये 5 वर्षांपेक्षा लहान वयाची 2 मिलियन मुले श्वसनमार्गात संसंर्ग झाल्यामुळे मृत्यूमुखी पडली.
खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजारांच्या बाबतीत प्रत्येक कुटुंब आणि समुदायास काय माहिती करून घेण्याचा अधिकार आहे
- ज्या मुलास खोकला किंवा सर्दी-पडसे आहे त्याला गरम ठेवावे आणि तितकेच खायला लावावे जितके मूल खाऊ शकेल.
- कधी-कधी, खोकला आणि सर्दी पडसे ही एखाद्या गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात. ज्या मुलाला अशा वेळी श्वास घ्यायला त्रास होत असेल या मूल घाई-घाईने श्वास घेत असेल तर त्याला न्युमोनिया असू शकतो, जो फुफुसांचा संसर्गजन्य रोग आहे. हा एक प्राणघातक रोग आहे आणि अशा मुलास ताबडतोब एखाद्या आरोग्य सुविधा केंद्रात न्यावे.
- कुटुंबे न्युमोनियापासून बचाव करण्यात मदत करू शकतात ज्यामध्ये त्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की मुलांना सहा महिनेपर्यंत पूर्णपणे जास्तीत जास्त स्तनपान द्यावे आणि सर्व मुलांना पोषक आहार दिला जात आहे व त्याना सर्व प्रकारच्या लशी टोचून झाल्या आहेत.
- जास्त प्रमाणात जोरदार पडसे झाल्यावर मुलास ताबडतोब वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे. मुलास टी.बी. होऊ शकतो जो फु¶फुसांचा संसर्गजन्य रोग आहे.
- विशेषत: मुले व गरोदर स्त्रियांना तंबाखू या स्वयंपाकघरातील धुरामुळे धोका संभवतो.
सहाय्यक सूचना: खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजार
महत्वपूर्ण संदेश : ज्या मुलास खोकला या सर्दीपडसे आहे त्याला गरम ठेवावे आणि त्याला जितके ते मूल खाऊ-पिऊ शकते तितके खाण्यास द्यावे.
- तान्ह्या आणि खूप लहान मुलांच्या शरीरातील उष्णता लवकर संपते. जेव्हा त्यांना सर्दीपडसे किंवा खोकला होतो तेव्हा त्यांना गरम पांघरूण द्यावे.
- ज्या मुलांना को खोकला, सर्दीपडसे, नाक वाहणे आणि घसा खराब असल्याचा त्रास आहे आणि ते सामान्य प्रकारे श्वास घेऊ शकत असतील, ते घरामध्येच कोणत्या ही औषधाविना बरी होतील. त्यांना गरम ठेवण्याची गरज आहे पण फार जास्त नाही.तसेच त्यांना चांगला पोषक आहार देण्याची गरज आहे. जेव्हां आरोग्य कर्मचारी सांगेल तेव्हांच औषध द्यावे.
- ज्याला ताप आहे अशा मुलांना कोमट पाण्याने स्पॉन्ज (ओल्या फडक्याने अंग पुसावे) करावा. जेथे मलेरियाचा प्रकोप आहे अशा क्षेत्रांमध्ये, ताप घातक सिध्द होऊ शकतो. मुलास ताबडतोब आरोग्य कर्मचाऱ्यास दाखवावे.
- खोकला किंवा सर्दीपडसे झाल्यावर मुलांचे वाहणारे नाक नेहमी स्वच्छ ठेवावे, विशेषत: मुले झोपण्याच्या आधी. दमट वातावरण श्वास घेण्यास मदत करू शकते, आणि जर मूल उकळत्या पाण्याच्या वाफेचा शेक नाका तोंडावर घेईल तर त्याला आणखी आराम मिळेल.
- स्तनपान करणाऱ्या मुलांस खोकला आणि सर्दीपडसे झाल्यास दूध पिण्यास त्रास होतो. पण स्तनपान हे रोगप्रतिरोधासाठी आणि मुलांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे, म्हणून मुलास अंगावर पाजणे चालू ठेवावे. जर मूल दूध चोखू शकत नसेल तर, अंगावरचे दूध कपात काढून मुलास पाजू शकता.
- जी मुले स्तनपान करीत नाहीत त्यांना थोड्या-थोड्या वेळाने काही तरी खायला घालावे. जेव्हां मूल बरे होईल, तेव्हा कमीत कमी एक आठवडा मुलास चांगला पोषक आहार देणे आणि जो पर्यंत मुलाचे वजन आजारी पडण्याआधी जितके होते तितके होत नाही तोपर्यंत मूल बरे झाले असे मानू नये.
- खोकला व सर्दीपडसे सुलभतेने पसरतात. ज्यांना खोकला आणि सर्दीपडसे आहे त्या लोकांनी मुलांच्या जवळपास शिंकणे, खोकणे किंवा थुंकणे करू नये.
महत्वपूर्ण संदेश : कधी-कधी, खोकला आणि सर्दी पडसे ही एखाद्या गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात. ज्या मुलाला अशा वेळी श्वास घ्यायला त्रास होत असेल या मूल घाई-घाईने श्वास घेत असेल तर त्याला न्युमोनिया असू शकतो, जो फुफ्फुसांचा संसर्गजन्य रोग आहे. हा एक प्राणघातक रोग आहे आणि अशा मुलास ताबडतोब एखाद्या आरोग्य सुविधा केंद्रात न्यावे.
खोकला आणि सर्दीपडसे, घसा खराब होणे आणि वाहणारे नाक बहुतेक औषधे घेतल्या विना बरे होतात. पण कधी-कधी ही न्युमोनियाची लक्षणे असतात, जो फुफ्फुसांचा संसर्गजन्य रोग आहे. आणि सामान्यत: या रोगात ऍटिबायोटिक्स् आवश्यक असतात.
जर आरोग्य कर्मचारी न्युमोनियाच्या उपचारासाठी ऍटिबायोटिक्स् देतो, तर निर्देशांचे पालन करणे फार गरजेचे आहे, कारण औषधे जास्त काळ देणे महत्वाचे आहे मूल बरे झाले तरी ही.
पुष्कळशी मुले मरतात कारण त्यांचे पालक रोगाचे गांभीर्य आणि ताबडतोब वैद्यकीय मदतीच्या गरजेची आवश्यकता जाणत नाहीत. न्युमोनियामुळे मरणाऱ्या पुष्कळशा मुलांना वाचविले जाऊ शकते जर:
- आई-वडील आणि पालक यांना हे समजेल की श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मुलास ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज आहे.
- वैद्यकीय मदत आणि कमी खर्चिक उपचार उपलब्ध आहे.
मुलास लवकर एखाद्या प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्याकडे किंवा आरोग्य केंद्रात घेऊन जायला हवे जर खालीलपैकी काही ही आढळून आले तर:
- मूल सामान्यपेक्षा जास्त गतीने श्वास घेत असेल: 2 ते 12 महिन्यांच्या मुलासाठी – एका मिनिटांत 50 किंवा जास्त वेळा श्वास; 12 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलासाठी – एका मिनिटांत 40 किंवा जास्त वेळा श्वास घेत असेल तर
- मूल श्वासाकरीता कासावीस होत असेल तर
- जेव्हां मूल श्वास आत घेते तेव्हा छातीचा खालचा भाग आत जातो, किंवा असे वाटते की पोट वर-खाली होत आहे.
- मुलास दोन आठवड्यापासून खोकला असेल तर
- मूल अंगावर पिऊ शकण्यास असमर्थ असल्यास
- मूल बहुतेक ओकारी करीत असेल तर
महत्वपूर्ण संदेश : कुटुंबे न्युमोनियापासून बचाव करण्यात मदत करू शकतात ज्यामध्ये त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे की मुलांना सहा महिनेपर्यंत पूर्णपणे जास्तीत जास्त स्तनपान द्यावे आणि सर्व मुलांना पोषक आहार दिला जात आहे व त्यांना सर्व प्रकारच्या लशी टोचून झाल्या आहेत.
- स्तनपान मुलांना न्युमोनिया आणि इतर रोगापासून सुरक्षित ठेवते. मुलांच्या जीवनात सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करविले जाणे खूप महत्वपूर्ण आहे.
- कोणत्या ही वयात, ज्या मुलास चांगले पोषण दिले जात असेल त्याच्या आजारी पडण्याची किंवा मरायची शक्यता खूप कमी होते.
- व्हिटॅमिन ए श्वसनासंबंधी सर्व गंभीर रोगांपासून आणि इतर रोगांपासून बचाव करते, आणि लवकर बरे पण करते. व्हिटॅमिन ए आईच्या दुधात, लाल पाम तेलात, मासे, डेअरी उत्पाद, अंडी, संतरे आणि पिवळ्या रंगाच्या फळे आणि भाज्या तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिळते.
- मूल एका वर्षाचे होईपर्यंत लसीकरण पूर्ण व्हायला हवे. तेव्हा मूल गोवर नावांच्या रोगापासून सुरक्षित राहील, ज्यामुळे न्युमोनिया किंवा इतर श्वसनसंबंधी आजार, ज्यामध्ये डांग्या खोकला आणि टी.बी. चा ही समावेश आहे, होऊ शकतो.
महत्वपूर्ण संदेश : मुलास जर खूप पडसे आहे तर त्याला ताबडतोब वैद्यकीय मदत द्यावी. मुलास टी.बी. होऊ शकतो, जो फुफ्फुसांचा एक संसर्गजन्य रोग आहे.
टी.बी एक गंभीर रोग आहे ज्यामुळे मुलांच्या फुफ्फुसांना कायमची हानि होऊ शकते किंवा मुलास मृत्यु येऊ शकतो. टी.बी. पासून बचाव करण्यासाठी कुटुंब साथ देऊ शकते जर ते या बाबत खात्री करून घेतील की त्यांच्या मुलांना:
- सर्व लसीकरण टोचलेले आहे – BCG चे एक इंजेक्शन टी.बी.च्या काही स्वरूपांपासून बचाव करू शकते.
- ज्याला टी.बी. आहे त्याला दूर ठेवा. ज्याला रक्ताबरोबर कफ पडतो व खोकला आहे, त्याच्या पासून दूर राहा.
जर आरोग्य कर्मचारी टी.बी. साठी विशेष औषधे देत आहे, मुलांस ती सर्व वेळेवर आणि निर्देशानुसार, त्याच प्रमाणात, तितक्याच काळासाठी देणे फार आवश्यक आहे, मूल बरे झाले असे वाटले तरी ही.
महत्वपूर्ण संदेश : मुले आणि गर्भवती स्त्रिया दोघांचा ही संपर्क तंबाखू किंवा स्वयंपाकाच्या धुराशी झाल्यास त्यांना धोका आहे.
- मुले जर धुराने भरलेल्या वातावरणात राहिली तर त्यांना न्युमोनिया किंवा श्वसनसंबंधी त्रास होऊ शकतो.
- धुराचा संपर्क मुलांसाठी हानिकारक आहे, जन्माच्या आधीदेखील. गर्भवती बायकांनी धूम्रपान करू नये आणि धुराच्या संपर्कात पण राहू नये.
- तंबाखूचा वापर बहुतेक किशोरावस्थेत आरंभ होतो. जर तंबाखूशी संबंधित जाहिरात आणि तंबाखूचे उत्पाद स्वस्त आणि सोयीस्करपणे उपलब्ध असतील, तर त्याच्या जवळपासचे प्रौढ जर धूम्रपान करत असतील तर, खूप शक्यता आहे कि किशोर धूम्रपान करणे सुरू करेल. किशोरांमध्ये धूम्रपान करणे सोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले पाहिजे आणि त्याच्या मित्रांना देखील याच्या धोक्यापासून सावध केले पाहिजे.
स्त्रोत : UNICEF