नैसर्गिक संकट व आणीबाणीच्या बाबतीत माहिती आणि कार्य यांचे वाटप का आवश्यक आहे?
- कोणत्या ही नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीच्या दरम्यान, मुलांना सर्वांत जास्त मानसिक धक्का लागू शकतो किंवा कोणता ही रोग यांना फार लवकर धरतो आणि म्हणूनच यांच्याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.
- विश्वभरातील अंदाजे 27 मिलियन शरणार्थी आणि 30 मिलियन निर्वासित लोकांमध्ये, 80 टक्के स्त्रिया आणि मुले आहेत. सुमारे 2 मिलियन लोक 1990 पासून 1999 पर्यंत नैसर्गिक संकटग्रस्त झाले. नैसर्गिक संकटे गरीबांचे असमानुपाती नुकसान करतात. विकसित देशांमध्ये 90 टक्के पेक्षा ही जास्त नैसर्गिक संकट संबंधित मृत्यु आढळतात.
- मागील दशकात सुमारे 9 मिलियन मुले वैश्विक पातळीवर मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना दुखापत किंवा इजा झाली आहे, अनाथ झाली आहेत किंवा आपल्या आईवडिलांस हरवून बसली आहेत.
महत्वाचा संदेश
प्रत्येक कुटुंब आणि समुदायास नैसर्गिक संकट व आणीबाणीच्या बाबतीत जाणून घ्यायचा अधिकार आहे?
- नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीजन्य परिस्थितिंमध्ये, मुलांस आवश्यक आरोग्य संगोपन देण्यात आले पाहिजे, ज्यांमध्ये गोवराची लस टोचणे, पुरेसे जेवण आणि सूक्ष्मपोषक तत्व पूरकांचा समावेश असायला पाहिजे.
- आणीबाणीच्या काळात स्तनपानाचे विशेष महत्व आहे.
- आईवडिलांनी किंवा इतर कुटुंबियांनी त्यांच्याकडे लक्ष देणे हे मुलांच्या दृष्टिने फार महत्वाचे आहे, विशेषत: विवादास्पद परिस्थितिमध्ये, कारण यामुळे मुलांना आपण सुरक्षित आहोत असे वाटते.
- घरात, युध्दात आणि इतर नैसर्गिक संकटांच्या काळात झालेली हिंसा मुलांमध्ये भीती किंवा राग ठासून भरते. जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते, अतिशय माया व प्रेमाने, आणि त्यांच्या भावनांना व्यक्त करण्याची संधी त्यांना देण्यात यायला हवी म्हणजे ती मुले आपल्या वयानुसार आपल्या अनुभवांचे वर्णन करतील.
- जमिनीतील सुरूंगे (लैंडमाइन्स) आणि अविस्फोटित स्फोटक सामग्री अत्यंत धोक्याची असतात. त्यांना कधी ही स्पर्श करू नये व त्याच्यावर पायसुध्दा ठेवला जावू नये. मुलांच्या खेळण्याची जागा सुरक्षित असायला हवी आणि त्यांना अनोळखी व बेवारशी वस्तूंना हात न लावणे शिकवायला हवे.
सहायय्क माहिती: नैसर्गिक संकट व आणीबाणी
महत्वाचा संदेश : नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीजन्य परिस्थितिंमध्ये, मुलांस आवश्यक आरोग्य संगोपन देण्यात आले पाहिजे, ज्यांमध्ये गोवराची लस टोचणे, पुरेसे जेवण आणि सूक्ष्मपोषक तत्व पूरकांचा समावेश असायला पाहिजे.
जेव्हा लोक जास्त संख्येत एकत्र होतात तेव्हा रोग फार लवकर पसरतात. सर्व मुले जी संकुचित (फार थोड़ी-शी) जागेत किंवा शरणार्थी अवस्थेत किंवा नैसर्गिक संकटजन्य परिस्थितिंमध्ये राहतात, त्यांचे लसीकरण ताबडतोब व्हायला पाहिजे. विशेषत: गोवराची लस टोचणे फार महत्वाचे आहे, शरणस्थळाच्या सुरूवातीला किंवा संपर्क स्थळी येताच, व्हिटॅमिन ए पूरक सुध्दा उपलब्ध करवून द्यायला हवे.
नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीजन्य परिस्थितिंमध्ये लसीकरण डिस्पोज़ेबल सिरिंजेस् च्या द्वारे करावे म्हणजे अशा सिरिंजेस् ज्या एकदाच वापरू शकतात.
जेव्हा मुले घाणेरड्या जागेत राहतात आणि कुपोषणग्रस्त होतात तेव्हा त्यांना अत्यंत जोरदार गोवर निघू शकतो.
- कारण गोवर फार लवकर पसरतो, रोगी मुलास इतर मुलांपासून दूर किंवा वेगळे ठेवायला हवे, आरोग्य कर्मचारी त्याचे निरीक्षण करेल व व्हिटॅमिन ए चे पूरक देईल.
- गोवरामुळे मुलास सारखा डायरिया होवू शकतो. मुलास गोवराची लस टोचल्याने डायरिया व न्युमोनिया दोहोंपासून बचाव होतो.
जर काही कारणाने, एखाद्या मुलास वयाच्या पहिल्याच वर्षी सर्व प्रकारच्या लसी टोचल्या नसतील तर, त्या मुलास लवकरात लवकर लस टोचणे अत्यावश्यक आहे.
महत्वाचा संदेश : आणीबाणीच्या दरम्यान स्तनपान करविण्यास विशेष महत्व आहे.
- ज्या माता स्तनपान करवितात, त्यांना सहा महिन्यापर्यंत आवश्यक स्वरूपात आणि 2 वर्षे वयापर्यंत मुलांस स्तनपान करविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास इतर कुटुंबीय, इतर माता आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी हे सर्वजण प्रत्यक्ष माहितीचे महत्वपूर्ण स्त्रोत आहेत. सहा महिन्यांपेक्षा मोठ्या वयाच्या मुलांना आईच्या दुधा बरोबरच इतर पूरक आहार देखील द्यावेत.
- मानसिक ताणामुळे स्तनपानावर प्रभाव पडतो असे आधारहीन विचार असलेल्या मानसिक ताणग्रस्त मातांना विशेष लक्ष आणि सहाय्याची गरज आहे.
- सहा महिन्यापेक्षा लहान असलेल्या बाळास पूर्णपणे स्तनपान करविणे त्यांना आजार आणि मृत्युपासून वाचविण्यासाठी एका प्राथमिकतेच्या स्वरूपात आवश्यक आहे.
- जर तान्ह्या मुलाकरीता हा फॉर्मूला आवश्यक मानला, तरी माता आणि संगोपनकर्ता यांस आहार तयार करण्याचा आरोग्यकर विधि प्रत्यक्ष परामर्श देवून सांगणे आवश्यक आहे. आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर वस्तू खाऊ शकत असलेल्या मुलास फार प्रेमाची अाणि मायेच्या ऊबेची गरज असते. त्यांना कधी ही बाटलीने दूध पितांना एकटे सोडू नये असा सल्ला देण्यात येत आहे.
महत्वाचा संदेश : आईवडिलांनी किंवा इतर कुटुंबियांनी त्यांच्याकडे लक्ष देणे हे मुलांच्या दृष्टिने फार महत्वाचे आहे, विशेषत: विवादास्पद परिस्थितिमध्ये, कारण यामुळे मुलांना आपण सुरक्षित आहोत असे वाटते.
- आईवडिलांच्या अनुपस्थितित, संकट किंवा आणीबाणीजन्य परिस्थितिमध्ये मुले त्यांच्या कुटुंबियांपासून किंवा संगोपनकर्तापासून दूर न होवोत ही काळजी घेण्याची जवाबदारी इन-चार्ज अधिकारी किंवा युनायटेड नेशन्सची आहे.
- जर मुले व त्यांचे लोक यांचा वियोग झाला, मुलास विशेष लक्ष आणि सुरक्षा पुरविणे सरकार आणि प्राधिकृत अधिकारी यांची जवाबदारी आहे. अधिकारी गण आणि सरकार मुलांच्या कुटुंबियांस शोधून त्यांचा पुन्हा मेळ करवून देण्यास पण जवाबदार आहेत.
- आणीबाणीजन्य परिस्थितिंमध्ये, परिजनांपासून विलग झालेल्या मुलांचे विशेष संगोपन फार आवश्यक आहे. जेथे शक्य असेल तेथे मुलांच्या समुदायाने त्यांचे संगोपन करावे जोपर्यंत मूल पुन्हा आपल्या लोकांना भेटत नाही किंवा दुसरे कोणी कुटुंब त्याचा स्वीकार करीत नाही.
- आणीबाणीत परिजनांपासून विलग झालेल्या मुलांस अनाथ मानायला नको आणि त्यांना दत्तक देण्या-घेण्यासाठी ही उपलब्ध मानायला नको. जोपर्यत एखाद्या मुलाच्या नशिबाचा निर्णय होत नाही की त्याचे आईवडील किंवा नातेवाईक जिवंत आहेत तोपर्यंत प्रत्येक मुलाच्या लोकांच्या जिवंत असण्याची अपेक्षा धरून चालावे. जर कोणी ही नाही मिळाले तर मग त्या मुलास त्याच्याच क्षेत्रातील मूळ रहिवासी कुटुंबास दत्तक द्यावे. जेव्हा हा मार्ग अगदीच खुंटेल तेव्हा एखाद्या नवीन जागी मूल दत्तक द्यावे व देतांना त्या क्षेत्राचा, देशाचा, त्याच्या संस्कृतीचा विचार नक्की करावा.
- एखाद्या नवीन देशांत किंवा नव्या घरात जाणे फार मानसिक ताण देणारे ठरू शकते, विशेषत: जेव्हा परिजन हिंसक वातावरणातून जीव वाचवून येथपर्यंत पोचलेले असतील. शरणार्थी मुलांस काही वेळा नवी भाषा किंवा संस्कृती शिकण्याचा अतिरिक्त ताण सहन करावा लागतो.
महत्वाचा संदेश : घरात, युघ्दात आणि इतर नैसर्गिक संकटांच्या काळात झालेली हिंसा मुलांमध्ये भीती किंवा राग ठासून भरते. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते, अतिशय माया व प्रेमाने, आणि त्यांच्या भावनांना व्यक्त करण्याची संधी त्यांना देण्यात यायला हवी म्हणजे ती मुले आपल्या वयानुसार आपल्या अनुभवांचे वर्णन करतील.
जेव्हां परिचित लोक, जागा किंवा वस्तू हरवून जातात किंवा हरविण्याची भीती असते, आणि जेव्हा मोठी माणसे स्वत:च निराश झालेली असतात, तेव्हा मुलांना फार एकटे आणि भयग्रस्त वाटते आणि ते स्वत:ला हरवून गेल्यासारखे विचार करतात.
संकट किंवा आणीबाणीजन्य परिस्थितित, आईवडीलांसाठी मुलांशी मायेने वागणे किंवा त्यांना सुरक्षित आहोत हा आधार देणे फार कठिण होवून बसते.
मुलासांठी दुखणे, भीती किंवा हिंसक अनुभवांच्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त करणे सोपे असते. काही मुले स्वत:ला सर्वांपासून वेगळे करून घेतात, काही हिंसक होतात. काही परिस्थितिशी जुळवून घेतात, तरी पण त्यांच्या मनातून भीती जात नाही. मुले दीर्घकालीन हिंसेचे ‘आदी’ होतात, पण हे त्यांच्यासाठी फारच दु:खपूर्ण असते.
जर मुलांस आपल्या भावनांना समजण्यासाठी मदत नाही मिळाली तर ते जास्त निराश होतील.
- नियमित दिनचर्या – शाळेत जाणे आणि जेवणे व झोपण्याची नियमित सत्रे सांभाळणे – मुलांस सुरक्षितता आणि निरंतरतेची भावना देतात.
- मनोरंजक क्रियाकलाप मुलांस मानसिक ताण विसरण्यास मदत करतात. अहिंसक खेळ, क्रीडा आणि मनोरंजनाची इतर साधने, जसे शरणस्थळ किंवा शरणार्थी कैंपमध्ये खेळण्यासाठी सुरक्षित जागा, तेथे राहत असलेल्या लोकांत परस्पर संवाद आणि संभाषण इत्यादि. चित्र काढणे किंवा खेळण्यांशी खेळणे मुलांस मानसिक ताणपूर्ण अनुभवांची अभिव्यक्ति करण्यास व त्यांच्याशी ताळमेळ बसविण्यास मदत करतात. मानसिक ताणपूर्ण परिस्थिति खेळाच्या माध्यमाने पुन्हा एकदा जगणे फार सामान्य आहे आणि लहान मुलांसाठी फार मदत करणारे आहे. या प्रकारे मुले जे काही घडले आहे त्याच्या परिणामांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतात.
- जे त्रासदायक आहे त्याबद्दल बोलण्याचे शिक्षण मुलांस द्यावे. त्यांना स्वत:ला अभिव्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यांच्यावर कोण त्याही प्रकारचा दबाव पडायला नको. त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांचे अनुभव ऐकून प्रतिक्रिया व्यक्त करा.
- तीन ते सहा वर्षांच्या मधल्या वयाची मुले स्वत:ला समस्येसाठी जवाबदार मानतात. या भावना त्यांच्या मनात बळकट अपराध बोध भरतात. अशा मुलांस एखाद्या मोठ्याकडून अत्यंत माया आणि निरीक्षणांची गरज असते.
- मुलांस निरंतर सुनिश्चितीची गरज असते, त्यांना रागवू नका आणि शिक्षा ही देवू नका. जर कोणी जवळचे नातेवाईक कोठे जाऊ लागेल तर मुलास सांगून जावे व केव्हा परत येवू ते सुध्दा सांगावे, तसेच तो नातेवाईक तेथे नसतांना मुलाचा सांभाळ कोण करील ते ही सांगावे म्हणजे त्याच्या मनात भीती राहात नाही.
- किशोर मुलांमध्ये युध्द आणि इतर दुखद परिस्थितिंबाबत स्पष्ट समज असते, काही वेळा ते त्या घटनांवर ताबा मिळविण्यात अयशस्वी झाले म्हणून स्वत:ला दोषी मानतात आणि अपराधबोधाचे बळी ठरतात. असे वाटते की त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतले आहे पण त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या अनुभावांशी ताळमेळ बसवून घेणारी भावनात्मक परिपक्वता आलेली नाही. काही वेळा किशोरवयाची मुले राग व उदासीनतेच्या भावनांशी जुळवून घेतांना आक्रमक होतात. ते प्राधिकरणाच्या विरूध्द बंड करू शकतात, ड्रग घेऊ किंवा चोरू शकतात. किंवा ते स्वत:ला एकदम एकटे करून टाकतात, भीतीग्रस्त होतील किंवा मनातल्या मनात काहीतरी वाईटच घडेल याची काळजी करीत बसतील.
किशोरवयीन मुलांना त्यांच्या अनुभवांमधून वाटचाल करण्यासाठी मोठ्यांची गरज असते. समुदाय/समाजाच्या जीवनात किशोरांना समाविष्ट करणे हे त्यांना एक भूमिका पार पाडण्यासाठी देण्याएवढे फायद्याचे ठरते.
- सोबती, शिक्षक आणि समुदायाचे सदस्य त्या किशोरवयाच्या मुलांसाठी संरक्षण आणि आधाराचे महत्वपूर्ण स्त्रोत होतात, जे स्वत: आपल्या कुटुंबावर देखील अवलंबून नाहीत (भावनात्मक स्वरूपात देखील). किशोरवयाच्या मुलांना आपले अनुभव आपल्या सोबत्या-सवंगड्यांना सांगण्यासाठी आणि विश्वसनीय प्रौढांना सांगण्यासाठी तसेच सामुदायिक गतिविधिंचा उपचार करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.
- जेव्हा मुलांचा मानसिक ताण जास्त वेळ टिकून राहतो, तेव्हा त्यांना जास्त आधाराची गरज असते.
महत्वाचा संदेश : लैंडमाइन्स आणि अविस्फोटित स्फोटक सामग्री अत्यंत धोक्याची असतात. त्यांना कधी ही स्पर्श करू नये व त्याच्यावर पायसुध्दा ठेवला जावू नये. मुलांच्या खेळण्याची जागा सुरक्षित असायला हवी आणि त्यांना अनोळखी व बेवारशी वस्तूंना हात न लावणे शिकवायला हवे.
लैंडमाइन्स (जमिनीतील सुरूंग) पुष्कळ आकार, साइज आणि रंगाच्या असतात. ह्या माइन्स गवतात, झाडांत, किंवा पाण्यात लपवून ठेवल्या जावू शकतात.
गंज लागलेल्या माइन्स हवामानामुळे दिसून येतात पण ओळखणे एवढे सोपे देखील नाही, त्या अत्यंत घातकी ठरू शकतात.
माइन्स सामान्यत: आढळत नाहीत. सैन्य गतिविधि क्षेत्र, किंवा उजाड माळरान किंवा दाट जंगलाच्या जवळपास विशेष लक्ष देण्याची गरज असते. जेथे माइन्स लावली जातात तेथे कवटीचे किंवा क्रॉसबोन्सचे चिन्ह, क्रॉस्ड काठ्या किंवा गाठी मारलेले गवत असते. कोणी ही अशा चिन्हांकित जागी जावू नये.
माइन्स किंवा अविस्फोटित सैन्य सामग्रीला कधी ही स्पर्श करू नये. यांतील काही वस्तू अशा असतात की ज्या जमीनीवर पडताच स्फोट होतो पण कधी कधी असे होत देखील नाही. तरी पण ह्या धोक्याच्याच असतात. शेतात आग लावण्याने सर्व माइन्सचा स्फोट होणार नाही आणि क्षेत्र सुरक्षित देखील नसेल.
काही माइन्स वजन ठेवून, काही इतर वायर ओढून, आणखी काहींना फक्त स्पर्श केल्याने किंवा हलविल्याने स्फोट होतो. कोणी ही अशा वायरवर पाय ठेवू नये कारण जवळपास माइन्स पसरलेल्या असू शकतात. जेथे एक माइन असते तेथे आणखी ही असू शकतात. ज्याला पण ह्या माइन्स दिसतील त्याने चालणे ताबडतोब थांबवून आपल्याच पदचिन्हांवरून परत जावे किंवा स्थिर उभे राहून मदतीसाठी हाक मारावी.
जर एखाद्या लैंडमाइनच्या स्फोटामुळे दुखापत झाली तर:
- जेथून रक्तस्त्राव होत असेल तेथे दाबून धरा जोपर्यंत रक्त वाहणे थांबत नाही.
- जर रक्त वाहणे कमी नाही झाले तर, कापडाचा एक तुकडा घेवून (रक्तबंध) जखमेच्या आसपास बांधावा आणि लवकर डॉक्टरची मदत घेण्यासाठी पाठवावे. जर मदत मिळण्यास उशीर लागत असेल तर तर दर तासाने रक्तबंध थोडा-सा सैल करून रक्त वाहणे थांबले की नाही ते पहावे. जर रक्त थांबले असेल तर, रक्तबंध काढून टाकावा.
- जर मूल बेशुध्द असेल आणि श्वास घेत असेल तर त्याला एका कुशीवर निजवावे म्हणजे त्याची जीभ तोंडात अडकून त्याच्या श्वासोच्छवासात अडथळा आणणार नाही. व्यावसायिक डी-माइनिंग क्षेत्रास सुरक्षित करण्याचा सर्वांत चांगला उपाय ठरेल.
स्त्रोत : UNICEF